Sunday, November 22, 2026

वनामकृविच्या २८ व्या दीक्षांत समारंभात २९ विद्यार्थ्यांना आचार्य (पीएच.डी.) पदवी प्रदान

 विविध कृषि व संलग्न विषयांतील संशोधकांचा गौरव; संशोधन क्षेत्रातील योगदानाला प्रोत्साहन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या २८ व्या दीक्षांत समारंभात विविध कृषि व संलग्न विषयांमध्ये संशोधन पूर्ण केलेल्या एकूण २९ विद्यार्थ्यांना आचार्य (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली. दिनांक २० नोव्हेंबर २०२६ रोजी विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात आयोजित या समारंभात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इंद्र मणी व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली.

पदवी प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये कृषिविद्या (Agronomy) – ६ विद्यार्थी : हळगे स्वप्निल शिवाजीराव, पवार अवधूत दिनकर, कोतूरवार मेघा रामलू, सय्यद शिरीन जहां रहीम, शिंदे प्रिया पंजाबराव व पुल्लमोल्ला नीष्मा.

कृषि अर्थशास्त्र (Agricultural Economics) – ४ विद्यार्थी : ठोंबरे राहुल अशोक, हाडोळकर सचिन बापुराव, प्रत्यूष कुमारी राठ व लोहार सुदर्शन श्रीराम.

वनस्पती रोगशास्त्र (Plant Pathology) – २ विद्यार्थी : बुर्गुटे कनिफनाथ अण्णासाहेब व कुंभार अमोल सुभाष.

कीटकशास्त्र (Entomology) – २ विद्यार्थी : काळे ऐश्वर्या संजय व घोडेराव तृप्ती नागेशेन.

अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान (Food Processing Technology) – ३ विद्यार्थी : जोशी मोनाली मोहनराव, गिरी सचिन अरुण व अनेराव किशोर काशिनाथराव.

मृदाशास्त्र (Soil Science) – १ विद्यार्थी : पारदेशी निकिता दत्तात्रय.

आनुवंशिकी व वनस्पती प्रजनन (Genetics and Plant Breeding) – १ विद्यार्थी : गायवाल कृष्णा बालासाहेब.

वनस्पती शरीरक्रियाशास्त्र (Plant Physiology) – १ विद्यार्थी : हिवरे विशाल श्रीधर.

फलशास्त्र (Fruit Science) – १ विद्यार्थी : मांजरे प्रवीण बापुराव.

कृषि विस्तार शिक्षण (Agricultural Extension Education) – १ विद्यार्थी : खंदारे अंकुश व्यंकटी.

मृद व जलसंधारण अभियांत्रिकी (Soil and Water Conservation Engineering) – १ विद्यार्थी : भेंडेकर मोतीराम तुकाराम.

प्रक्रिया व अन्न अभियांत्रिकी (Processing and Food Engineering) – १ विद्यार्थी : कळमनुरीकर शलाका शिरीष.

कृषि यंत्रे व शक्ती अभियांत्रिकी (Farm Machinery and Power Engineering) – २ विद्यार्थी : हरकळ अनिल ज्ञानेश्वर व काळबांडे विशाल दशरथराव.

सिंचन व निचरा (Irrigation and Drainage) – १ विद्यार्थी : भोगील युवराज कांतिलाल.

अन्न व पोषणशास्त्र (Food and Nutrition) – २ विद्यार्थी : लंगोटे एकनाथ अश्रोबा व संगेकर दिपाली सखाराम.

अशा प्रकारे विविध कृषि व संलग्न विषयांमध्ये उच्चस्तरीय संशोधन पूर्ण करून पीएच.डी. पदवी संपादन करणाऱ्या २९ संशोधकांचा या दीक्षांत समारंभात गौरव करण्यात आला. या विद्यार्थ्यांनी केलेले संशोधन कृषि व संलग्न क्षेत्रातील ज्ञानवृद्धी, तंत्रज्ञान विकास आणि भविष्यातील संशोधनाला नवी दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. विद्यापीठाच्या उच्च शिक्षण व संशोधन क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण कार्याचे हे महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे.