माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टीतून विद्यापीठाचा राज्यस्तरीय प्रदर्शनात गौरव
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठाच्या संकरित गोपैदास प्रकल्पातील देवणी व होलदेव जातीच्या गोवंशीय पशुधनास
राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ‘ॲग्रो टेक २०२५’ मध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. हे प्रदर्शन
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे दिनांक २७ ते
२९ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.
या राज्यस्तरीय
प्रदर्शनात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन
व प्रेरणेतून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सक्रिय सहभाग नोंदविला होता.
विद्यापीठाच्या संशोधनात्मक उत्कृष्टतेची दखल घेत सदर पारितोषिक प्रदान करण्यात
आला.
हा पारितोषिक अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे
माननीय कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या शुभहस्ते,
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे माननीय प्रधान सचिव श्री. विकासचंद्र
रस्तोगी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच अकोला जिल्ह्याच्या माननीय जिल्हाधिकारी श्रीमती
वर्षा मीना यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार मिळण्यासाठी परभणी कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक
डॉ. खिजर बेग यांचे मार्गदर्शन तसेच संकरित गोपैदास प्रकल्प व पशुसंवर्धन विभागाचे
मुख्य शास्त्रज्ञ तसेच दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे यांच्या नेतृत्वाखालील
कार्य महत्वपूर्ण ठरले.
या सन्मानामुळे
विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व विस्तार कर्मचाऱ्यांचा
उत्साह वाढून भविष्यात अधिक गुणवत्तापूर्ण संशोधन व शेतकरीहितकारी उपक्रम राबविण्यास
निश्चितच चालना मिळणार आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठाचा संकरित गोपैदास प्रकल्प सन १९७५ मध्ये स्थापन झाला असून, मराठवाडा भागातील देशी गायींचे संकरिकरण करून दुग्धोत्पादन
वाढवणे तसेच देशी जातींचे संवर्धन करणे हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे. मराठवाड्यातील
प्रसिद्ध देशी देवणी जात ही दुहेरी उपयुक्तता (दुग्धोत्पादन व शेतीकाम) यासाठी ओळखली
जाते.
सद्यस्थितीत या
प्रकल्पात होलदेव व देवणी वंशाचे एकूण २०२ पशुधन असून, त्यापैकी देवणी गोवंशाची संख्या ९५ आहे.
या यशस्वी सहभागासाठी
विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. डी. व्ही.
बैनवाड तसेच शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. देशमुख,
तसेच श्री. जी. पी. भोसले, श्री. रवी काळे,
श्री. विश्वंभर शिंदे, श्री. निवृत्ती द्वारे,
श्री. महेंद्र कचरे, श्री. माणिक शिंदे आदी अधिकारी
व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.


