Tuesday, September 15, 2026

भारतीय ज्ञान प्रणालीतून कृषि क्षेत्राच्या आत्मनिर्भरतेचा मार्ग : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 हिमाचल प्रदेशातील अर्णी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन

हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील अर्णी विद्यापीठ, काठगढ, इंदोरा येथे “भारतीय ज्ञान प्रणाली : गौरवशाली भूतकाळापासून विकसित व आत्मनिर्भर भारत @२०४७” या विषयावर दिनांक ११ व १२ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप दिनांक १२ सप्टेंबर रोजी झाला. समारोप सत्रासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. अर्णी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) राम किंकर पांडे यांनी त्यांना हे निमंत्रण दिले होते.

यावेळी प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कृषि क्षेत्रासाठी भारतीय ज्ञान प्रणाली – २०४७ पर्यंत आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल (Indian Knowledge System for Agriculture – Pathway towards a Self-Reliant India @2047)” या विषयावर मार्गदर्शन केले.

आपल्या मार्गदर्शनात त्यांनी भारताच्या कृषि क्षेत्राने स्वातंत्र्योत्तर काळात केलेल्या उल्लेखनीय प्रगतीचा आढावा घेतला. १९५० च्या अन्नटंचाईच्या परिस्थितीतून भारताने अन्नउत्पादनातील स्वयंपूर्णतेकडे आणि त्यानंतर अन्नसुरक्षितता व अन्न अधिशेष राष्ट्राकडे केलेला प्रवास हा देशाच्या कृषि संशोधन, तंत्रज्ञान, शेतकरी आणि कृषि शिक्षणाच्या योगदानाचा महत्त्वपूर्ण परिणाम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

भारतीय ज्ञान परंपरेच्या संदर्भात बोलताना त्यांनी प्राचीन व शाश्वत भारतीय ज्ञान आणि चिंतनाची समृद्ध परंपरा ही आजच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणासाठी (NEP-2020) मार्गदर्शक ठरत असल्याचे सांगितले. भारतीय ज्ञान व शिक्षण पद्धतीतील मूल्यांचा आधुनिक शिक्षण व्यवस्थेत प्रभावीपणे समावेश करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. उच्च शिक्षण संस्थांमध्ये “प्राचीन भारतीय ज्ञान केंद्र (Centre for Ancient Indian Knowledge)” सारख्या केंद्रांची स्थापना करून भारतीय ज्ञानपरंपरेतील समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा विचार त्यांनी मांडला.

प्राचीन भारतातील तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला आणि वल्लभी यांसारख्या जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षण संस्थांचा संदर्भ देताना त्यांनी या संस्थांमध्ये बहुविषयक शिक्षण व संशोधनाला मोठे महत्त्व होते आणि जगभरातून विद्यार्थी व विद्वान तेथे येत असत, असे नमूद केले. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून भारतातील उच्च शिक्षण संस्थांना पुन्हा जागतिक दर्जाची ओळख मिळवून देण्याची दिशा निश्चित झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतीय ज्ञान प्रणालीचा कृषि क्षेत्राशी असलेला संबंध अधोरेखित करताना त्यांनी पारंपरिक भारतीय कृषि ज्ञान, स्थानिक संसाधनांचा कार्यक्षम वापर, शाश्वत शेती आणि आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान यांचा समन्वय साधण्याची आवश्यकता व्यक्त केली. भारतीय ज्ञानपरंपरेतील अनुभवाधारित ज्ञानाला आधुनिक कृषि संशोधनाशी जोडल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ, संसाधनांचे संवर्धन आणि कृषि क्षेत्राची शाश्वतता साध्य होण्यास मदत होईल, असा विचार त्यांनी मांडला.

विकसित व आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी ज्ञान, संशोधन, शिक्षण, नवोन्मेष आणि भारतीय मूल्यपरंपरा यांचा समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कृषि विद्यापीठांनी केवळ शिक्षण आणि संशोधनापुरते मर्यादित न राहता शेतकरी, समाज आणि राष्ट्राच्या गरजा लक्षात घेऊन ज्ञाननिर्मिती व तंत्रज्ञान हस्तांतरणात अग्रणी भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.

परिषदेच्या विविध तांत्रिक सत्रांमध्ये भारतीय ज्ञान परंपरा, शिक्षण, संस्कृती, व्यवस्थापन, विज्ञान, तंत्रज्ञान, कृषि, मानवी मूल्ये आणि सामाजिक विषयांवर सखोल विचारमंथन करण्यात आले. देश-विदेशातील शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, प्राध्यापक आणि युवा संशोधकांनी सहभाग नोंदवून विविध विषयांवरील शोधनिबंध सादर केले. ऑनलाइन माध्यमातूनही तज्ज्ञांची निमंत्रित व्याख्याने आयोजित करण्यात आली.

