महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाचे प्रतिकुलपती माननीय ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत अन्न तंत्र महाविद्यालयातील अत्याधुनिक व्यवसाय विकास
प्रक्रिया केंद्रास (कॉमन इन्क्युबेशन सेंटर)
दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी भेट देऊन केंद्रामध्ये सुरू असलेल्या उद्योजकता विकास, संशोधन व तंत्रज्ञानविषयक उपक्रमांची पाहणी केली.
भेटीदरम्यान माननीय कृषिमंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी केंद्रातील
विविध उपक्रमांची माहिती घेतली. शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन, उद्योजकता विकास तसेच
शाश्वत शेतीच्या दृष्टीने विकसित करण्यात येत असलेल्या तंत्रज्ञानाबाबत त्यांनी
आढावा घेतला.
यावेळी विधानसभा सदस्य मा. आ. डॉ. राहुल पाटील, मा. आ. श्री. रत्नाकर गुट्टे, मा. आ.
श्री. बालाजी कल्याणकर, मा. आ. श्री. राजेश विटेकर, विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण
संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे,
कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता
श्री. दीपक कशाळकर, अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. प्रविण वैद्य, विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम व डॉ.
हरिहर कौसडीकर तसेच अन्न तंत्र महाविद्यालयातील विविध विभागांचे विभाग प्रमुख
उपस्थित होते.
भेटीदरम्यान अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर यांनी सामायिक उष्मायन
केंद्रामध्ये सुरू असलेल्या विविध संशोधन प्रकल्पांची, विकसित तंत्रज्ञानाची तसेच शेतमाल प्रक्रिया व
मूल्यवर्धनाच्या माध्यमातून उद्योजकता निर्मितीसाठी राबविण्यात येणाऱ्या
उपक्रमांची माननीय कृषिमंत्र्यांना सविस्तर माहिती दिली.
शेतीमालाचे प्रक्रिया व मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासोबतच ग्रामीण भागात रोजगार व उद्योगाच्या संधी निर्माण करण्यासाठी विद्यापीठाच्या सामायिक उष्मायन केंद्राची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

