Thursday, January 9, 2025

वनामकृविच्या मानवत येथील ॲग्रीपीव्ही संशोधन प्रकल्पाची कुलगुरु मा.प्रा.(डॉ.)इन्द्र मणि यांनी केली पाहणी

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत जर्मन एजन्सी जीआयझेड, सन सीड प्रायव्हेट लिमिटेड आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने ॲग्री-फोटोव्होल्टेईक तंत्रज्ञान विकास संशोधना करिता परभणी जिल्ह्यामध्ये मानवत जवळ ॲग्री-फोटोव्होल्टेईक संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाला दिनांक जानेवारी रोजी कुलगुरु मा.प्रा.(डॉ.)इन्द्र मणि यांनी भेट देवून पाहणी केली. त्यांच्या समवेत संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, वनस्पती जनुकीय  विभागाचे प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे होते. 

या भेटी दरम्यानॲग्रीपीव्ही संशोधन प्रकल्पा मार्फत  राबविण्यात आलेले पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या व  इतर संशोधनातील केळी, तुर, जवस, हरभरा, घेवडा, साळ, झुकेनी,कांदा, कोबी, या विविध पिकांवर नव्याने प्रयोग राबविण्यात आलेले आहेत त्याची पाहणी केली. त्यांनी प्रकल्पाच्या शास्त्रजज्ञासोबत चर्चा करून संशोधनाबाबत मार्गदर्शन केले. ॲग्री पीव्ही संशोधन प्रकल्पामध्ये  चालु असलेल्या संशोधना बद्दल समाधान व्यक्त केले. देशाच्या प्रगतीमध्ये येत्या काळात ॲग्रीपीव्ही मधील शेतीचा मोलाचा वाटा राहणार असे बोलून प्रकल्पातील सर्व शास्त्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांना प्रोत्साहन दिले व भविष्यामध्ये ॲग्रीपिव्ही प्रकल्प असेच कार्य करत रहावे यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान डॉ. गोदावरी पवार, डॉ विक्रम गुळवे, डॉ. सुनिता पवार, डॉ. बी एम कलालबंडी,जीआय झेडचे श्री अभिषेक शास्त्री तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.