महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळीतील थोर स्वातंत्र्यसैनिक, शेतकरी नेते आणि प्रतिसरकार चळवळीचे जनक क्रांतीसिंह नाना पाटील
यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे सोमवार, दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी
११.०० वाजता विद्यापीठाच्या सिम्पोजियम सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय संशोधन संचालक डॉ. भगवान
आसेवार उपस्थित होते. त्यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार
अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे तसेच
कुलसचिव श्री. पुरभा काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात उपकुलसचिव (सामान्य प्रशासन) श्री. पद्माकर पाटील यांनी
क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जीवनकार्याचा अल्प परिचय करून दिला. त्यांनी
सांगितले की, क्रांतीसिंह नाना पाटील यांनी
ब्रिटिश सत्तेविरुद्ध निर्भीडपणे लढा देत प्रतिसरकार या ऐतिहासिक लोकशाही
व्यवस्थेची स्थापना केली. सामाजिक न्याय, शेतकरी कल्याण,
स्वातंत्र्य, समता आणि जनसामान्यांच्या
हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे कार्य आजही राष्ट्रप्रेम,
लोकशाही मूल्ये आणि समाजसेवेची प्रेरणा देणारे असल्याचे त्यांनी
नमूद केले.
यावेळी प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या
संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प
अर्पण करून विनम्र अभिवादन केले व त्यांच्या राष्ट्रसेवा, त्याग आणि स्वातंत्र्यलढ्यातील अमूल्य योगदानाचे स्मरण
केले. कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
.jpeg)
.jpeg)

.jpeg)