कृषि शिक्षण, संशोधन आणि उच्च शिक्षण प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव तसेच शैक्षणिक नेतृत्वाची व्यापक पार्श्वभूमी असलेले कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन परिषदेसाठी विशेष महत्त्वपूर्ण ठरले. त्यांच्या विचारांमुळे भारतीय ज्ञान प्रणाली आणि आधुनिक कृषि विज्ञान यांचा समन्वय साधून आत्मनिर्भर कृषि आणि विकसित भारत @२०४७ या संकल्पनेला ज्ञानाधिष्ठित दिशा देण्यास महत्त्वपूर्ण प्रेरणा मिळाली.

परिषदेच्या समारोपप्रसंगी प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी “Coming together is a beginning; Keeping together is progress; Working together is success” हा संदेश देत ज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्नांद्वारे विकसित व आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी पुढे जाण्याचे आवाहन केले. 


For English

Indian Knowledge System: A Pathway to Self-Reliance in Agriculture: Hon’ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani

 

Guidance as Chief Guest at the International Conference organized by Arni University, Himachal Pradesh

 

The two-day International Conference on “Indian Knowledge System: From a Glorious Past to a Developed and Self-Reliant India @2047”, organized on September 11 and 12, 2026, at Arni University, Kathgarh, Indora, Kangra district, Himachal Pradesh, concluded on September 12. Hon’ble Vice-Chancellor of Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Prof. (Dr.) Indra Mani, was invited as the Chief Guest for the valedictory session. The invitation was extended by the Hon’ble Vice-Chancellor of Arni University, Prof. (Dr.) Ram Kinkar Pandey.

On this occasion, Prof. (Dr.) Indra Mani delivered an address on “Indian Knowledge System for Agriculture – Pathway towards a Self-Reliant India @2047.”

In his address, he reviewed the remarkable progress made by Indian agriculture since independence. He highlighted that India’s journey from the food scarcity situation of the 1950s to self-sufficiency in food production and subsequently to becoming a food-secure and food-surplus nation has been the result of the significant contributions of agricultural research, technology, farmers, and agricultural education.

Speaking about the Indian knowledge tradition, he stated that India’s rich heritage of ancient and sustainable knowledge and thought provides important guidance for the National Education Policy (NEP-2020). He emphasized the need to effectively integrate the values of Indian knowledge and traditional education systems into the modern education system. He also proposed establishing centres such as the “Centre for Ancient Indian Knowledge” in higher education institutions to carry forward India’s rich intellectual heritage to the younger generation.

Referring to world-class ancient Indian institutions of higher learning such as Takshashila, Nalanda, Vikramashila, and Vallabhi, he noted that multidisciplinary education and research were given considerable importance in these institutions, which attracted students and scholars from across the world. He further stated that the National Education Policy has provided a clear direction for restoring global recognition to India’s higher education institutions.

Highlighting the relationship between the Indian Knowledge System and agriculture, he emphasized the need to integrate traditional Indian agricultural knowledge, efficient utilization of local resources, sustainable farming practices, and modern science and technology. He stated that connecting experience-based knowledge from the Indian knowledge tradition with modern agricultural research can contribute to increased farm productivity, conservation of natural resources, and sustainability in the agricultural sector.

He stated that the creation of a developed and self-reliant India requires the integration of knowledge, research, education, innovation, and Indian value systems. He called upon agricultural universities to go beyond the conventional boundaries of education and research and play a leading role in knowledge creation and technology transfer by keeping in view the needs of farmers, society, and the nation.

During the various technical sessions of the conference, extensive deliberations were held on the Indian knowledge tradition, education, culture, management, science, technology, agriculture, human values, and social issues. Academicians, researchers, professors, and young researchers from India and abroad participated in the conference and presented research papers on various topics. Invited lectures by experts were also organized through online mode.

With his extensive experience in agricultural education, research, higher education administration, and academic leadership, the guidance of Prof. (Dr.) Indra Mani proved particularly significant for the conference. His insights provided important inspiration for giving a knowledge-based direction to the concept of self-reliant agriculture and Developed India @2047 through the integration of the Indian Knowledge System with modern agricultural science.

At the valedictory session of the conference, Prof. (Dr.) Indra Mani conveyed the message, “Coming together is a beginning; Keeping together is progress; Working together is success,” and called upon all stakeholders to move forward through collective efforts in knowledge, research, and innovation towards building a developed and self-reliant India.