माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले शास्त्रज्ञांचे अभिनंदन
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील अखिल भारतीय
समन्वित करडई संशोधन प्रकल्प विभागाने करडई संशोधनात सातत्याने उत्कृष्ट कार्य करत
देशपातळीवर क्षेत्रवाढीस दोन नव्या करडई वाणांना अधिकृत मान्यता मिळवून दिली आहे. पीबीएनएस
१५४ (परभणी सुवर्णा) व पीबीएनएस १८४ या वाणांना केंद्र सरकारच्या कृषि व शेतकरी
कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय पीक गुणवत्ता, वाण अधिसूचना व
प्रसारण समिती (CSC on CSN & RV) च्या ९३व्या बैठकीत
मान्यता मिळाली आहे.
या
वाणांना महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश
आणि तेलंगणा या राज्यांमध्ये (झोन-१) लागवडीसाठी शिफारस करण्यात आली असून, पीबीएनएस १८४ वाणाला झोन-२ अंतर्गत इतर प्रमुख करडई उत्पादक राज्यांमध्येही
लागवडीसाठी मान्यता देण्यात आली आहे.
विद्यापीठाचे
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख
डॉ. हिराकांत काळपांडे, तसेच विद्यापीठ प्रशासनाच्या
सहकार्याने हे यश प्राप्त झाले आहे. माननीय कुलगुरूंनी सहभागी शास्त्रज्ञांचे
अभिनंदन करताना सांगितले की, या वाणांमुळे शेतकऱ्यांना अधिक
उत्पादनक्षम व गुणवत्तापूर्ण करडई वाण मिळतील, ज्यामुळे
त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल.
संशोधन
संचालक डॉ. खिजर बेग यांनीदेखील टीमचे अभिनंदन करत सांगितले की, या वाणांचे बियाणे लवकरच राष्ट्रव्यापी स्तरावर उत्पादनासाठी व विक्रीसाठी
उपलब्ध होतील, जे शेतकऱ्यांना नवे पर्याय उपलब्ध करून देतील.
या
वाणांच्या विकासामध्ये डॉ. एस. बी. घुगे, डॉ. आर. आर. धुतमल
तसेच अखिल भारतीय समन्वित करडई प्रकल्पातील वैज्ञानिक व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे
महत्त्वाचे योगदान आहे.
पीबीएनएस
१५४ (परभणी सुवर्णा) या वाणाला ६ मार्च २०२३, तर पीबीएनएस १८४
वाणाला ३१ ऑगस्ट २०२२ रोजी अधिसूचित करण्यात आले होते.
या
नव्या वाणांचा प्रसार प्रभावीपणे करण्याचा विद्यापीठाचा संकल्प असून, हे वाण देशातील करडई उत्पादनामध्ये एक नवीन अध्याय उघडतील, असा विश्वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे.
वाणांची वैशिष्ट्ये
पीबीएनएस
१५४ (परभणी सुवर्णा) -
शेतकऱ्यांच्या
आर्थिक उत्पन्नात वाढ करणाऱ्या पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा) हा वाण १२४
ते १२६ दिवसांत परिपक्व होत असून याचे कोरडवाहू मध्ये उत्पादन १० ते १२ क्विंटल
प्रति हेक्टर एवढे मिळते. या वाणाचे तेलाचे प्रमाण सुमारे ३०.९० टक्के असून, त्याला बाजारात चांगली मागणी आहे. या वाणाच्या विशेष वैशिष्ट्यांमध्ये
मावा कीडीस प्रतिकारक्षमता, पानावरील ठिपके व मर रोगांवरील
सहनशीलता आहे.
पीबीएनएस
१८४ -
कोरडवाहू क्षेत्रात १२ ते १५ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देणारा पीबीएनएस १८४ हा नवा वाण बागायती भागात १८ ते २० क्विंटल प्रति हेक्टर इतके उत्पादन देतो. या वाणामध्ये तेलाचे प्रमाण ३१.३ टक्के इतके असून, १२० ते १२४ दिवसांमध्ये परिपक्व होतो. यामध्ये विशेष बाब म्हणजे, मर/उबळी रोगास व मावा कीडीस प्रतिकारक्षम, पानावरील ठिपके रोगास सहनशील आहे.
पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा)
Parbhani Agricultural University Achieves Major Milestone in Safflower Research – 'Parbhani Suvarna' and 'PBNS 184' Varieties Approved for National-Level Cultivation
Hon’ble Vice Chancellor Prof. (Dr.) Indra Mani Congratulates the Scientists
The All
India Coordinated Research Project (AICRP) on Safflower at Vasantrao Naik
Marathwada Krishi Vidyapeeth (VNMKV), Parbhani, has achieved consistent
excellence in safflower research and has now secured national-level approval
for two new safflower varieties. The varieties PBNS 154 (Parbhani Suvarna) and PBNS
184 have been officially recognized during the 93rd meeting of the Central
Sub-Committee on Crop Standards, Notification, and Release of Varieties (CSC on
CSN & RV) under the Ministry of Agriculture and Farmers’ Welfare,
Government of India.
These
varieties have been recommended for cultivation in Maharashtra, Karnataka,
Andhra Pradesh, and Telangana (Zone-1), while PBNS 184 has also received
approval for other major safflower-producing states under Zone-2.
Under the
guidance of Hon’ble Vice Chancellor Prof. (Dr.) Indra Mani, and with the
support of Director of Research Dr. Khizer Baig, Head of Botany Department Dr.
Hirakant Kalpande, and the university administration, this success was made
possible. Hon’ble Vice Chancellor Prof. (Dr.) Indra Mani congratulated the
involved scientists, stating that these new varieties will provide farmers with
higher-yielding and quality safflower seeds, which will significantly enhance
their income.
Director
of Research Dr. Khizer Baig also congratulated the team, noting that seeds of
these varieties will soon be available nationwide for production and sale,
offering new options for farmers.
Dr. S. B.
Ghughe, Dr. R. R. Dhootmal, and other scientists and technical staff from the
AICRP on Safflower played a key role in the development of these varieties.
PBNS 154 (Parbhani Suvarna) was officially notified on March 6, 2023, while
PBNS 184 was notified on August 31, 2022.
The
university is committed to effectively promoting these new varieties, which are
expected to mark a new chapter in safflower cultivation across India.
Key
Features of the Varieties
PBNS 154
(Parbhani Suvarna) : This
variety is known for boosting farmers’ economic returns. It matures in 124 to 126
days, yielding 10 to 12 quintals per hectare under rainfed conditions. The oil
content is approximately 30.90%, and it enjoys good market demand.
Key features include: Resistance to aphid (safflower aphid) infestation and Tolerance
to leaf spot and wilt diseases
PBNS 184 : A high-yielding variety, PBNS 184
gives 12 to 15 quintals per hectare under rainfed conditions and 18 to 20
quintals per hectare under irrigated conditions. It matures in 120 to 124 days
and has an oil content of 31.3%.
Notable
traits: Resistance to wilt/Phytophthora blight and aphids, Tolerance to leaf
spot disease.