देशी गोवंश, नैसर्गिक शेती व मसाला पिकांवर परिसंवाद; १५ ऑगस्ट रोजी वनामकृवित आयोजन
भारत सरकारची राष्ट्रीय
कृषि विकास योजना, परभणी येथील वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने कीटकशास्त्र
विभागातील ‘नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय उत्पादनास प्रोत्साहन
देण्यासाठी प्रगत कीटकनाशक तपासणी व अवशेष विश्लेषण प्रयोगशाळेचे’ उद्घाटन तसेच
‘देशी गोवंश, नैसर्गिक शेती व मसाला पिके’ या
विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथे शनिवार,
दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता विद्यापीठाच्या क्रीडा
संकुलातील सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे
प्रतिकुलपती मा. ना. श्री. दत्तात्रय
भरणे यांच्या शुभहस्ते करण्यात होणार आहे. कार्यक्रमास वित्त, नियोजन, कृषि, मदत व
पुनर्वसन, विधी व
न्याय, कामगार
राज्यमंत्री मा. ना. ॲड. श्री. आशिष जयस्वाल, सार्वजनिक
आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि
स्वच्छता, ऊर्जा, महिला आणि
बालविकास, सार्वजनिक
बांधकाम (सार्वजनिक
उपक्रम) राज्यमंत्री
तथा पालकमंत्री
(परभणी जिल्हा) मा. ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर तसेच परभणी महानगर पालिकेचे महापौर मा. श्री. सय्यद इकबाल
सय्यद खाजा आणि परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती लता विजयकुमार वाकळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि हे राहणार आहेत.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभा सदस्य मा. खा. अशोक चव्हाण, राज्यसभा सदस्य
मा. खा. डॉ. अजित गोपछडे, राज्यसभा सदस्य मा. खा.श्री रामाराव वडकुते, लोकसभा
सदस्य मा. खा. श्री. संजय जाधव, विधान परिषद सदस्य मा. आ. श्री. सतीश चव्हाण, विधान
परिषद सदस्य मा. आ. श्री. विक्रम काळे, विधान परिषद सदस्य
मा. आ. श्री. सईद खान, विधानसभा सदस्य मा. आ. डॉ. राहुल पाटील, विधानसभा सदस्य मा. आ. श्री रत्नाकर गुट्टे, विधानसभा
सदस्य मा. आ. श्री. बालाजी कल्याणकर, विधानसभा सदस्य मा. आ. श्री राजेश विटेकर,
विधानसभा सदस्य मा. आ. श्रीमती श्रीजया चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.
तसेच कृषि परीषदेचे उपाध्याक्ष मा. श्री. तुषार पवार, महाराष्ट्र
शासनाच्या कृषि विभागाचे माननीय सचिव डॉ परिमल सिंग (भाप्रसे), पुणे येथील कृषि परिषदेचे महासंचालक माननीय श्री राहुल रंजन महिवाल (भाप्रसे), महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचे माननीय आयुक्त श्री
सुरज मांढरे, महाराष्ट्र शासनाचे कृषि प्रक्रिया नियोजन संचालक माननीय श्री विनयकुमार
आवटे, माननीय जिल्हाधिकारी श्री संजयसिंह चव्हाण (भाप्रसे), माननीय पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत (भापोसे), जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्रीमती नतिशा माथुर (भाप्रसे) आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती असणार आहे.
याबरोबरच शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री
जाधव, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
परिसंवादाच्या
माध्यमातून देशी गोवंशाचे संवर्धन,
नैसर्गिक शेती पद्धतींचा प्रसार, सेंद्रिय
उत्पादनास प्रोत्साहन तसेच मसाला पिकांच्या उत्पादन व मूल्यवर्धनाबाबत शेतकरी,
विद्यार्थी आणि संबंधित घटकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर नव्याने सुरू होणाऱ्या कीटकनाशक तपासणी व अवशेष विश्लेषण
प्रयोगशाळेमुळे शेतमालातील कीटकनाशक अवशेषांची वैज्ञानिक पद्धतीने तपासणी करण्यास
मदत होणार असून, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण कृषी उत्पादनाच्या
दृष्टीने या सुविधेचे महत्त्व अधोरेखित होणार आहे. विद्यापीठाच्या या उपक्रमामुळे
नैसर्गिक व सुरक्षित शेतीला चालना मिळण्याबरोबरच शेतमालाच्या गुणवत्तेबाबत
जनजागृती होण्यास मदत होणार आहे. तरी या कार्यक्रमात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी
सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार
शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, परभणी आत्मा संचालक श्री दौलत चव्हाण, जिल्हा
अधीक्षक कृषि अधिकारी श्री भास्कर कोळेकर (परभणी) आणि श्री प्रदीप कच्छवे (हिंगोली)
यांनी केले आहे.
.png)