नागपूर येथे दिनांक ३ ते
८ एप्रिल २०२५ दरम्यान महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने
आयोजित "महाराष्ट्र कुलगुरू चषक क्रिकेट स्पर्धा-२०२५" मध्ये
सहभागासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचा
क्रिकेट संघ नागपूरकडे दिनांक २ एप्रिल रोजी रवाना झाला आहे.
संघाच्या या महत्त्वपूर्ण
सहभागासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. भगवान
आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ.
राकेश अहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, नियंत्रक श्री. प्रविण
निर्मळ, विद्यापीठ अभियंता इंजि. दीपक कशाळकर, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.
राजेश कदम आणि विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे यांनी संघास मनःपूर्वक शुभेच्छा
दिल्या.
गेल्या वर्षी गोंडवाना
विद्यापीठात आयोजित या स्पर्धेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या संघाने
उत्तम कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले होते. यंदाच्या हंगामात संघ अधिक जोमाने
खेळून विजेतेपद आपल्या नावे करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
या स्पर्धेसाठी संघातील
खेळाडू सज्ज असून उत्कृष्ट प्रदर्शनासाठी त्यांनी संपूर्ण तयारी केली आहे.
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांचे संघ या प्रतिष्ठेच्या क्रिकेट स्पर्धेत सहभागी
होत असतात, त्यामुळे या स्पर्धेतील सामने अत्यंत चुरशीचे आणि रोमांचक होण्याची शक्यता
आहे.
विद्यापीठाच्या संपूर्ण
परिवारातर्फे संघाला यशासाठी शुभेच्छा!