Monday, September 7, 2026

क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त वनामकृवित अभिवादन

 


क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या सिम्पोजियम सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. यावेळी त्यांनी क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री. पुरभा काळे, चाकूर (जि. लातूर) येथील पदव्युत्तर कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे तसेच विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात उपकुलसचिव (सामान्य प्रशासन) श्री. पद्माकर पाटील यांनी क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जीवनकार्याची माहिती वाचून दाखविली व त्यांच्या शौर्यपूर्ण कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

यावेळी उपकुलसचिव (विद्या) डॉ. गजानन भालेराव, सहाय्यक कुलसचिव श्री. राम खोबे तसेच प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.