वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांनी आज दिनांक ७ मे रोजी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यालयाला
सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी मंडळाच्यावतीने माननीय विधान परिषद सदस्य व विद्यापीठाचे
कार्यकारी परिषद सदस्य आमदार श्री. सतिश चव्हाण यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला.
यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी देवगिरी
महाविद्यालयाच्या परिसरातील शारदाबाई गोविंदराव पवार मुलींच्या वसतिगृहाची पाहणी
केली. त्यांनी वसतिगृहात मुलींना उपलब्ध करून दिलेल्या भौतिक सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता आणि शिक्षणास पोषक वातावरण यांचे विशेष कौतुक केले.
त्यानंतर त्यांनी देवगिरी महाविद्यालयालाही भेट देऊन महाविद्यालयात राबवले
जाणारे अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती तसेच विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची माहिती घेतली.
या सर्व गोष्टींबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले व संस्थेच्या शैक्षणिक कार्याचे
अभिनंदन केले.
या प्रसंगी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, देवगिरी
महाविद्यालयाचे प्राचार्य श्री प्रवीण तेजनकर, फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी
डॉ संजय पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.