Tuesday, January 28, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील उती संवर्धन प्रकल्पास माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांची भेट


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील उती संवर्धन प्रकल्प येथे निर्माण करण्यात येणाऱ्या उती संवर्धित केळी रोपांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी प्रयोगशाळेला भेट दिली. या प्रसंगी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, प्रभारी अधिकारी डॉ. आनंद दौंडे, वरिष्ठ संशोधन अधिकारी श्री. आर. एन. वाडीकर आणि श्री. . के. सुतार हे उपस्थित होते.

भेटीदरम्यान माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी उती संवर्धित केळी रोपांच्या विविध अवस्थांची सखोल पाहणी केली. त्यांनी प्रयोगशाळेत चालणाऱ्या संशोधन प्रक्रियांची बारकाईने माहिती घेतली आणि रोपांच्या उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी काही आवश्यक सुधारणा सुचविल्या.

माननीय कुलगुरूंच्या मार्गदर्शनामुळे प्रकल्पाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास प्रभारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.