Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Tuesday, April 17, 2018
Saturday, April 14, 2018
वनामकृवित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठातील विद्यार्थ्यी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने भारतरत्न डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती दिनांक 14 एप्रिल रोजी उत्साहात साजरी करण्यात
आली. यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे शिक्षण संचालक डॉ
विलास पाटील यांच्या हस्ते पुजन करून विनम्र अभिवादन करण्यात करून त्यांनी जंयती
निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. विद्यापीठाच्या वतीने ढोलताश्याच्या
गजरात डॉ आंबेडकरांच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली. कार्यक्रमास संशोधन
संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले, कुलसचिव
डॉ गजेंद्र लोंढे, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ ए आर सावते,
विद्यार्थ्यी कल्याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदीसह प्राध्यापक, कर्मचारी व
विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ आशाताई
देशमुख यांनी केले, आभार प्रा अनिस कांबळे यांनी मानले.
Friday, April 13, 2018
परभणी कृषि महाविद्यालयाचा रूपेश बोबडे कृषी पदव्युत्तर सामाईक प्रवेश परिक्षेत राज्यात प्रथम
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि
महाविद्यालयाचा विद्यार्थ्यी रूपेश बोबडे हा महाराष्ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा
मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या सन
2018 सामाईक प्रवेश परिक्षेत कृषि शाखेत राज्यात प्रथम आला असुन परसराम लांडगे
हा चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तसेच बळीराम सातपुते, पंकज घोडके, विश्वास
तेलांग्र, सोनाली उबाळे, सारीका वरपे, सविता लिंबुळे, स्वाती चव्हाण, सुप्रीया कलबरकर, अवधूत पवार, शेख अमन आदीसह पहिल्या शंभर मध्ये महाविद्यालयाच्या 13 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या यशाबाबत शिक्षण संचालक डॉ विलास पाटील व प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी अभिनंदन केले. सदरिल
परिक्षेबाबत महाविद्यालयातील रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी
विशेष सराव घेण्यात आला होता, यात विविध विषयाचे विभाग प्रमुख व प्राध्यापक प्रा. आर व्ही चव्हाण, प्रा. व्ही बी जाधव,
डॉ मिर्झा बेग, प्रा एस व्ही कल्याणकर, प्रा पी के वाघमारे, डाॅ सी एच आंबडकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.
Thursday, April 12, 2018
वनामकृवित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त अठरा तास अभ्यास उपक्रम
वसंतराव
नार्इक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त अठरा तास अभ्यास उपक्रमाचे आयोजन दिनांक ११ एप्रिल रोजी करण्यात आले होते.
या अभ्यासमालिकेचे उदघाटन कुलगुरू
मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण संचालक
डॉ विलास पाटील, सहयोगी
अधिष्ठाता डॉ. धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ डि एन धुतराज, डॉ जी एम
वाघमारे, डॉ राकेश आहिरे, डॉ.
बाबासाहेब ठोंबरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अठरा तास अभ्यासवर्गाच्या उपक्रमात कृषि महाविद्यालयाचे दोनशे
साठ विद्यार्थी व विद्यार्थींनीनी सहभाग नोंदविला. यावेळी सुत्रसंचालन डॉ आर जी
भाग्यवंत यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषि महाविद्यालयातील प्राध्यापक
व कर्मचा-यांसह विद्यार्थ्यी
प्रतिनिधी सुमित माने, पवन आळणे, राहुल शिंदे, शुभम तुरूकमाने आदींनी परिश्रम घेतले.
Thursday, April 5, 2018
कृषि पदवीधरांनी कृषि उद्योजकतेकडे वळावे,.....जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी (जालना) श्री दशरथ तांबाळे
वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात आयोजित अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात प्रतिपादन
कृषि अभ्यासक्रमातील वैविध्यपुर्ण विषयामुळे कृषीच्या
विद्यार्थ्यांना स्पर्धापरिक्षेत यश मिळविण्यासाठी मदत होते, अनेक कृषि पदवीधर राज्यातील विविध क्षेत्रात प्रशासकीय पदावर कार्यरत आहेत. परंतु कृषि
पदवीधरांनी केवळ नौकरदार होण्यापेक्षा रोजगार देणाऱ्या कृषि उद्योजकतेकडे वळावे, असे
प्रतिपादन जालना येथील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री दशरथ तांबाळे यांनी
केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्या
अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांचा तृतीय सत्राच्या विद्यार्थ्याच्या वतीने निरोप
समारंभ दिनांक 5 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता, त्या प्रसंगी ते बोलत
होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील हे होते तर
व्यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. डॉ पी आर शिवपुजे, प्राचार्य
डॉ डि एन गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
श्री दशरथ तांबाळे पुढे म्हणाले की, परभणी
कृषि महाविद्यालयातील सुविधा व विद्यापीठ ग्रंथालयाचा उपयोग घेऊन अनेक विद्यार्थ्यी
स्पर्धा परिक्षेत यशस्वी झाले, आज ते विविध क्षेत्रात प्रशासकीय पदावर कार्य
करित आहेत. प्रशासकीय पदावर कार्य करतांना स्वत:तील कौशल्याचा व ज्ञानाचा वापर
करण्यास मर्यादीत वाव आहे. परंतु कृषी उद्योजकतेसह कृषि संशोधन व शैक्षणिक
क्षेत्रात मोठा वाव आहे.
