भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय आणि कृषि महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने ९ एप्रिल ते १४ एप्रिल २०२५ दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहभर चालणाऱ्या उत्सवात अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि
सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये ९ एप्रिल रोजी सकाळी लोकशाहीर श्री. रणजित आशा अंबाजी कांबळे
यांचा
प्रबोधनात्मक शाहिरी जलसा तर दुपारी
सामान्य ज्ञान स्पर्धा कृषी
महाविद्यालयाच्या सभागृहात, दिनांक ११ एप्रिल रोजी सकाळी ६ ते रात्री १२
वाजेपर्यंत सलग १८ तास अभ्यास उपक्रम विद्यापीठाच्या ग्रंथालयात, दिनांक १४ एप्रिल रोजी
सकाळी १०.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारंभ व मानवंदना कल्याण अधिकारी
कार्यालयात आणि सायंकाळी ५.०० वाजता डॉ. आंबेडकर यांचे भव्य मिरवणूक या प्रमुख कार्यक्रमांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी
सहयोगी अधिष्ठाता डॉ सय्यद इस्माईल, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम आणि
जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत यांच्या
मार्गदर्शनाखाली गठीत संयोजन समितीचे अध्यक्ष प्रेम कांबळे, उपाध्यक्ष
गजानन येळणे, सचिव गौरव मानतुटे व कोषाध्यक्ष नागेश वसमतकर
आणि २०२१ मध्ये प्रवेशित बॅचचे विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.