Wednesday, March 6, 2019

सेंद्रीय शेतीत पशुधनाचा कार्यक्षम वापर शक्‍य...कृषि अभियंता डॉ. स्मिता सोळंकी


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांसाठी जिल्हानिहाय दोन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असुन याच शृंखलेमध्ये जालना व औरंगाबाद जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप दि. 2 मार्च रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि अभियंता डॉ. स्मिता सोळंकी हया होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन हैद्राबाद येथील केद्रीय कोरडवाहु शेती संशोधन संस्थेचे मुख्य शास्‍त्रज्ञ डॉ. मोहमद उस्मान, अपारंपारीक ऊर्जा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. आर. टि. रामटेके, सेंद्रीय शेती संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात डॉ. स्मिता सोळंकी म्‍हणाल्‍या की, सेंद्रीय शेतीखालील क्षेत्रात वेगाने वाढ होत असुन सेंद्रीय बाजरपेठ वाढत आहे. याचा शेतकऱ्याना लाभ घेण्यासाठी शास्त्रीय पध्दतीने सेंद्रीय शेती करावी असे सांगितले. सेंद्रीय शेतीमध्ये पशुधनाचा वापर आवश्यक असुन त्यापासुन केवळ निविष्ठांचाच नव्हे तर पशुधनाचा कार्यक्षम वापर केल्यास शेती कामे कमी खर्चात आणि जमिनीचे भौतिक गुणर्धम सुधारता येतील. सेंद्रीय शेती पशुधनाचा कार्यक्षम वापर केल्यास सेंद्रीय शेती यशस्वी करता येईल, असे त्‍या म्हणाल्या.
प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. मोहमद उस्मान यांनी आपल्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीमधील तत्वांची ओळख करुन दिली. आंतरपीक पध्दती आणि पीक फेर पालटयासारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब सेंद्रीय शेतीमध्ये करावा. मराठवाडा विभागातील तुरी सारख्या पिकांत सेंद्रीय ब्रॅड विकसीत केल्यास शेतकरी देशात आपली ओळख निर्माण करु शकतील असे त्‍यांनी सांगितले. डॉ. आर. टी रामटेके यांनी बायोगॅस सयंत्र आणि सेंद्रीय शेतीयांची सांगड घातल्यास शेतकऱ्यांना लाभ होईल असे सांगितले.
सेंद्रीय शेतीतील संकल्पना प्रमाणिकरण समजवण्यासाठी या प्रशिक्षणाचा लाभ झाल्याचे प्रशिक्षणार्थी शेतकरी ईश्वरदास वाघ यांनी सांगितले तर प्रशिक्षण हे शिस्तबध्द आणि नाविण्यपुर्ण पध्दतीने राबविण्यात आल्याची भावना राजेश जोगदंड यांनी व्यक्त केली. कार्यक्रमात सहभागी झालेल्या औरंगाबाद जालना जिल्हयातील प्रशिक्षणार्थी शेतकरी बंधु भगिनी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ. आनंद गोरे यांनी केले. सदरिल प्रशिक्षण कार्यक्रम कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण आणि संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या संकल्पनेतुन व मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. आनंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुनिल जावळे, अभिजीत कदम, प्रल्हाद गायकवाड, शितल ऊफाडे, बाळु धरबळे, सतिश कटरे, भागवत वाघ, सचिन रणेर, द्वारका काळे, मनिषा वानखेडे, नागेश सावंत, दिपक शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

