वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी लातूर
येथे भेट देऊन माजी केंद्रीय गृहमंत्री व ज्येष्ठ नेते कै. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या
पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी कै. शिवराज पाटील यांचे चिरंजीव श्री. शैलेश
पाटील चाकूरकर यांच्यासह संपूर्ण कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना मनःपूर्वक सांत्वन
केले.
या प्रसंगी
माननीय कुलगुरू यांच्या समवेत विद्यापीठाच्या लातूर,
चाकूर, परळी आणि उदगीर येथील सर्व
महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता तसेच विविध कार्यालयांचे प्रभारी अधिकारी
उपस्थित होते. यामध्ये सहयोगी अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. दिनेश चौव्हाण, डॉ. अच्युत भरोसे, डॉ. एस. एच. कांबळे; प्रभारी अधिकारी डॉ. मोहन
धुप्पे; प्राचार्य डॉ. अशोक घोटमुकळे; श्री.
एस. बी. सूर्यवंशी तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कै. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या
समाजकारणातील मोलाच्या योगदानाचा उल्लेख करून त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी, अशी भावपूर्ण प्रार्थना व्यक्त केली. तसेच विद्यापीठातील
सर्व अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापकवर्ग
आणि विद्यार्थ्यांच्या वतीने कै. शिवराज पाटील यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली
अर्पण करण्यात आली.
.jpeg)