Thursday, June 16, 2022

उद्यानविद्या महाविद्यालयाच्‍या वतीने माझी वसुंधरा अभियान

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि वि़द्यापीठातील उद्यानविद्या महावि़ालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनाच्‍या वतीने माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत परभणी जिल्हाधिकारी आणि तहसिल कार्यालय परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्‍यात आली. या प्रसंगी जिल्ह्राच्या जिल्हाधिकारी मा श्रीमती आंचल गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी श्री महेश वडदकर, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी श्री सुशांत शिंदे, तहसिलदार श्री संजय बिराजदार, नायब तहसिलदार श्री शेख आदींनी कार्यक्रमास शुभेच्छा देऊन स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्‍यांनी स्वच्छता रॅली काढुन जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालय परिसर स्वच्छ केला. सदर अभियान प्राचार्य डॉ जी एम वाघमारे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ सचिन मोरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. एस आर बरकुले यांच्‍या मार्गदर्शनाखाली रासेयोच्‍या स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविकांनी राबविला. कार्यक्रमास महाविद्यालयातील डॉ. जि पी जगताप, डॉ. बी एम कलालबंडी, डॉ. व्हि. व्हि. भगत, डॉ. अे. एस. लोहकरे, डॉ. एस आर वानखेडे, डॉ. पी एस देशमुख, डॉ. एस बी पव्हणे, डॉ. एस एस बांगर, डॉ. एस वाय ढाले, श्री एस डी पुंड, श्री व्हि जी कांबळे, श्री एस के वाघ आदींनी सहभाग नोंदवला.


वनामकृवित हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रमांतर्गत खरीप पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहू शेती संशोधन केंद्राच्‍या वतीने हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रम अंतर्गत संशोधनात्मक पीक प्रात्यक्षिक योजने करिता मौजे उजळांबा, बाभुळगाव व सोन्ना ही गावे दत्‍तक गावे म्‍हणु निवड करण्‍यात आली असुन दत्‍तक गावातील शेतकरी बांधवा करिता दिनांक ११ जुन रोजी खरीप शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमास मुख्‍यशास्‍त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे, सरपंच सरपंच श्री. गणेश दळवे, श्री. ज्ञानोबा पारधे, कृषि अभियंता डॉ. एम. एस. पेंडके, डॉ. पी. एच. गौरखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मेळाव्‍यात खरीप पिक व्यवस्थापनाबाबत डॉ. वासुदेव नारखेडे यांनी मार्गदर्शन करून विद्यापीठ विकसित विविध पिकाच्‍या वाणाची सविस्‍तर माहिती दिली. कार्यक्रमात सोयाबीनच्‍या एमएयुएस १५८, तुरीच्‍या बीडीएन ७११, मुग बीएम २००३-०२, खरीप ज्वारी पीव्‍हीके १००९ या सुधारीत वाणाची बियाणे शेतकऱ्यांना संशोधन प्रात्यक्षिकासाठी देण्यात आले. हवामान बदलानुरुप परिस्थितीत या पिकांच्या वाणांचा अभ्यास शेतकऱ्यांच्या शेतावर करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्‍प राबविण्‍यात येत आहे. या प्रसंगी “हवामान बदलानुरुप परिस्थितीत कोरडवाहू शेतीचे व्यवस्थापन” ही पुस्तिका शेतकरी बंधुंना वाटप करण्यात आली. तसेच कृषि ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथील विद्यार्थींनी सोयाबीन बियाण्याला बीज प्रक्रिया करण्यासंबंधीचे प्रात्यक्षीक करून दाखविले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती गुंजकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी बालासाहेब घोलप, विनायक रिठे, मोरेश्वर राठोड, दिपक भुमरे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मौजे बाभुळगाव, उजळांबा व सोन्ना येथील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Wednesday, June 15, 2022

वनामकृवितील कृषी अभियांत्रिकी व अन्नतंत्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रेल्वेस्थानक परिसरात राबविली स्वच्छता मोहिम

माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत उपक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय व अन्नतंत्र महाविद्यालयाच्‍या राष्ट्रीय सेवा योजनाच्‍या वतीने माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत पर्यावरण जनजागृती व स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविण्‍यात आले. यात दिनांक १३ जुन रोजी राष्ट्रीय योजनेच्या स्वयंसेवकांनी विद्यापीठ प्रवेशव्‍दार परिसरात जलसिंचन, वृक्षारोपण व व्यसनमुक्ती संदर्भातील पथनाट्ये सादर केली. शहरातील रेल्वे स्थानक परिसरात स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहिम राबवुन प्लास्टिक सारख्या अविघटनशील व विघटनशील कचरा जमा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली. त्याच प्रमाणे रेल्‍वेस्थानकाच्या समोरील भागात वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वितेकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय खोडके, कार्यक्रम अधिकारी डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. प्रवीण घाटगे, डॉ. भारत आगरकर, रेल्वे स्थानक अधिक्षक अरविंद इंगोले, पोलीस निरीक्षक विकास झा आदींनी मार्गदर्शन केले. सदरिल “माझी वसुंधरा अभियान” उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या सुचनेनुसार  राबविण्यात आला. स्वयंसेवक अजिंक्य कदम, धनराज केंद्रे, खुशबू कुमारी, नेहा जाधव, जानव्ही चव्हाण, सौरभ काळे, विश्वजित तिकटे, गायत्री वाणी, दिपाली अवचार, प्राची गोटामी, आरती महाजन, अवंतिका पारवे, क्षितिजा मस्के आदीनी परिश्रम घेतले.



Tuesday, June 14, 2022

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत तिर्थक्षेत्र त्रिधारा येथे रासेयोच्‍या स्‍वयंसेवकांची स्‍वच्‍छता मोहिम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजना वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत दिनांक ७ जुन ते १३ जुन दरम्‍यान पर्यावरण जनजागृती व स्‍वच्‍छता सप्‍ताहा निमित्‍त विविध उपक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. या अंतर्गत दिनांक १३ जुन रोजी तिर्थक्षेत्र त्रिधारा येथे रासेयोच्‍या स्‍वयंसेवकांनी स्‍वच्‍छता मोहिम राबविली. यावेळी येथील मंदिर परिसर तसेच नदीचा परिसराची स्‍वच्‍छता केली. सदरिल कार्यक्रम प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ सचिन मोरे, कार्यक्रम अधिकारी डॉ मधुकर खळगे, डॉ अनुराधा लाड आदींच्‍या मार्गदर्शनाखाली राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या ७० स्‍वयंसेवक आणि स्‍वयंसेविकांनी राबविली.


आत्मनिर्भर भारतासाठी डिजिटल तंत्रज्ञानचा वापर कृषी क्षेत्रात आवश्यक ...... प्रा. वीरेंद्र तिवारी

वनामकृवितील पदव्‍युत्‍तर विद्यार्थी व शास्‍त्रज्ञांना देशातील नामांकित आयआयटी खरगपुर येथे डिजिटल तंत्रज्ञानावर प्रशिक्षण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्‍ली पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) यांच्‍या विद्यमाने खरगपुर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था – आयआयटी येथे “पीक व्यवस्थापनासाठी डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर” यावरील दोन आठवडीय (दिनांक ६ ते १७ जुन) तसेच “कॅड-कॅम तंत्रज्ञानाचा कृषि यंत्र निर्मितीसाठी वापर” यावरील तीन आठवडीय (दिनांक ६ ते २५ जुन) प्रशिक्षणाचे  विद्यापीठातील पदव्‍युत्‍तर विद्यार्थी आणि शास्‍त्रज्ञ यांच्‍या करिता आयोजन करण्यात आले आहे. 