मार्गदर्शनात डॉ पी आर शिवपुजे यांनी
विद्यार्थ्यींनी जीवनात यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम व प्रामाणिकपणा अंगीकरण्याचा
सल्ला दिला तर अध्यक्षीय समारोप शिक्षण संचालक डॉ विलास पाटील कृषि पदवीधरांनी
शिस्तीचे जीवनात पालन करून वाईट सवयीपासुन दुर राहण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ डि एन
गोखले यांनी सन 2017-18 मध्ये महाविद्यालयातील राज्यसेवा व बॅकिंग परिक्षेत उत्तीर्ण होऊन 35
विद्यार्थ्यांची निवड झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शुभांगी आवटे
व पंकज मुखीरवाड यांनी केले तर आभार ऐश्वर्या काळे हिने मानले. यावेळी आयोजित सांस्कृतिक
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरिकरण केले. कार्यक्रमास
महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित
होते.
Tuesday, April 3, 2018
परभणी जिल्हयात बालकातील कुपोषण व वाढांक मुल्यमापनावर नऊ शास्त्रोक्त कार्यशाळा संपन्न
परभणी जिल्हा मानव विकास समिती व
वनामकृविच्या मानव विकास व अभ्यास विभागाचा संयुक्त उपक्रम
कार्यशाळेत मार्गदर्शनात मानव विकास शास्त्रज्ञा प्रा. विशाला पटणम यांनी पुढील बाबीवर भर दिला
बालकातील कुपोषण
व संबंधीत विकासात्मक दोषांच्या निर्मुलनासाठी परभणी जिल्हा
मानव विकास समिती, महिला व बालविकास विभाग, परभणी जिल्हा परिषद आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठातील सामाजिक विज्ञान महाविद्यालयाच्या मानव विकास व अभ्यास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक बालविकास सेवा योजनाचे
कर्मचारी व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकांसाठी बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी
करण्यासाठी वाढांक मुल्यमापनावर शास्त्रोक्त कार्यशाळा मार्च महिण्यात जिल्हयात विविध ठिकाणी घेण्यात आल्या. परभणी, पुर्णा, पालम, सोनपेठ, गंगाखेड, मानवत, जिंतूर, पाथरी व सेलू या नऊ तालुक्यांच्या ठिकाणी कार्यशाळा घेण्यात आल्या. यात परभणी जिल्हयातील एकात्मिक बालविकास सेवा योजनाचे 1260
कर्मचारी, जि.प. शाळा शिक्षक व कस्तुरबा गांधी बालिका
विद्यालयातील
235 विद्यार्थीनींनी सहभाग नोंदविला.
मानव विकास विभागाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा गावागावात मोठया
प्रमाणात प्रसार व्हावा, या उद्देशाने सदरिल कार्यशाळा
आयोजनाची संकल्पना
परभणी जिल्हाधिकारी मा. शिवाशंकर व वनामकृविचे कुलगुरु मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु व मानव
विकास शास्त्रज्ञा व विभाग प्रमुख प्रा. विशाला पटनम पुढाकारांनी आखण्यात येऊन कार्यशाळांसाठी महाराष्ट्र शासनाद्वारे उपलब्ध निधीतुन परभणी जिल्हा मानव विकास समितीच्या
वतीने सदरिल कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळांच्या यशस्वीततेसाठी परभणी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. पृथ्वीराज बी. पी., उपमूख्य कार्यकारी अधिकारी
(बा.क) श्री एस. ई. देसाई व 9 तालुक्याचे सीडीपीओ यांनी विशेष प्रयत्न
केले. बालकांच्या
चांगल्या भविष्यासाठी या सारख्या नावीन्यपूर्ण कार्यशाळांच्या नियमित आयोजनाची गरजेचे असल्याचे मनोगत
प्रशिक्षणार्थीनी व्यक्त केले.
कार्यशाळेत मार्गदर्शनात मानव विकास शास्त्रज्ञा प्रा. विशाला पटणम यांनी पुढील बाबीवर भर दिला
सदरिल प्रशिक्षणात विद्यापीठातील मानव विकास शास्त्रज्ञा व विभाग प्रमुख प्रा. विशाला पटनम यांनी प्रामुख्यांने नावीन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब
करुन प्रशिक्षण दिले. शास्त्रोक्त कार्यशाळेसाठी वातावरण निर्मिती करुन
प्रशिक्षणार्थीनींना स्वत:ची कर्तव्य व कार्याविषयी संवेदनशील करण्यात येऊन त्यांच्यात बालकांच्या वाढांक मूल्यमापनाच्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. वाढांक मूल्यमापनावर
प्रात्याक्षिके, पॉवर पॉईंट सादरीकरण, संबंधीत अभ्यास संदर्भ, मनोरंजक गोष्टी, उदाहरणे आदींचा अवलंब करण्यात आला तसेच संबंधीत विषयाच्या घडीपुस्तिका व इतर साहित्याचे वाटपही करण्यात आले.
‘तन स्वस्थ तर मन स्वस्थ’ या उक्तीनुसार मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक स्वस्थाचे महत्व पटवून देण्यात आले.
गर्भवती
मातांनी स्वतःच्या आहार, आरोग्य, लसीकरण, मानसिक स्वास्थ्य, व्यायाम, प्रसुती दरम्यान योग्य काळजी घेतल्यास
सुदृढ नवजात अर्भक जन्मास येऊ शकते. प्रौढपणी त्यांचे अपेक्षीत असलेली त्यांचे वजन (6%), उंची (30%), व डोक्याचा घेर (60%) याप्रमाणे विकसित होतो. नवजात
अर्भकाचे वजन योग्य
असेल तरी जन्मानंतर सुरुवातीच्या काळात
त्यांची विशेष
काळजी घ्यावी लागते याविषयी कुटुंबानी जागरुक असावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
वयाच्या 4
वर्षापर्यंत बालकाचा
आहार, आरोग्य, लसीकरण आदीबाबत काळजी घेतल्यास त्यांच्या
डोक्याचा घेर हा प्रौढ व्यक्तीच्या असावयाच्या डोक्याचा घेराच्या 90 टक्के होऊन पुढे 8 वर्षांपर्यंत त्यांच्या वयोपरत्वे अशीच काळजी घेतल्यास तो 98 टक्के इतका वाढतो व 8 ते 18 वर्ष वयापर्यंत त्याची उपरोक्त
प्रमाणे काळजी घेतली गेल्यास त्यात केवळ 2 टक्के वाढ होते. यावरुन असे स्पष्ट होते की, गर्भावस्थेपासूनच बालकांची
सर्वतोपरी काळजी घेतल्यास बालकातील कुपोषण तथा त्यासंबंधीच्या विकासात्मक दोषांचे निराकरण होऊन त्यांचा उच्चतम सर्वागींण विकास घडल्यामुळे भविष्यात अशी बालके यशस्वी व आनंदीपणे आपले जीवन
व्यतीत करण्यासाठी सक्षम होतात, अशी ग्वाही प्रा. विशाला पटनम यांनी दिली. बालसंगोपनाबाबत
पालकांना जर स्मार्ट व्हावयाचे असेल तर उपरोक्त बाबतीत अधिक जागरुक असणे नितांत
गरजेचे असल्याचे मत त्यांनी या कार्यशाळांत व्यक्त केले.
Sunday, April 1, 2018
गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी शेतक-यांनी शेतातील कपाशीच्या प-हाटी तात्काळ काढाव्यात.....आमदार मा. डॉ राहुल पाटील
मौजे जलालपुर येथे आयोजित प्रात्याक्षिक
कार्यक्रमात प्रतिपादन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्त्र विभाग
आणि कृषि विभाग (राज्य शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 31 मार्च रोजी मौजे जलालपूर (ता. जि परभणी) येथे येत्या हंगामात कपाशीवरील गुलाबी बोंडअळी
व्यवस्थापनासाठी पऱ्हाटी नष्ट करण्यासाठी प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन
परभणीचे आमदार मा. डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी. आर. शिंदे,
सीड असोशियनचे डॉ. एस. डी. वानखेडे, तालूका कृषि अधिेकारी श्री. बनसवडे, जलालपूरचे
सरपंच संतोबा पुंजारे, संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोलंकी, आदींची प्रमुख उपस्थिती होती. जलालपुर येथील शेतकरी अरुण टेकाळे यांच्या शेतात कपाशीची श्रेडर यंत्राव्दारे पऱ्हाटीचा
चुरा करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
मार्गदर्शन करतांना आमदार मा. डॉ राहुल पाटील
यांनी शेतकरी बांधवानी शेतातील कपाशीच्या पऱ्हाटी तात्काळ
काढूण टाकण्याचे आवाहन केले. तसेच नविन तंत्रज्ञानाचा वापर करुन येत्या हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी
आतापासूनच काळजी घेण्याचा
सल्ला दिला. विद्यापीठाचे विस्तार शिक्षण
संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांनी गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम खंडीत करण्यासाठी कपाशी पऱ्हाटी नष्ट करण्याची गरजेचे असल्याचे नमुद केले. कृषि अधिकारी
श्री. बनकर यांनी सुत्रसंचालन
केले. प्रात्यक्षिक कार्यक्रमास परीसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
Subscribe to:
Posts (Atom)











