Friday, May 11, 2018

हुमणी किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करा वेळीच व्यवस्थापन......वनामकृविच्या किटकशास्त्रज्ञांचा सल्ला

मराठवाडयातील काही भागात गेल्‍या दोन ते तीन वर्षापासुन हुमणी किडीा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात आढळुण येत असुन या कीडीचे वेळीच व्‍यवस्‍थापन केल्‍यास प्रादुर्भाव रोखु शकतो. हुमणी कीडींचे कोष अवस्‍थेत जमिनीत राहतात, पाऊस पडल्‍यास सुप्त्‍ा अवस्थेतील भुंगे जमिनीतुन बाहेर पडत आहे. हुमणीच्या प्रौढ, अंडी, अळी कोष या चार अवस्था असतात. प्रौढ अवस्था ही बाभुळ, कडुलिंब, बोर . झाडावर उपजिविका करतात. तर अळी अवस्था पिकांच्या मुळा कुडतूडुन नुकसान करते. प्रौढ भुंगेरे जमिनीतुन निघाल्यानंतर ते बाभुळ, कडुलिंब, बोर . झाडावर राहतात त्यांचे मिलन होऊन जमिनीत अंडी देतात. अंडयातून निघालेल्या अळया पिकानां नुकसान पोहचवितात. त्यामुळे सध्या जमिनीतुन निघालेल्या हुमणीच्या प्रौढ भुंगेऱ्याचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. प्रौढ भुंगेऱ्याचे व्यवस्थापन अंडी घालण्या अगोदरच झाल्यामुळे अळीपासून पिकांना होणारे नुकसान टाळता येते

प्रौढ भुंगेऱ्याचे व्यवस्थापन
-    झाडाच्या फांदया हालवून खाली पडलेल्या भुंगेऱ्याचा बंदोबस्त करावा. मार्च ते जून महिन्‍यात चांगला पाऊस पडताच सुर्यास्तानंतर सुप्तावस्थेतील प्रौ भुंगेरे जमिनीतून बाहेर येऊन बाभूळ, कडुलिंब इत्यादी झाडावर पाने खाण्यासाठी मिलनासाठी जमा होतात. झाडावर जमा झालेली भुंगेरे रात्री 8 ते 9 वाजता बांबुच्या काठीच्या साहाय्याने झाडाच्या फांदया हालवून खाली पाडावेत आणि ते हाताने गोळा करुन रॉकेलमिश्रीत पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. हा उपाय प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या करणे गरजेचे आहे. तसेच जो पर्यंत जमिनीतून भुंगेरे निघतात तोपर्यंत हा कार्यक्रम चालू ठेवणे गरजेचे आहे.
-    प्रकाश सापळे किंवा पेट्रोमॅक्साचा वापर करुन देखील प्रौढ भुंगेरे जमा करता येतात. हे प्रकाश सापळे किंवा पेट्रोमॅक्स सर्व शेतकऱ्यांनी शेतामधील घर, झोपडी, विहीरीजवळ किंवा झाडावर लावावेत. सापळयाजमा झालेले भुंगेरे नष्ट करावेत. हे सापळे साधारपणे संध्याकाळी 7.30 ते 8.30 या कालावधीत लावावेत.
-    किटकनाशकांची फवारणी केलेल्या बाभूळ, कडुनिंब यांच्या फांदया शेतामध्ये ठिकठिकाणी ठेवावी. रात्रीला भुंगेरे फांदयावरील पाने खाल्यामुळे रुन जातील.
-    जमिनीतून प्रौढ भुंगेरे निघण्याच्या कालावधीत बाभूळ, कडुनिंब इत्यादी झाडावर किटकनाशकाची फवारणी करावी.

वरिल प्रमाणे शेतकऱ्यांनी हुमणीच्या प्रौढ भुंगेऱ्याचे सामूहीकरित्या व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असे आवाहन किटकशास्‍त्रज्ञ डॉ. पी. आर. झंवर प्रा. बी. व्ही. भेदे यांनी केले आहे.

Wednesday, May 9, 2018

वनामकृविच्‍या विद्यार्थिंनीसाठी अद्ययावत व्‍यायामशाळेची सुविधा


आज महिलांसाठी शिक्षणासह विविध संधीची दालने खुली झाली आहेत, कृषि शिक्षणाकडेही मुलींचा मोठा ओढा दिसुन येत आहे. परंतु शैक्षणिक कालावधीत विद्यार्थ्‍यींनीनी आपल्‍या आरोग्‍याकडे दुर्लक्ष करतात. हे लक्षात घेता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या लातुर, उस्‍मानाबाद, बदनापुर व परभणी येथील कृषीच्‍या विद्यार्थीनीच्‍या वसतिगृहामध्‍ये अद्ययावत व्‍यायामशाळेची सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे. विद्यार्थ्‍यींनीच्‍या आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने राष्‍ट्रीय महिला आयोगाने प्रत्‍येक शिक्षण संस्‍थामध्‍ये सॅनिटरी पॅड व्‍हेंडिंग मशीन बसविण्‍यासाठी सुचविले होते. त्‍याअनुषगांने विद्यापीठांतर्गत असलेल्‍या विविध घटक महाविद्यालये व मुलींच्‍या वसतीगृहातील प्रसाधनगृहात व्‍हेडिंग मशीन बसविण्‍यात आले असुन वापरलेले नॅपकिन नष्‍ट करण्‍यासाठी डिस्‍टॉयर मशीनचीही विद्यापीठ परिसरात सुविधा करण्‍यात आली असल्‍याचे शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विलास पाटील यांनी सांगितले.

