Sunday, August 16, 2026

वनामकृविच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ; विद्यापीठात चित्रकला प्रदर्शनाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते उद्घाटन

 

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय आणि कृषी महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या चित्रकृतींच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी  करण्यात आले.

या चित्रकला प्रदर्शनात कृषी महाविद्यालय, परभणी, उद्यानविद्या महाविद्यालय, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, पाथरी, कृषी महाविद्यालय, सेलू, MGM कृषी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर तसेच इतर महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या विविध कलाकृतींचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांमधून त्यांच्या कलात्मक कल्पकतेसोबतच सामाजिक, सांस्कृतिक व निसर्गविषयक संवेदनशीलतेचे दर्शन घडले.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांच्या विविध कलाकृतींची पाहणी करून त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. विद्यार्थी कृषीचे शिक्षण घेत असला तरी त्याच्यातील कलागुण आणि सर्जनशीलता त्याला विविध क्षेत्रांत यशस्वी करिअर घडविण्याची संधी देऊ शकते. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनिवडी आणि कौशल्यांना योग्य दिशा देत त्यातून भविष्यातील संधी निर्माण कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

या प्रसंगी संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम तसेच विद्यापीठातील सर्व वरिष्ठ अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

कृषी महाविद्यालय, परभणी येथील फाईन आर्ट ग्रुपच्या विद्यार्थ्यांच्या वतीने अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांच्या हस्ते माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे तैलचित्र भेट म्हणून प्रदान करण्यात आले. या कलाकृतीबद्दल माननीय कुलगुरूंनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अमोल सोनकांबळे, डॉ. संघर्ष शृंगारे तसेच फाईन आर्ट ग्रुपच्या विद्यार्थिनी गायत्री बिरादार, स्नेहल बसेवाड, रसिका पवार, श्रुतिका वारे, वैष्णवी शिंदे आणि सिद्धी रासवे यांनी परिश्रम घेतले.