सदरिल प्रशिक्षणाचे उदघाटन दिनांक ६ जुन रोजी खरगपुर येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयआयटीचे संचालक प्रा. वीरेंद्र तिवारी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी व अन्न अभियांत्रिकी विभागाच्‍या विभाग प्रमुख प्रा. रिंतु बॅनर्जी या होत्या. तसेच नाहेप प्रकल्‍पाचे प्रमुख अन्‍वेषक डॉ. गोपाळ शिंदे यांची ऑनलाईन उपस्थिती होती. डॉ. राजेंद्र माचावरम, प्रकल्पाचे उपप्रमुख आवेश प्रा तरुण कांती भट्टाचार्य, प्रा महुआ भट्टाचार्य, प्रा पियुष सोनी, प्रा हिफाजूर रेहमान आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात प्रा विरेंद्र तिवारी म्‍हणाले की, आत्‍मनिर्भर भारत बनविण्‍यासाठी कृषि क्षेत्र आत्‍मनिर्भर झाले पाहिजे. यासाठी कृषी यंत्रे, स्वयंचलित उपकरणे, प्रक्रिया तंत्रज्ञान यामध्ये संशोधन होणे गरजेचे आहे. डिजिटल तंत्रज्ञानाने काटेकोर शेती तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. विविध इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल तंत्रज्ञानाव्‍दारे शेतीकरिता उपयुक्‍त किफायतीशील स्‍मार्ट साहित्‍य न‍िर्मिती करावी लागणार आहे. विद्यार्थांनी प्रशिक्षणाचा उपयोग करून संशोधनासाठी वापर करण्‍याचे त्‍यांनी आवाहन केले.

प्रकल्पाचे उपप्रमुख अन्‍वेषक प्रा. तरुण कांती भट्टाचार्य यांनी नाहेप प्रकल्‍पात राबविण्‍यात येत असलेल्‍या सेन्सर्स, तंत्रज्ञान, आयओटी या विषयी संशोधनाची माहिती दिली.

प्रो. रिंतु बॅनर्जी यांनी कृषी व अन्न अभियांत्रिकी विभागाची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कौशल्य आत्मसात करण्‍याचा सल्‍ला दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ. राजेंद्र माचावरम यांनी प्रशिक्षणाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माया लक्ष्मी यांनी केले. सदरील प्रशिक्षणाचे आयोजन राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप), वनामकृवि, परभणी आणि  भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर यांच्‍यात झालेल्‍या सामंजस्य करारानुसार करण्यात आले असुन प्रशिक्षणासाठी एकूण ६५ पदव्युत्तर आणि आचार्य पदवी विद्यार्थी तसेच नाहेप प्रकल्पातील ६ अभियंते सहभागी झाले आहेत.

सदरील प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरू मा डॉ. प्रमोद येवले, आयआयटीचे संचालक प्रा विरेंद्र तिवारी, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली नाहेप प्रमुख अन्‍वेषक डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. कैलास डाखोरे, डॉ. दयानंद टेकाळे, डॉ. राजेंद्र माचावरम, डॉ. एम. भट्टाचार्य, प्रो. ए.के. देब यांनी केले आहे. प्रशिक्षण समन्वयक म्हणून रवीकुमार काललोजी, डॉ अनिकेत वाईकर, शिवानंद शिवपुजे, श्वेता सोळंके, अपूर्वा देशमुख, संजीवनी कानवते, गोपाळ रनेर आदी काम पाहत आहेत.

Friday, June 10, 2022

वनामकृवित शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळाचे तीन दिवशीय प्रशिक्षण संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय अंतर्गत असलेले कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र आणि नांदेड येथील वनश्री सामाजिक, सांस्कृतीक व ग्रामीण विकास संस्था यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक ८ ते १० जुन दरम्‍यान शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकरिता प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले होते. सदरिल प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रम दिनांक १० जुन संपन्‍न झाला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी मुख्‍य कृषिविद्यावेत्‍ता डॉ. गजानन गडदे हे होते तर वनश्री संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेश राठोड, चार्टेड अकाऊंटंट श्री. मितेश मालीवाल, डॉ.मधुमती कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

मार्गदर्शनात डॉ. गडदे म्हणाले की, शेतकरी उत्‍पादक कंपन्‍याच्‍या माध्‍यमातुन शेतकरी एकत्र येत असुन एकत्रित कृषि मालाची विक्री केल्‍यास शेतमाल विक्रीतुन अधिक नफा मिळण्‍यास मदत होत आहे. शेतक-यांच्या शेतीशी निगडीत समस्याचे निराकरण करण्यासाठी विद्यापीठ सदैव तत्पर असल्‍याचे ते म्‍हणाले. तसेच वनश्री संस्थेच्या संचालिका श्रीमती नीता माळी यांनी विद्यापीठाच्‍या प्रशिक्षणातील मार्गदर्शनामुळे अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती मिळाल्‍याचे मत मनोगतात व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व श्री.मधुकर मांडगे यांनी केले तर आभार श्री. दिपरत्न सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानोबा माहोरे, दिगंबर रेंगे, नितीन मोहिते, शेख साजेद, शेख सुलताना शेख पाशा आदींनी विशेष परिश्रम घेतले.

शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शेतीशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून देणे व कंपनी सदस्‍य शेतक-यांचे ज्ञान वृद्धींगत करून त्यांचे उत्पन्न वाढविणे हा उद्देश ठेवुन सदरिल प्रशिक्षणाचे आयोजन विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आले होते.

प्रशिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाने सोयाबीन, कापुस व हळद लागवड, विक्री आणि प्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थ निर्मीती, शेळीपालन, शेतीमधील संधी, आव्हाने व समस्या, मुल्यसाखळी विश्लेषण आणि विपणन, कृषि प्रणाली मध्ये स्टोरेज, पॅकेजींग, ब्रँण्डींग व लेबलींग आदी विषयांवर विद्यापीठातील तज्ञांनी मार्गदर्शन केले. 

Thursday, June 9, 2022

पिकांवरील शत्रुकिडींच्‍या नियंत्रणात मित्रकिडींची मोठी भुमिका ...... किटकशास्‍त्रज्ञ डॉ अनंत लाड

पर्यावरण जनजागृती व स्‍वच्‍छता सप्‍ताहानिमित्‍त मौजे इंदेवाडी येथे आयो‍जित कार्यक्रमात प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजना आणि ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाच्‍या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत दिनांक ७ जुन ते १३ जुन दरम्‍यान पर्यावरण जनजागृती व स्‍वच्‍छता सप्‍ताहानिमित्‍त विविध उपक्रमाचे आयोजन करण्‍यात आले. या अंतर्गत दिनांक ८ जुन रोजी मौजे इंदेवाडी येथे शेतीतील मित्रकीडी यावर किटकशास्‍त्रज्ञ डॉ. अनंत लाड यांचे व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमास सरपंच श्री मोहन कच्‍छवे, उपसरपंच श्री संदिप चंदेल, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ मधुकर खळगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ अनंत लाड म्‍हणाले की, विविध पिकांवरील शत्रुकिडींचे व्‍यवस्‍थापनात निसर्गातील विविध मित्रकिडींंची मोठी भुमिका असुन अनेक मित्रकिडींचे खाद्य हे शत्रुकिडी आहेत. परंतु अनेक वेळा शेतकरी बांधव मित्रकिडींना शत्रुकीड समजुन किटकनाशकांची फवारणी करतात. यामुळे किटकनाशक फवारणीचा खर्च तर वाढतोच परंतु निसर्गातील मित्रकीडींची मोठी हानी होऊन निसर्गाचा समतोल बिघडतो. त्‍यामुळे शेतकरी बांधवाना मित्रकिडींची माहिती आवश्‍यक असल्‍याचे सांगुन त्‍यांनी विविध मित्रकिडीं बाबत मार्गदर्शन केले.  

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ मधुकर खळगे यांनी केले तर आभार कृषिदुत गणेश माळी यांनी मानले. कार्यक्रमास मौजे इंदेवाडी येथील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. सदरिल कार्यक्रम प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, रावे समन्‍वयक डॉ राजेश कदम, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ सचिन मोरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली राष्‍ट्रीय सेवा योजने स्‍वयंसेवक आणि रावेचे कृषिदुत यांनी राबविला.