Tuesday, May 8, 2018

आदर्श मानवी जीवन घडवण्‍यासाठी आजही महापुरूषांच्‍या विचारांची गरज.... अल्‍पसंख्‍याक विकास विभागाचे प्रधान सचिव मा. श्‍याम तागडे

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, महात्मा फुले, भगवान बौध्‍द, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंगी नितिमत्ता, शील व त्याग होता. त्यांच्‍या विचारधारा समान होत्‍या, आदर्श मानवी जीवन घडवण्यासाठी याच विचारांची आजही गरज असुन यासाठी नि:स्वार्थपणे सर्व समाजास एकत्र यावे लागेल, असे प्रतिपादन अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव मा. श्‍याम तागडे यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने महात्मा ज्यातिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सानिमित्य दि. 6 मे रोजी आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार आणि मिशया विषयांवरील व्याख्यानाच्‍या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू हे होते तर व्‍यासपीठावर शिक्षण संचलक डॉ. विलास पाटील, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ. गजेंद्र लोंढे, प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले, महासंघाचे अध्यक्ष डॉ गिरीधारी वाघमारे, महासचिव प्रा. अनिष कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. श्‍याम तागडे पुढे म्‍हणाले की, मानवांनी लोभ, क्रोध, मोह दी गोष्टी बाजूला सारुन एकमेकांचा आदर केला तर मानवी जीवनाचे निश्चितच कल्याण होईल. महापुरूषांमध्‍ये उच्च पातळीचे शील होते, त्‍यांच्‍या कार्यामध्ये मोठे बळ होते, म्हणुनच त्यांच्या ज्ञानाचा उपयोग भारतीय समाजाची विषमता दुर करण्यासाठी झाला आहे. प्रत्‍येक मनुष्‍याच्‍या अंगी नित्तिमता, शी, करूणा असेल आणि अष्‍टशिलांचे पालन केले तर मानवी जीवनाचे कल्याण होऊन आदर्श राष्ट्र निर्माण होऊ कते. महापुरूषांच्या जयंत्या सोंग करून साज-या करू नका तर शुध्‍द आचरणाने, शीलाचे पालन करुनच जयंती साजरी करण्या अर्थ आहे. लहान मुलांवर चांगले संस्‍कार करण्‍याची जबाबदारी पालकांची असुन भरपुर धन-दौलत असुन देखील शाश्‍वत सुख, शांती लाभत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केल.
अध्यक्षीय समारोप कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्‍वरलू म्‍हणाले की, आजही राष्ट्राला डॉ. बाबसाहेंबाच्या विचाराची गरज असुन शिक्षणाचे महत्‍व त्‍यांनी ओळखले होते, त्‍यांनी अनेक पदव्‍या विदेशातील प्रतिष्‍ठीत शैक्षणिक संस्‍थेतुन प्राप्‍त केल्‍या. विद्यापीठातील प्राध्‍यापकांना परदेशात प्रशिक्षणाच्‍या सुविधासाठी विद्यापीठ प्रयत्‍नशील राहील, असे सांगुन मागासवर्गीयांच्या न्याय हक्कासाठी व प्रलंबित प्रश्‍नांसाठी विद्यापीठ शासन दरबारी योग्‍य तो पाठपुरावा करील असे आश्‍वासन त्‍यांनी दिले.
यावेळी कुलसचिव डॉ. गजेंद्र लोंढे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात संबोधी अकादमीचे अध्यक्ष भिमराव हत्तिअंबिरे यांना महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन सन्‍माननित केल्‍याबाबत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गिरीधारी वाघमारे यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. निता गायकवाड यांनी केले तर आभार प्रा. अनिस कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच हरातील नागरीक मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Thursday, May 3, 2018

वनामकृवित अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव मा. श्‍याम तागडे यांचे व्याख्यान

भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती महोत्‍सवानिमित्‍त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्‍या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार आणि मिशनया विषयावर भारतीय प्रशाकिय सेवेतील अधिकारी सुप्रसिद्ध विचारवंत अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव मा. श्‍याम तागडे यांच्‍या व्याख्यानाचे आयोजन दिनांक 6 मे रोजी सायंकाळी 4.30 वाजता कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात आले असुन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. विलास पाटील, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, संचालक विस्तार शिक्षण डॉ. प्रदिप इंगोले, कुलसचिव डॉ. गजेंद्र लोंढे आदींची उपस्थिती लाभणार आहे. सदरिल कार्यक्रमास जास्‍तीस जास्‍त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, शाखा वनामकृवि, परभणी वतीने करण्यात आले आहे.