Saturday, August 1, 2026

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात अभिवादन

 

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता विद्यापीठाच्या सिम्पोजियम सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते. त्यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी कुलसचिव श्री. पुरभा काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात उपकुलसचिव (सामान्य प्रशासन) श्री. पद्माकर पाटील यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा, साहित्यसंपदेचा तसेच सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रनिर्मितीतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा परिचय उपस्थितांना करून दिला. समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांच्या वेदना व संघर्षाला आपल्या साहित्याद्वारे प्रभावीपणे वाचा फोडणारे अण्णा भाऊ साठे यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी सहाय्यक कुलसचिव श्री. राम खोबे तसेच प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

कार्यक्रमात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य, लोकजागृती आणि समतामूलक समाजनिर्मितीसाठीच्या अमूल्य योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.