वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत
असलेल्या गृहविज्ञान महाविद्यालयास भारतीय कृषि संशोधन परिषदेचे उपमहानिदेशक मा.
डॉ अरविंद कुमार यांच्या हस्ते प्राचार्या प्रा विशाला पटनम व डॉ वीणा भालेराव
लिखीत ‘बालकांच्या बौध्दिक व संवाद कौशल्यासाठी विकसीत केलेल्या बहुभाषिक
बालगीते व भाषणे’ या प्रभावी ई-बुकचे विमोचन करण्यात आले. तसेच अखिल भारतीय सन्वयक
संशोधन प्रकल्पांतर्गत विकसीत विविध संशोधनात्मक तंत्रज्ञान समाजापर्यंत
पोहोचविण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या ‘गृहविज्ञान तंत्रज्ञानाचा स्वीकार
कुटुंबाचा आधार’ या पुस्तिकेचे विमोचन डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी
कुलगूरू मा डॉ गोविंदराव भराड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांनी
बालमार्गदर्शन चिकीत्सालय, वस्त्र व परिधान अभिकल्पना प्रयोगशाळेस भेट दिली.
एलपीपी स्कुलच्या ब्रिज सेक्शनच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनावर उत्कृष्ट
शास्त्रोक्त भाषण मान्यवरांच्या समक्ष सादर केले. तसेच मान्यवरांनी
महाविद्यालयातील विद्यार्थ्या समवेत संवाद साधला. याप्रसंगी वनामकृवि चे कुलगूरू
मा डॉ किशनराव गोरे, मा श्री अनिल नखाते, श्री विश्वनाथ थोरे, शिक्षण संचालक तथा
अधिष्ठाता डॉ विश्वास शिंदे, विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक
डॉ दत्तप्रसाद वासकर, प्राचार्या प्रा विशाला पटनम व महाविद्यालयातील प्राध्यापिका
उपस्थित होते.
Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Wednesday, September 18, 2013
Tuesday, September 17, 2013
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित रबी पीक शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न
| कृषि प्रदर्शनाचे उद् घाटन |
| रबी पीक शेतकरी मेळावाचे उद् घाटन |
| रबी पीक शेतकरी मेळावाचे उद् घाटन |
| उद् घाटक नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे उपमहानिदेशक (शिक्षण) मा. डॉ. अरविंद कुमार मार्गदर्शन करतांना |
| मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठ शास्त्रज्ञ लिखीत विविध प्रकाशनाचे विमोचन |
| पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष मा. ना. श्री. विजयरावजी कोलते मार्गदर्शन करतांना |
| वनामकृविचे कुलगूरू मा. डॉ. किशनरावजी गोरे मार्गदर्शन करतांना |
| माजी कृषि राज्यमंत्री मा. श्री सुरेश वरपुडकर मार्गदर्शन करतांना |
| अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ गोंविदरावजी भराड मार्गदर्शन करतांना |
| विद्यापीठाने विकसीत केलेले विविध रबी पिकांच्या बियाणे विक्रीची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आली |
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे
औचित्त साधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व कृषि विभाग यांचे संयुक्त
विद्यमाने 17 सप्टेंबर 2013 रोजी रबी पीक शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न झाला.
मेळाव्याचे उद्घाटन नवी दिल्ली येथील भारतीय कृषि
संशोधन परिषदेचे उपमहानिदेशक (शिक्षण) मा. डॉ. अरविंद कुमार यांच्या हस्ते
झाले तर अध्यक्षस्थानी वनामकृविचे कुलगूरू मा. डॉ. किशनरावजी गोरे होते. प्रमुख
पाहुणे म्हणुन पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष
मा. ना. श्री. विजयरावजी कोलते, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि
विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ गोंविदरावजी भराड व माजी कृषि राज्यमंत्री मा. श्री
सुरेशराव वरपुडकर उपस्थित होते.
व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक
डॉ अशोक ढवण, शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ विश्वास शिंदे, संशोधन संचालक डॉ
दत्तप्रसाद वासकर, नियंत्रक श्री ना ज सोनकांबळे, विद्यापीठ अभियंता श्री अब्दुल
रहिम व उपविभागीय कृषि अधिकारी श्री पि.एच. मालेगांवकर यांची प्रमुख उपस्थिती
होती.
मेळाव्याचे उद्घाटक मा. डॉ. अरविंद कुमार म्हणाले
की, देशात महाराष्ट्र राज्य कृषि शिक्षणात आघाडीवर आहे. सर्वात जास्त कृषि
महाविद्यालय राज्यात असून सर्वात जास्त कृषि पदवीधर या राज्यात तयार होतात.
याचा निश्चीतच शेतक-यांना फायदा होत आहे. आजच्या मेळाव्यात शेतक-यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहुन हे लक्षात येते की, शेतक-यांचे
विद्यापीठाशी घनिष्ठ नाते आहे. देश अन्नधान्यात स्वयंपुर्ण होण्यास
शेतक-यांचे मोठे योगदान आहे. शेतक-यांनी बिजोत्पादनावर भर द्यावा. विद्यापीठातील
विविध उपक्रमाचा व तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा असा सल्ला त्यांनी दिला.
प्रमुख पाहुणे कृषि परिषदेचे उपाध्यक्ष
मा. श्री विजयरावजी कोलते म्हणाले की, नवीन तंत्रज्ञान, शास्त्रज्ञांचे प्रयत्न
व शेतक-यांची अथक मेहनतीमुळे आज आपण अन्नधान्यात निर्यातदार देश झालो आहोत. देशपातळीवर
व राज्यात शासनाने शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणुक केल्यामुळे शेतीचे चित्र
बदलत आहेत. शासनाच्या योजनांचा अभ्यास करुन शेतक-यांनी त्याचा फायदा घ्यावा. कृषि
विद्यापीठाने शेतक-यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडविले आहे. आज विद्यापीठाच्या
बियाणावर शेतक-याचा मोठा विश्वास आहे. अधिक रोजगार देणारा व्यवसाय म्हणून आजही
शेतीकडे पाहिले जाते. कृषि उद्योजकांनी व शेतक-यांनी पुढे येऊन नवीन तंत्रज्ञानाचा
अवलंब करावा. शाश्वत शेतीसाठी शास्त्रज्ञ, शासन व शेतकरी बंधुनी एकत्रीत प्रयत्न
करावा असे प्रतिपादन त्यांनी केले.
माजी कुलगुरू मा. डॉ. गोविंदराव भराड
म्हणाले की, शेतकामामध्ये महिलांचा मोठा वाटा असूनही शेतकरी मेळाव्यामध्ये
शेतकरी महिलांचा सहभाग नगण्य आहे तो वाढविणे आवश्यक आहे. शेतीत स्थैर्य आणण्यासाठी
फळबाग, फुलशेती, भाजीपाला लागवड केल्या शिवाय गत्यंतर नाही. प्रत्येक
शेतक-यांनी शेती नोंदवही तयार कराव्यात, त्यातील चांगल्या बाबी प्रसिध्द
कराव्यात. त्याचा फायदा इतर शेतक-यांना होईल असा सल्ला त्यांनी दिला.
माजी कृषि राज्यमंत्री मा. श्री
सुरेशरावजी वरपुडकर म्हणाले की, शासनाने दुष्काळाचे निकष हे पैसेवारी व
आणेवारीबरोबर जमीनीतील पाण्याच्या पातळीवर दुष्काळ जाहीर करावा. कृषि विद्यापीठाने संशोधनामार्फत शेतक-यांना
विविध पिकांचे अनेक वाणे व शिफारशी दिल्या असुन शेतक-यांचा त्याचा निश्चीतच
फायदा झाला आहे. विद्यापीठाने कापूस
वेचणीचे तंत्रज्ञान विकसीत करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोपात
विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. किशनरावजी गोरे म्हणाले की, भारतीय कृषि संशोधन
परिषद, नवी दिल्ली यांच्या पाठींब्यामुळे विद्यापीठात शैक्षणीक व संशोधनाच्या
सुविधा निर्माण झाल्या आहेत. कोरडवाहू शेतीमध्ये शाश्वत उत्पादनासाठी संरक्षीत
पाण्याची व्यवस्था करणे, एकात्मिक पिक व्यवस्थापन तसेच एकात्मिक अन्नद्रव्य
व्यवस्थापन सोबतच जोडधंदे, प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धीत पदार्थ तयार करणे
यासह काटेकोर शेती तंत्रज्ञानाचा शेतक-यांनी अवलंब करावा. आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय
शेतक-यांची प्रगती नाही. शक्य असेल तिथे शेतक-यांनी सामुदायीक यांत्रीकीकरण
करावे. शेतक-यांनी विद्यापीठातील विविध प्रशिक्षण कार्यक्रमास सहभाग घ्यावा व
विद्यापीठातील संशोधन केंद्रास नियमीत भेटी द्याव्यात असे प्रतिपादन त्यांनी
केले.
प्रास्ताविकात विस्तार शिक्षण
संचालक डॉ अशोक ढवण यांनी विद्यापीठाच्या कृषि विस्ताराच्या विविध
कार्यक्रमाबाबत माहिती दिली. विद्यापीठ शेतक-यांना उभारी देण्यासाठी कटीबध्द
असल्याचे प्रतिपादन केले.
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते
विद्यापीठ शास्त्रज्ञ लिखीत विविध प्रकाशनाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे
सूत्रसंचलन प्रा. डॉ. माधुरी कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन मुख्य विस्तार
शिक्षणाधिकारी डॉ.राकेश अहिरे यांनी
केले.
मेळाव्याच्या तांत्रिक चर्चासत्रामध्ये
खरीप व रबी पिकातील कीड व्यवस्थापनावर डॉ बी बी भोसले, हरभरा लागवडीवर डॉ डी के
पाटील, करडई लागवडीवर डॉ एस बी घुगे, गहु लागवडीवर डॉ व्ही डी सोळुंके, रबी
पिकावरील रोग व्यवस्थापनावर डॉ डी एन धुतराज व डॉ ए पी सुर्यवंशी, हरितगृहांतर्गत
फुलशेती व भाजीपाला लागवडीवर डॉ एस डी जेटुरे, कोरउवाहु फळझाडांची लागवडीवर प्रा
डी एम नाईक, रबी हंगामातील भाजीपाला लागवडीवर डॉ व्ही एस खंदारे, पुर्व हंगामी उस
लागवडीवर डॉ पी ऐ पगार व डॉ आनंद गोरे, शेतीपुरक दुग्धव्यवसायावर डॉ बी एम
ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले तसेच डॉ के आर कांबळे, डॉ ए पी सुर्यवंशी, डॉ अशोक
जाधव, डॉ मदन पेंडके, डॉ एस बी पवार, डॉ के टी जाधव, प्रा ए व्ही गुट्टे, डॉ एच
के कौसडीकर, डॉ डी जी मोरे व प्रा आर बी क्षीरसागर यांनी शेतक-यांच्या शेती विषय
विविध शंकाचे समाधान केले. सदरील मेळाव्यास शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
आयोजित कृषि प्रदर्शनातील विविध
नामांकित कंपन्याचे व विद्यापीठ प्रसारीत तंत्रज्ञान, विविध पिकांच्या वाणांचे
तसेच शेतक-यांना उपयुक्त असे अवजारांची दालनांना शेतक-यांनी मोठ्या संख्येने भेटी
दिल्या. प्रदर्शनांतर्गत सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर आधारीत कृषि अन्नतंत्रज्ञान
महाविद्यालय व झेन नॅचरल अग्रो प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या
प्रकल्पांतर्गत उत्पादीत विविध फळ प्रक्रिया पदार्थाच्या नाविन्यपुर्ण दालनास
शेतक-यांचा व बचत गटाच्या सदस्यांचा विशेष प्रतिसाद होता.
विद्यापीठाने विकसीत केलेले विविध
रबी पिकांच्या बियाणे विक्रीची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आली. कृषि
तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या वतीने फिरते कृषि निदान व प्रदर्शन केंद्राची
सुरूवात, ग्रीष्म वसतीगृह व विद्यापीठ ग्रंथालयाच्या नुतनीकरणाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात
आले. शेतक-यांसाठी शिवार फेरीचे आयोजन देखिल करण्यात आले होते.
मान्यवरांनी विद्यापीठामधील विविध
नाविण्यपुर्ण कार्यरत असलेले उपक्रम कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, पिंगळगडनाला
सिंचन प्रकल्प, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालायातील फळ प्रक्रिया प्रकल्प तसेच
गृहविज्ञान महाविद्यालय इत्यादींना भेटी दिल्या.
Monday, September 16, 2013
Saturday, September 14, 2013
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या् प्रकल्पास प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची भेट
| वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांत राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अधिक बियाणे उत्पादणासाठी सिंचनस्रोत विकास प्रकल्पातंर्गत शेततळे यावर्षीच्या पाऊसाने पूर्ण भरले |
पत्रकार परिषद संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या
वतीने मराठवाडा मुक्तीदिनी दिनांक 17-09-2013 रोजी रबी मेळाव्याचे आयोजन करण्यात
आले असून त्यानिमित्य विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. किशनरावजी गोरे यांच्या अध्यक्षतेखाली
पत्रकार परिषद संपन्न झाली, याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, शिक्षण
संचालक तथा अधिष्ठाता डॉ विश्वास शिंदे, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर,
मुख्य विस्तार शिक्षणाधिकारी डॉ राकेश आहिरे, विस्तार शिक्षणाधिकारी प्रा पी एस
चव्हाण उपस्थित होते. याप्रसंगी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठया संख्येने
उपस्थित होते.
कुलगूरू मा. डॉ किशनराव गोरे यांची प्रेस
नोट
ग्रीष्म वसतीगृह व विद्यापीठ ग्रंथालयाच्या
नुतनीकरणाचे उद् घाटन मान्यवरांच्या
हस्ते होणार आहे. ग्रंथालयात विद्यार्थ्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन
देण्यात आल्या असुन ऑन लाईन ई-रिसोर्स कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
मेळाव्यात तांत्रिक सत्राचे आयोजन करण्यात
आले असुन यामध्ये विद्यापीठातील शास्त्रज्ञ रबी हंगामातील विविध पिके – रबी ज्वार, गहु, हरभरा, करडई इत्यादीच्या लागवड तंत्रज्ञानावर
उपस्थितीत शेतक-यांना मार्गदर्शन करणार आहेत.
आयोजित कृषि प्रदर्शनामध्ये विविध नामांकित
कंपन्याचे व विद्यापीठ प्रसारीत तंत्रज्ञान, विविध पिकांच्या वाणांचे तसेच शेतक-यांना
उपयुक्त असे अवजारांची दालने असणार आहेत. तसेच सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर
आधारीत कृषि अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय व झेन नॅचरल अग्रो प्रा. लि. यांच्या
संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या प्रकल्पाअंतर्गत तयार करण्यात आलेले विविध फळ
प्रक्रिया पदार्थाचे नाविन्यपुर्ण दालन असणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत तयार करण्यात
आलेले विविध फळ प्रक्रिया पदार्थाची 20 टनाचे प्रत्येकी दोन कंटेनर नुकतेच
परदेशात निर्यात केली आहेत. या नाविण्यपुर्ण प्रकल्पामुळे या भागातील शेतकरी,
विद्यार्थी व उद्योजक यांना फायदा होणार असून या भागात कृषि उद्योजकता वाढीस गती
प्राप्त होणार आहे.
विद्यापीठामध्ये विविध नाविण्यपुर्ण उपक्रम
कार्यरत असुन यामध्ये कृषि अवजारे चाचणी, निर्मिती व प्रशिक्षण केंद्र, पिंगळगड
नाला सिंचन प्रकल्प, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालायातील फळ प्रक्रिया प्रकल्प
तसेच कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, विविध संशोधन केंद्र व त्याचप्रमाणे
विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठाने विकसीत केलेले व शेतकरी
बांधवांची प्रचंड मागणी असलेले रबी ज्वार, हरभरा, करडई इत्यादी पिकांचे उपलब्ध
बियाणे शेतक-यांना मान्यवरांच्या हस्ते उद् घाटन करुन विक्री करण्यास सुरुवात करण्यात येणार
आहे.
राज्यामध्ये जवळपास 82 टक्के क्षेत्र
कोरडवाहु असुन या भागाच्या कृषि विकासासाठी कोरडवाहु शेती अभियानाचा शुभारंभ
नुकताच कृषिमंत्री मा ना श्री राधाकृष्णजी विखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
औरंगाबाद येथे संपन्न झाला आहे. तसेच विद्यापीठाचे मा. कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे
यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या कृषि हवामान विभागनिहाय अभ्यास गट
क्रमांक 3 च्या बैठका तथा कार्यशाळा मराठवाडयातील आठ जिल्हयासह सोलापुर, जळगांव,
वाशिम, बुलढाणा ईत्यादी जिल्हयात घेण्यात येउन त्याचा अंतरिम अहवाल महाराष्ट्र
शासनास सादर करण्यात आला आहे. यामुळे कृषि हवामान विभागनिहाय आधारीत कृषि धोरण
आखण्यास शासनास मदत होणार आहे.
नुकतेच गोळेगांव येथील कृषि महाविद्यालयातील
65 पदे व चाकुर येथील पद्वव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्थेचे 38 पदे
शासनाने मंजुर केले आहेत. त्यामुळे विद्यापीठातील शैक्षणिक कार्यास बळकटी प्राप्त
होणार आहे. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. पृथ्वीराजजी चव्हाण व
कृषि मंत्री मा.ना.श्री. राधाकृष्णजी विखे पाटील यांचे आभार व्यक्त करतो.या रबी मेळाव्यास शेतकरी व कृषि उद्योजकांनी
मोठया संख्येने उपस्थितीत रहावे असे आवाहन करण्यात येते व येत्या रबी
हंगामासाठी शुभेच्छा.
Friday, September 13, 2013
पत्रकार परिषदेस निमंत्रण
विस्तार शिक्षण
संचालनालय
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
जा.क्र.ईईयु/ /2013
दिनांक: 11-09-2013
निमंत्रण
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने मराठवाडा मुक्ती दिनी दिनांक
17-09-2013 रोजी रबी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्य विद्यापीठाचे
मा. कुलगुरू डॉ.किशनरावजी गोरे यांच्या अध्यक्षतेखाली
पत्रकार परिषदेचे आयोजन दिनांक 14-09-2013 वार - शनिवार रोजी सकाळी 11.00 वा करण्यात
आली आहे. तसेच विद्यापीठातील विविध कृषि तंत्रज्ञान प्रकल्पास प्रसारमाध्यमांच्या
प्रतिनिधीची भेट आयोजित केली आहे.
तरी सदरील पत्रकार परिषदेस व प्रकल्प भेटी
प्रसंगी उपस्थितीत राहावे, हि विनंती.
वेळ : सकाळी 11.00 वाजता
दिनांक : 14-09-2013 वार: शनिवार
स्थळ : वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी
प्रशासकीय इमारत हॉल क्र.17
संचालक
विस्तार शिक्षण
प्रति,
मा जिल्हा प्रतिनिधी
दैनिक / साप्ताहीक
..................
जिल्हा परभणी
Thursday, September 12, 2013
संघर्षाशिवाय प्रगती नाही ................ डॉ उमाकांतजी राठोड
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या परभणी येथील
कृषि महाविद्यालयात गणेशोत्सव 2013 निमित्य आज दि 11.09.13 रोजी सुप्रसिध्द वक्ते
डॉ उमाकांतजी राठोड यांचे ‘भगतसिंग – युवकांचे प्रेरणास्थान’ या विषयावर व्याख्यान
आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ
विलास पाटील होते तर विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे, डॉ बी व्ही आसेवार व
विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ उमाकांतजी राठोड आपल्या भाषणात म्हणाले की, भगतसिंग यांचे चरित्र
आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी आहे. आजच्या युवकांनी देश व समाज घडविण्यासाठी त्याग व बलीदाना करणे आवश्यक आहे. संघर्षाशिवाय
कोणाचीही प्रगती होत नाही, विद्यार्थ्यानी यशासाठी संघर्ष करावा. गणेशोत्सवानिमित्त
विद्यार्थ्यानी केलेल्या विविध प्रबोधनात्मक व्याख्याने आयोजित करून चांगला
उपक्रम सुरू केला आहे असे मत अध्यक्षयीय समारोपात डॉ विलास पाटील यांनी व्यक्त
केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संदीप टाले यांनी केले तर आभार अमोल बांगरे यांनी केले. कार्यक्रम
यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थीनी परीश्रम घेतले. कार्यक्रमास
महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्यापक व कर्मचारी वर्ग मोठया संख्येने
उपस्थित होते.
Subscribe to:
Posts (Atom)