Tuesday, March 5, 2019

मराठवाडयातील कृषि विज्ञान केंद्रास रेशीम प्रशिक्षण साहित्‍य व यंत्राचे वाटप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात रेशीम संशोधन केंद्राच्‍या वतीने राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेतील मंजूर निधितुन मराठवाडा विभागात रेशीम किटक संकरवाण कोष उत्पादन व रेशीम शेती तंत्रज्ञान प्रसार प्रकल्पातर्गत मराठवाडयातील कृषि विज्ञान केंद्राना रेशीम उद्योजक शेतक-यांना प्रशिक्षणाकरिता लागणारे बाल्य रेशीम किटक संगोपन स्थापन करण्या आवश्यक साहित्य व यंत्राचे वाटप दि. 2 मार्च रोजी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाप्रमुख पाहुणे म्हणून संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकरविस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांची उपस्थिती होती तर विद्यापीठ अभियंता डॉ. अशोक कडाळे, पशुशक्ती अभियांत्रीकी विभागाच्या प्रभारी अधिकारी, प्रा. स्मिता सोळंकी, किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर, केंद्रिय रेशीम बोर्डाचे शास्त्रज्ञ श्री ए जे करंडे आदींची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शनात कुलगूरू मा. डॉ. अशोक ढवण म्‍हणाले कि, जगात कच्या रेशीम उत्पादनात चीन नंतर भारताचा दुसरा क्रमांक परंतु चीमध्‍ये रेशीम कोष उत्पादन खर्च भारताच्‍या तुलनेत कमी आहे. कोष उत्पादन खर्च कमी करण्यासाठी रेशीम उद्योगात शेतकरी गटामार्फत लहान मशीनचा वापर झाला तर उत्पन्न वाढबरोबरमजुरीचा खर्च कमी होइल,सा सल्‍ला त्‍यांनी दिला.
तांत्रिक सत्रात प्रभारी अधिकारी रेशीम संशोधन योजनाचे डॉ. सी. बि. लटपटे यांनी ठिंबक सिंचनवर तुती रोपवाटीका, तुती लागवड, संगोपन गृहात आवश्यक तापमान आणि आद्रता यंत्र आदींचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा चंद्रकांत अडसुळ यांनी केले तर कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी अरूण काकडे, हरिश्चंद्र ढगे आदींनी परीश्रम घेतले. कार्यक्रमास मराठवाडयातील कृषि विज्ञान केंद्रातील विषय विशेषतज्ञ विजय मिटकरी (खरपुडी, जालना), तुषार चव्हाण (गांधेली, औरंगाबाद), सुगावे (तोंडापुर, हिंगोली), श्री. शिंदे (सगरोळी, नांदेड), श्री. संदीप देशमुख (लातूर), श्री. राजेसाहेब हारे (मौ. डिगोळअंबा बी), डॉ. संदिप झाडे (पैठण रोड, औरंगाबाद) आदीसह कन्नड (औरंगाबाद) येथील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Sunday, March 3, 2019

सेंद्रीय बिजोत्पादनातुन शेतक-यांना आर्थिक पाठबळ मिळु शकते......जेष्ठ पिक पैदासकार डॉ एस पी मेहत्रे

वनामकृवित औरंगाबाद आणि जालना जिल्हयातील शेतक-यांसाठी आयोजित दोन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने मराठवाडयातील विविध जिल्‍हयातील शेतक­यांसाठी दोन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असुन औरंगाबाद आणि जालना जिल्हयातील शेतक-यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक 1 मार्च रोजी संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पिक पैदासकार डॉ. एस. पी. मेहत्रे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन आंतरराष्ट्रीय अेडीएम कंपणीचे शेतकरी संपर्क प्रमुख श्री प्रका शेनॉय, कृषि अभियंता डॉ. स्मिता सोलंकी, कृषिविद्यावेत्ता डॉ. आनंद गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करतांना जेष्ठ पिक पैदासकार डॉ. एस. पी. मेहत्रे म्‍हणाले की, आज हवामान बदल, शेतीतील वाढत असलेला उत्‍पादन खर्च, जमिनीचे खालावलेले आरोग्य आदीं पार्श्‍वमुमीवर सेंद्रीय शेतीकडे शेतकरी आशेने बघत आहेत. सेंद्रीय शेती करतांना शेतक-यांनी मुलभुततत्वांचे पालन करावे तसेच सेंद्रीय पिकांमध्ये सरळ व सुधारीत वाणाचा वापर करावा. आज सेंद्रीय बियाण्यास मागणी वाढत असुन सेंद्रीय बिजोत्पादनातुन शेतकरी आर्थिक पाठबळ मिळु शकते. गटशेतीच्या माध्यमातुन सेंद्रीय बिजोत्पादन राबविल्यास खर्चास बचत होऊन गुणवत्तापुर्ण बियाणे उपलब्ध होण्यास मदत होईल, यासाठी तांत्रिक पाठबळ देण्यास विद्यापीठ सदैव तयार आहे. 
अेडीमचे शेतकरी संपर्क प्रमुख श्री. प्रका शेनॉय आपल्‍या भाषणात सांगीतले की, शेतक­यांचे सेंद्रीय उत्पादन खरेदी अेडीएम पुढाकार घेईल सेंद्रीय प्रमाणीकरणाचा खर्च कंपनीतर्फे करण्यात येईल. शेतक­यांना सेंद्रीय माल उत्पादन प्रक्रीयेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठच्या सहकार्याने भविष्यात विविध उपक्रम शेतक­यांसाठी राबविण्यात येतील असे त्‍यांनी सांगीतले. कृषि अभियंता डॉ. स्मिता सोळंकी म्‍हणाले की, सेंद्रीय शेती वापरण्यात येणा­या विविध निविष्ठांसाठी कमी खर्चाची व उपयोगी अवजारांचा वापर केल्यास शेतक­यांना लाभ होईल. योग्य अवजारांचा वापर केल्यास खर्चाची व वेळेची बचत करता येईल. प्रास्ताविकात डॉ. आनंद गोरे यांनी सेंद्रीय शेती पीक उत्पादन सेंद्रीय प्रमाणीकरण या दोन्ही बाबींवर लक्ष देणे आवश्‍यक असुन याबाबत योग्य प्रशिक्षण घेतले तर अपेक्षित लाभ घेता येईल, असे सांगितले.

