महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व
स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास आणि
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री पदी वर्णी लागल्याबद्दल
पालकमंत्री माननीय नामदार सौ. मेघनाताई बोर्डीकर-साकोरे यांचा भव्य सत्कार दिनांक ५
एप्रिल रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सभागृहात करण्यात आला.
हा भव्य सत्कार महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने
आयोजित राज्यस्तरीय मेळाव्यात करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून परभणीचे माननीय आमदार डॉ. राहुल
पाटील, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि हे होते.
कार्यक्रमात माननीय नामदार सौ. मेघनाताई बोर्डीकर-साकोरे यांचे माननीय कुलगुरू
यांनी मन:पूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांनी वीज
तांत्रिक कामगारांच्या भूमिकेचे आणि सेवेचे महत्व अधोरेखित केले.
यावेळी महापारेषण कंपनीचे प्रकल्प संचालक श्री. अविनाश निंबाळकर, वीज तांत्रिक
संघटनेचे अध्यक्ष श्री. भाऊसाहेब भाकरे, सरचिटणीस श्री. हाजी
सय्यद जहिरोद्दिन, उप सरचिटणीस श्री. नानासाहेब चट्टे,
नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. राजाराम माने, छत्रपती संभाजीनगरचे श्री. सय्यद नसीर कादरी, महानिर्मितीचे
मुख्य व्यवस्थापक श्री. अनंत कोंत आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमास संपूर्ण महाराष्ट्रातून वीज तांत्रिक कर्मचारी आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.