मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या विस्तार शिक्षण संचालनालय, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने
‘रब्बी पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. हा
कार्यक्रम गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता
विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात येथे होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वित्त, नियोजन, कृषि, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री मा. ना. ॲड. श्री. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते होणार आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला आणि बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा पालकमंत्री
(परभणी जिल्हा) मा. ना. श्रीमती
मेघना साकोरे-बोर्डीकर, परभणी महानगरपालिकेचे महापौर मा. श्री. सय्यद इकबाल सय्यद खाजा आणि जिल्हा परिषदेच्या
अध्यक्षा श्रीमती लता विजयकुमार वाकळे या विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि राहणार
आहेत.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभा सदस्य
मा. खा. अशोक चव्हाण, राज्यसभा
सदस्य मा. खा. डॉ. अजित गोपछडे, राज्यसभा सदस्य मा. खा.श्री रामाराव वडकुते, लोकसभा
सदस्य मा. खा. श्री. संजय जाधव, विधान परिषद सदस्य मा. आ. श्री. सतीश चव्हाण, विधान
परिषद सदस्य मा. आ. श्री. विक्रम काळे,
विधान परिषद सदस्य मा. आ. श्री. सईद खान शेरगुल खान, विधानसभा
सदस्य मा. आ. डॉ. राहुल पाटील, विधानसभा सदस्य मा. आ.
श्री रत्नाकर गुट्टे, विधानसभा सदस्य मा. आ. श्री. बालाजी कल्याणकर,
विधानसभा सदस्य मा. आ. श्री राजेश विटेकर, विधानसभा सदस्य
मा. आ. श्रीमती श्रीजया चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.
विशेष उपस्थितीत महाराष्ट्र
कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष मा. श्री. तुषार पवार, महाराष्ट्र
शासनाच्या कृषि विभागाचे सचिव माननीय
डॉ. परिमल सिंह (भाप्रसे),
महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप स्वामी (भाप्रसे), भारतीय कृषि अनुसंधान
परिषदेच्या नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन वापर नियोजन ब्युरोचे
संचालक माननीय डॉ. एन. जी. पाटील, परभणीचे जिल्हाधिकारी माननीय श्री संजयसिंह चव्हाण
(भाप्रसे), पोलीस अधीक्षक माननीय श्री पंकज कुमावत (भापोसे), जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्रीमती नतिशा माथुर (भाप्रसे) आदी मान्यवर आहेत.
या कार्यक्रमास
विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संचालक संशोधन डॉ. भगवान आसेवार,
कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक
कशाळकर आणि नियंत्रक श्रीमती भाग्यश्री
जाधव यांची प्रमुख उपस्थिती
राहणार आहे.
या रब्बी पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शनात शेतकरी बांधवांना रब्बी हंगामातील
विविध पिकांचे नियोजन, आधुनिक कृषि तंत्रज्ञान, पीक उत्पादनवाढीच्या उपाययोजना तसेच विद्यापीठाने विकसित केलेल्या कृषि तंत्रज्ञानाची
माहिती मिळणार आहे. परभणी व परिसरातील शेतकरी, कृषि विभागाचे
अधिकारी, कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि संबंधितांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक
संचालक विस्तार शिक्षण डॉ. राकेश आहिरे, परभणीचे
आत्मा विभागाचे संचालक श्री. दौलत चव्हाण आणि जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. भास्कर
कोळेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तांत्रिक सत्रात मार्गदर्शन
पीक परिसंवादाच्या तांत्रिक सत्रात हवामान अंदाज, पर्जन्यमानाची
सद्यपरीस्थिती व पिकांचे व्यवस्थापन, सुधारित हरभरा, रब्बी तेलबिया, रब्बी ज्वार,
गहू, रब्बी भाजीपाला या पिकांचे लागवड तंत्रज्ञान, शेतीला जोडधंदा म्हणून पशुधनाचे
महत्त्व, सद्य:स्थितीतील कापूस, तूर व हळद पिकांचे संरक्षण व व्यवस्थापन आदी
विषयावर विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.
विद्यापीठ निर्मित बियाणे विक्री
कार्यक्रमाची सुरवात विद्यापीठ निर्मित बियाणे विक्रीने होणार आहे.
विक्रीसाठी उपलब्ध बियाणे व त्याचे दर सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे
आणि बीज प्रक्रिया केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संतोष शिंदे यांनी पुढील प्रमाणे
कळविले आहेत.
ज्वारीचा परभणी शक्ती, सुपर मोती, परभणी मोती,
परभणी ज्योती विक्रीस उपलब्ध आहे. प्रत्येक वाणाची बॅग ४ किलोची
असून प्रति बॅगचा दर ५०० रुपये तर हुरड्याचा परभणी वसंत हा वाण १ किलोच्या बॅग
मध्ये उपलब्ध असून प्रति बॅग १५० रुपये दर आहे.
हरभरा वाण बीडीएनजीके ७९८ (काबुली), बीडीएनजी ७९७ (आकाश), फुले विक्रम व परभणी चना उपलब्ध आहे. दहा किलोची बॅगची पॅकिंग असून
बीडीएनजीके ७९८ या वाणाच्या दर १२५० रुपये तर हरभराच्या इतर वाणाचा दर ९००
रुपये प्रति बॅग असा आहे.
जवसाचा एलएसएल ९३ हा वाण उपलब्ध असून ५ किलोची बॅग ६५० रुपये तर २ किलोची
बॅग २६० रुपये दरानुसार उपलब्ध आहे.
करडईचे पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा), पीबीएनएस १८४, पीबीएनएस ८६ (परभणी पूर्णा),
पीबीएनएस १२ (परभणी कुसुम) उपलब्ध असून ५ किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असून बॅगचा दर ६५०
रुपये असा आहे.
गहू या पिकाचे वाण एनआयएडब्ल्यू १९९४ (फुले समाधान) आणि एनआयएडब्ल्यू ३०१
(फुले त्र्यंबक) उपलब्ध असून बॅग पॅकिंग ४० किलोची आहे. याचा दर २००० रुपये प्रति
बॅग असा आहे.
तिळाची टीएलटी- १० जात १ किलोची बॅग २५० रुपये, सुर्यफूलाची एल.एस.एफ.एच-१७१ या वाणाच्या २ किलोची बॅग १००० रुपये दराने मिळणार आहे. बाजराचे ए.एच.बी-१२०० हा वाण १.५ किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असून २८५ रुपये प्रती बॅग असा दर आहे. भेंडीची परभणी क्रांती जात २० ग्रॅमचा दर ३० रुपये तर मिरचीचे वाण परभणी तेजस आणि पीबीएनसी-१७ यासाठी १० ग्रॅमचा दर ४० रुपये असा आहे. याप्रमाणे बियाणे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना खरेदीसाठी विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेले आहे.