तांत्रिक सत्रा डॉ एस कारले यांनी सेंद्रीय पीक लागवड तंत्रज्ञान, हार्षल जैन यांनी सेंद्रीय प्रमाणीकरण, डॉ एस जावळे यांनी अन्नद्रव्य व्यवस्थापन, डॉ के गोरे यांनी सेंद्रीय पीक व्यवस्थापन, कृषि अभियंता डॉ. सौ. स्मिता सोलंकी यांनी पशुक्तीचा सेंद्रीय शेती कार्यक्षम वापर याविषयावर मार्गदर्शन केले. सदरिल प्रशिक्षण कार्यक्रम कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण आणि संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांचे संकल्‍पनेतुन व मार्गदर्शनाखाली घेण्‍यात येत आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सतिकटारे यांनी केले तर आभार अभिजीत कदम यांनी मानले. प्रल्हाद गायकवाड, बालु दारभळे, डॉ. सुनिल जावळे, सचिन रनेर,  नागरेसावंत, दिपक शिंदे आदींनी परिश्रम घेतले. प्रशिक्षणास औरंगाबाद व जालना जिल्हयातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

Thursday, February 28, 2019

कृषि यांत्रिकीकरणासाठी कृषि उद्योजक, शेतकरी व कृषि अभियंते यांच्‍यात समन्वयाची आवश्‍यकता...... कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण

वनामकृविकृषि अवजारे प्रदर्शन व मेळाव्‍यास शेतक-यांचा मोठा प्रतिसाद
वाढती शेत मजुरी व हंगामात मजुरांची कमतरता यामुळे पिक लागवडीचा एकुण खर्च वाढत असुन कृषि यांत्रिकीकरणाला पर्याय नाही. परंतु अल्‍पभुधारक, मध्‍यम व मोठे भुधारक शेतकरी यांची कृषि औजारे व यंत्राची गरज वेगवेगळी आहे. कृषि यांत्रिकीकरणामूळे पिक लागवडीचा खर्च कमी होवुन शेतक-यांच्‍या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करणे शक्‍य आहे. कृषि यांत्रिकीकरणाकरिता कृषि यंत्र उद्योजक, शेतकरी व कृषि अभियंते यांच्यात समन्‍वयाची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील पशुशक्तीचा योग्य वापर अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाच्‍या वतीने कृषी यांत्रिकीकरण दिनानिमित्‍त दिनांक 28 फेब्रुवारी रोजी बैल व ट्रॅक्टर चलीत सुधारीत औजारांचे प्रदर्शन व शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्यात आले होते, मेळाव्‍याच्‍या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले, विद्यापीठ अभियंता डॉ अशोक कडाळे, परभणी आत्माचे प्रकल्प संचालक श्री. के. आर. सराफ, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ यु एम खोडके, तालुका कृषि अधिकारी श्री. पी. बी. बनसावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी शेतक-यांचा व विद्यापीठ शास्त्रज्ञांंच्या समन्वयातून कृषि यांत्रिकीकरणाची चळवळ गतिमान झाली पाहीजे असे सांगितले तर शेतक-यांनी गटशेतीच्‍या माध्‍यमातुन कृषि यांत्रिकीकरण बळकट करून उन्नती साधावी असे मत आत्मा प्रकल्प संचालक श्री के. आर. सराफ यांनी व्यक्त केले.
यावेळी विद्यापीठातील उर्जा उद्यानामध्ये आयोजित सुधारीत कृषि अवजारे, अपारंपारीक उर्जा साधनांचे प्रदर्शन व प्रात्याक्षिकाचे उद्घाटनही कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. 
कृषि अवजारे प्रदर्शनात विविध मोठ्या प्रमाणात  कंपन्यांची
ट्रॅक्टर चलीत अवजारेसौरचलीत अवजारेसुधारीत बैल चलित अवजारांचे प्रात्याक्षिकांचे सादरीकरण केले. तांत्रिक सत्रात सेंद्रीय शेती, रेशीम उद्योग, पशुधन संगोप, अपारंपारीक उर्जा स्त्रोत आदींविषयावर डॉ सी बी लटपटे, डॉ अे. के. गोरे, डॉ डि. एस. चव्हाण, डॉ आर. टी. रामटेके आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्‍पाच्‍या संशोधन अभियंता प्रा. स्मिता सोलंकी यांनी केले. सुत्रसंचालन डॉ रामप्रसाद खंदारे यांनी केले तर आभार प्रा. डी. डी. टेकाळे यांनी मानले. मेळाव्‍यास मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील शेतकरी मोठया संख्‍येनी सहभागी झाले होते.