वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक
विज्ञान महाविद्यालयाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी
कुमारी सिद्धी संतोष रासवे हिने सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित राज्यस्तरीय ऑफलाईन
व ऑनलाइन ‘चित्रकला स्पर्धा २०२५’ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिने गट
‘ब’ — जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक पटकावून आपल्या महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले
आहे.
या स्पर्धेत राज्यभरातून मोठ्या संख्येने
विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. अशा भव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणे हे
कुमारी सिद्धीच्या कलागुणांचे आणि सातत्यपूर्ण परिश्रमांचे प्रतीक आहे. तिच्या या यशाबद्दल
महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, विभागप्रमुख डॉ. विजया पवार, डॉ. वीणा भालेराव, डॉ. नीता गायकवाड, डॉ. शंकर पुरी, शिक्षकवृंद, अधिकारी,
कर्मचारी तसेच मित्रमैत्रिणींनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
ही स्पर्धा विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, कल्पकता आणि कलात्मक
अभिव्यक्तीला चालना देणारी असून, कुमारी सिद्धीच्या यशामुळे इतर
विद्यार्थ्यांनाही निश्चितच प्रेरणा मिळेल, असा विश्वास शिक्षकांनी
व्यक्त केला आहे.

