Saturday, August 22, 2015

वनामकृविच्‍या कृषि सहाय्यक पदाची रविवारी लेखी परिक्षा

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची जाहिरात क्र वनामकृवि-१/२०१४ दिनांक २५ नोंब्‍हेबर २०१४ अन्‍वये पदवीकाधारकाच्‍या कृषि सहाय्यक पदासाठी दिनांक २३ ऑगस्‍ट रविवार रोजी लेखी परिक्षा होणार असुन ३६ पदांकरिता एकुण ६४७५ उमेदवार पात्र ठरले आहे. रविवारी सकाळी ११ ते १ या दरम्‍यान पर‍भणी शहरातील एकुण १८ परिक्षा केंद्रावर ही परिक्षा होणार असुन यात विद्यापीठ परिसरातील कृषि महाविद्यालय, अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय व पशुवैद्यकीय महाविद्यालय तसेच वसमत रोड वरील श्री शिवाजी महाविद्यालय, श्री शिवाजी विधी महाविद्यालय, श्री शिवाजी तंत्रनिकेतन महाविद्यालय, श्री शिवाजी अभियांत्रिकी व्‍यवस्‍थापन महाविद्यालय, सारंग स्‍वामी विद्यालय, संत तुकाराम महाविद्यालय तसेच बालविद्यामंदिर, नानलपेठ, बालविद्यामंदिर, वैभव नगर, भारतीय बालविद्यामंदिर ममता नगर, जिंतुर रोड वरिल कै रावसाहेब जामकर महाविद्यालय, कै कमलाताई जामकर महाविद्यालय, ज्ञानोपासक महाविद्यालय, ईदगा मैदानाजवळील शारदा विद्यालय व शारदा महाविद्यालय या परिक्षा केंद्राचा समावेश आहे. विद्यापीठा मार्फत परिक्षा प्रवेश पत्रे उमेदवारांच्‍या मुळ पत्‍यावर पाठविले असुन ज्‍यांना ते प्राप्‍त न झाल्‍यास दिनांक २३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत प्रवेशपत्राची दुय्यम प्रत कुलसचिव कार्यालयातुन उमेदवार प्राप्‍त करू शकतील. सदरिल परिक्षेच्‍या प्रश्‍नाची उत्‍तरे विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळावर प्रसिध्‍द करण्‍यात येणार असल्‍याचे कुलसचिव कार्यालयाच्‍या वतीने कळविण्‍यात आले आहे.

विद्यापीठाची प्रतिष्‍ठा जपण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांनी सदैव दक्ष राहावे........कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

कृषि महाविद्यालयात रॅगींग प्रतिबंध जागरूकता कार्यक्रम संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने नागनाथ वसतीगृहात दि २० ऑगस्‍ट रोजी रॅगींग प्रतिबंध जागरूकता कार्यक्रम घेण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ डि एन गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, नवीन प्रवेशित महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांचे जीवनाच्‍या दुस-या टप्‍पाची सुरवात झाली असुन जेष्‍ट विद्यार्थ्‍यांनी त्‍यांना मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्‍यी-विद्यार्थ्‍यांत सौदाहर्याचे वातावरण निर्माण झाले पाहिजे. राष्‍ट्रीय पातळीवर विद्यापीठाचे मानांकन ठरवितांना महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांच्‍या रॅगींग प्रतिबंध बाबत विचार केला जातो. विद्यापीठाची प्रतिष्‍ठा जपण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांनी सदैव दक्ष राहावे, असा सल्‍ला त्‍यांनी यावेळी दिला.
महाविद्यालयीन जीवनात चांगले ते घेण्‍याचा प्रयत्‍न विद्यार्थ्‍यांनी करावा. महाविद्यालयीन वातावरण सुदृध्‍ढ व निकोप राहण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांनी प्रत्‍यनशील असावे, असे मत शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी व्‍यक्‍त केले तर कुलसचिव डॉ दिनकर जाधव आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, कृषि महाविद्यालयात प्रवेश घेणारे विद्यार्थ्‍यी हे प्रामुख्‍याने ग्रामीण व शेतकरी कुटूंबातील असुन आपण आपल्‍या पालकाशी विश्‍वासपात्र असे  वर्तन करून ध्‍येयपुर्ती साधावी. प्राचार्य डॉ धर्मराज गोखले म्‍हणाले की, महाविद्यालयातील विविध सामाजिक कार्य जसे व्‍यसनमुक्‍ती, वृक्षसंवर्धन, स्‍वच्‍छता मोहिम यात विद्यार्थ्‍यांचा हिरारीने सहभाग असतो तसेच महाविद्यालयातील नवप्रवेशित विद्यार्थ्‍यांचा आत्‍मविश्‍वास वाढविण्‍यासाठी विद्यार्थ्‍यानी सजग असावे.  
याप्रसंगी सदभावना दिनानिमित्‍त सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेण्‍यात आली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक मुख्‍य वसतीगृह अधिक्षक तथा विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ विशाल अवसरमल यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ शिवाजी यदलोड यांनी केले. कार्यक्रमास डॉ जी एम वाघमारे, डॉ बी आर पवार, डॉ के टि आपेट, डॉ के डि नवगिरे, डॉ व्‍ही एस खंदारे, डॉ एच के कौसडीकर, प्रा एस एल बडगुजर आदीसह महाविद्यालयाचे विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी के बी चौधरी, पी एस चव्‍हाण, जी एन भारती आदींनी परिश्रम घेतले. 

Friday, August 21, 2015

कपाशीवरील फुलकिडयांचे वेळीच करा व्‍यवस्‍थापन..... वनामकृविचे आवाहन




कृषि अभियंत्‍यानी कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा प्रसार करावा.......कुलगुरू मा डॉ बी. व्‍यंकटेश्वरलू

वनामकृवित कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या आजी व माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहदीप मेळावा उत्‍साहात संपन्‍न

सद्य परिस्थितीत कृषिक्षेत्राच्‍या विकासासाठी कृषी यांत्रिकीकरण, कृषी प्रक्रिया, मृद व जलसंधारण, पाणी व्यवस्थापन आदीं कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची सर्वसामान्य शेतकऱ्याना अत्‍यंत आवश्‍यकता असुन कृषी अभियंतांनी याचा प्रसार करावा, असे आवाहन कुलगुरू मा डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलू यांनी व्‍यक्‍त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि वनामकृवि कृषी अभियांत्रिकी माजी विद्यार्थी संघटना यांच्‍या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ ऑगस्‍ट रोजी आयोजीत कृषी अभियांत्रिकी आजी व माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहदीप मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी कुलगुरू मा डॉ. के. पी. गोरे हे उपस्थित होते तर व्यासपीठावर विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. श्री.  अनंतराव चोंदे, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालाक डॉ. बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय खोडके, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, कृषी अभियांत्रिकी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. दयानंद टेकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी माजी कुलगुरू डॉ के. पी. गोरे, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, कुलसचिव डॉ दिनकर जाधव आदींनी मार्गदर्शन केले.
मेळाव्‍यात माजी विद्यार्थी प्रभाकर भालेराव, यशवंत गोस्वामी, रविंद्र गुरव, राजेंद्र कदम, पंडित वासरे, भालचंद्र पेडगावकर, माणिक जाधव, योगेश मुळजे, अमिता तागडे, रमाकांत चापके, दीपक भापकर, विकास पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. तसेच महेश हावळ, मनोज लटपटे, दत्तात्रय मोरे, विकास पाटील, विजय आग्रे, राहुल वळसे या माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन करून आजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मेळाव्यास परभणी येथील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातुन पदवी संपादन करून शासकीय सेवा, नामांकित कंपन्या, उद्योग, स्वयंसेवी संस्था, राष्ट्रीयकृत बँका, संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेले सुमारे १५० कृषि अभियंते सहभागी झाले होते. तसेच माजी प्राचार्य आणि प्राध्यापक प्रा व्ही. जी. वैष्णव, प्रा. एल. एन. डीग्रसे, प्रा. बापू अडकीने, डॉ. आर. जी. नादरे, डॉ. एस. बी. सोनी, प्रा. बी. बी. सूर्यवंशी, प्रा. आर. आर. लोहेकर, प्रा.पी. बी. कदम, प्रा. व्ही. बी. बोथरा आदीं मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात प्राचार्य डॉ उद्य खोडके यांनी कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविदायालायाच्या वाटचालीचा आढावा घेतला तर प्रास्ताविक प्रा डी डी टेकाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मधुकर मोरे व राजेंद्र पवार यांनी तर राजेश पांगरकर यांनी आभार मानले. विविध सत्रासाठी संकलक म्हणून प्रा. लक्ष्‍मीकांत राउतमारे यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


Wednesday, August 19, 2015

स्‍वरक्षनार्थ वनामकृविच्‍या विद्यार्थीनीनी घेतले कराटेचे प्रशिक्षण


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालय व परभणी पोलिसचे रणरागीनी पथक यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने विद्यापीठातील विद्यार्थींनीसाठी वीस दिवसीय कराटे प्रशिक्षण वर्ग आयोजीत करण्‍यात आले होते, या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप दि 15 ऑगस्‍ट रोजी झाला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, पोलीस अधिक्षीका मा. नियती ठक्‍कर, प्राचार्या प्रा विशाला पटणम, रणरागीनी पथक प्रमुख पोलीस अधिकारी डॉ अंजली जोंधळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यीनीना स्‍व:रक्षणार्थ या प्रशिक्षणाचा निश्चितच लाभ होणार असुन विद्यार्थ्‍यींनीनी समाजातील महिलांच्‍याही संरक्षणासाठी कार्य करावे. प्रमुख पाहुणे पोलीस अधिक्षक मा. नियती ठक्‍कर आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांनीनी समाज सेवेसाठी प्रशासनात यावे, यासाठी विविध स्‍पर्धापरिक्षेत यशस्‍वीतेसाठी कठोर परिश्रम घ्‍यावे.

या प्रशिक्षण वर्गातील प्रशिक्षणार्थींना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्राचे वितरण करण्‍यात आले. यावेळी प्रशिक्षण घेतलेल्‍या विद्यार्थींनीनी कराटेचे प्रात्‍यक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बदाम पवार हीने केले तर आभार प्रदर्शन प्रा मेधा उमरीकर यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील विद्यार्थींनी मोठया संख्‍येने उपस्थित होत्‍या. 

Monday, August 17, 2015

पालकमंत्री मा. ना. श्री. दिवाकररावजी रावते यांच्‍या हस्‍ते वैरण विकास कार्यक्रमातंर्गत चारापिके पेरणीचा शुभारंभ

वनामकृविच्‍या संकरीत गो पैदास प्रकल्‍पाचा उपक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत संकरीत गो पैदास प्रकल्‍पाच्‍या वतीने वैरण विकास कार्यक्रमातंर्गत चारा पिके पेरणी कार्यक्रमाचा शुभारंभ दिनांक १५ ऑगस्‍ट रोजी परिवहन मंत्री तथा परभणी जिल्‍ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. दिवाकररावजी रावते यांचे हस्‍ते करण्‍यात आला. याप्रसंगी संसद सदस्‍य मा. श्री संजय जाधव, विधानसभा सदस्‍य मा. डॉ. राहुल पाटील, जिल्‍हाधिकारी मा. राहुल रंजन महिवाल, कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री केदार साळुंके, मा श्री रविंद्र पतंगे, मा श्री अनंतराव चोंडे, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कुलसचिव डॉ. दिनकर जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री मा. ना. श्री. दिवाकररावजी रावते मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, दुष्‍काळसदृष्‍य परिस्थितीत मराठवाडयात जनावरांसाठी चा-याचा प्रश्‍न मोठया प्रमाणावर भेडसवणार असुन विद्यापीठांनी हाती घेतलेल्‍या चारा पिके उत्‍पादनाचा प्रकल्‍प निश्चितच स्‍त्‍युत्‍य प्रकल्‍प आहे. विद्यापीठाच्‍या चारा पिके उत्‍पादन प्रकल्‍पासाठी सर्वातोपरी सहाय्य करण्‍याचे आश्‍वासन त्‍यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी विद्यापीठातंर्गत असलेल्‍या विविध संशोधन केंद्रावर वैरण विकास कार्यक्रमातंर्गत चारा पिकांचे उत्‍पादन, संवर्धन व दुष्‍काळ परिस्‍थतीत शेतक-यांना प्रबोधन होईल असा प्रकल्‍पाचा प्रस्‍ताव कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांचे हस्‍ते मा. ना. श्री दिवाकररावजी रावते यांना सादर करण्‍यात आला.
   अत्‍यल्‍प पर्जन्‍यमानात पाऊसाचे पाणी आडवुन कमी पाण्‍यावर येणारी चारा पिकांची लागवड करुन पशुधनासाठी चारा उपलब्‍ध करणे अत्‍यंत गरजेचे सांगुन प्रकल्‍पाची माहिती प्रास्‍ताविकात संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी दिली. कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संशोधन उपसंचालक डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. दिगांबर पेरके, डॉ. अशोक जाधव आदींसह विद्यापीठातील विविध योजनेचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली योजनेचे वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. दिनेश सिंग चव्‍हाण, डॉ. संदेश देशमुख, डॉ. सतिश खिल्‍लारे, श्री दिनकर घुसे, श्री दादाराव शेळके, श्री बालाजी कोकणे, श्री व्‍यंकटेश मगर, श्री सुभाष शिंदे, श्री दुधाटे व इतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. 

कमी पर्जन्यमानात संरक्षीत सिंचनावरील कृषिविद्या विभागाच्या संशोधन प्रक्षेत्रावरील बहरली पिके

वनामकृविच्‍या कृषिविद्या विभागाच्‍या प्रक्षेत्रास मान्‍यवरांची भेट
वनामकृविच्‍या कृषिविद्या विभागाच्‍या संशोधन प्रक्षेत्रास कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री केदार साळुंके, मा श्री अनंतराव चोंडे, मा श्री रविंद्र देशमुख आदीसह शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदी
वनामकृविच्‍या कृषिविद्या विभागाच्‍या संशोधन प्रक्षेत्रास कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री केदार साळुंके, मा श्री अनंतराव चोंडे, मा श्री रविंद्र देशमुख आदीसह शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदी
**************

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषिविद्या विभागाच्‍या प्रक्षेत्रास दि १५ ऑगस्‍ट रोजी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री केदार साळुंके, मा श्री रविंद्र पतंगे, मा श्री अनंतराव चोंडे यांच्‍यासह शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदींनी भेट दिली. मान्‍यवरांनी प्रक्षेत्रावरील विभागातील पदव्‍युत्‍तर पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या संशोधन प्‍लॉटची व पिक प्रात्‍यक्षिकांची पाहणी केली. पिक प्रात्‍यक्षिकांबाबत प्राचार्य डॉ डि एन गोखले व डॉ ए एस कार्ले यांनी माहिती दिली तर पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यी महमद काजी, कृष्‍णा वारकड, शिला शिंदे, आर व्‍ही गिते, डि व्‍ही पवार, यु एस खेत्रे आदींनी आपआपल्‍या संशोधनाबाबत माहिती दिली. याप्रसंगी कमी पर्जन्‍यमानात संरक्षीत सिंचन व्‍यवस्‍थापनाच्‍या आधारे कृषिविद्या विभागाच्‍या प्रक्षेत्रावरील बहरलेल्‍या पिक प्रात्‍याक्षिकाबाबत व संशोधनाबाबत मान्‍यवरांनी समाधान व्‍यक्‍त करून शेतक-यांच्‍या व हवामान बदलाच्‍या दृष्‍टीने संशोधनाच्‍या अधिक उपयुक्‍ततेबाबत मान्‍यवरांनी सुचना केल्‍या. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्राचार्य डॉ डि एन गोखले यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ ए एस कार्ले, डॉ पी के वाघमारे, डॉ विशाल अवसरमल, प्रा सुनिता पवार, डॉ एन जी कु-हाडे व विभागातील कर्मचारी व विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले. 
वनामकृविच्‍या कृषिविद्या विभागाच्‍या पदव्‍युत्‍तर पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या संशोधन प्रक्षेत्रास कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री केदार साळुंके, मा श्री अनंतराव चोंडे, मा श्री रविंद्र देशमुख आदीसह शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदी