Thursday, January 16, 2025

२३ जानेवारी रोजी वनामकृविचा २६वा दीक्षांत समारंभ

दीक्षांत समारंभात ३४६२  स्‍नातकांना विविध पदवीने अनुग्रहीत करण्‍यात येणार  ....... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची पत्रकार परिषदेत माहिती



वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा २६ वा दीक्षांत समारंभ दिनांक २३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला असुन त्या निमित्त विद्यापीठाचे माननीय कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १६ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी नमूद केले की, विद्यापीठाचा २६वा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालय परिसरातील सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला असुन दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल  तथा विद्यापीठाचे  माननीय कुलपती श्री सी. पी. राधाकृष्णन हे भुषविणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. नाश्री माणिकराव कोकाटे हे दीक्षांत समारंभास सन्मानित अतिथी म्हणून उपस्थित राहतील. दीक्षांत समारंभास खडगपूर येथील  भारताच्या पहिल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे नामांकित कृषि अभियंता तथा माजी संचालक मा. प्रा. विरेंद्र कुमार तिवारी हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहुन दीक्षांत अभिभाषण करणार आहेत.

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला आणि बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मा. ना. श्रीमती मेघनाताई बोर्डीकर, वित्त, नियोजन, कृषी, मदत पुनर्वसन, विधी न्याय, कामगार राज्यमंत्री मा. ना. ॲड. श्री. आशिष जयस्वाल, कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष माननीय श्री पाशा पटेल, मफुकृविचे माननीय कुलगुरू डॉ प्रशांत कुमार पाटील, पंदेकृविचे माननीय कुलगुरू डॉ शरद गडाख, बासाकोकृविचे माननीय कुलगुरू डॉ संजय भावे, माफ्सूचे कुलगुरू माननीय डॉ नितीन पाटील, वनामकृविचे माजी कुलगुरू डॉ व्ही के पाटील, डॉ के पी गोरे, डॉ बी व्यंकटेश्वरलू,  डॉ एस ढवण, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सन्माननीय सदस्य यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

दीक्षांत समारंभात भारत सरकारच्या रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री मा. ना. श्री. नितीनजी गडकरी आणि महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा (गोदावरी कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्रालयाचे मंत्री मा. ना. श्री. राधाकृष्णजी विखे पाटील यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देवून सन्मानित करण्यात येणार आहे. याबरोबरच सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील विविध विद्याशाखेतील विविध पदवी, पदव्युत्तर पदवी आचार्य पदवी पूर्ण करणाऱ्या एकुण ३४६२ स्नातकांना पदवी अनुग्रहीत करण्यात येणार आहे.

दीक्षांत समारंभात सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने दात्यांनी निश्चित केलेल्यां सूवर्ण पदकेरौप्य पदके रोख पारितोषिके पात्र स्नातकांना प्रदान करून मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहेयात आचार्य पदवीचे  २९ पात्र स्नातकपदव्युत्तर पदवीचे ३०७ स्नातक पदवी अभ्यासक्रमाचे  ३१२६ स्नातकांचा समावेश आहे. दीक्षांत समारंभात एकूण ६० पदके आणि प्रमाणपत्रे वितरण करण्यात येणार आहेत. यामध्ये १४ विद्यापीठ सुवर्ण पदकेदात्यांकडून देण्यात येणारे १० सुवर्ण पदके रौप्य पदक आणि ११  रोख पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार असुन २४ पदव्युत्तर पदवी गुणवत्ता प्रमाणपत्रांचा समावेश आहे, अशी माहिती कुलगुरू माननीय  डॉ. इन्द्र मणि यांनी दिली.

पदवी अनुग्रहीत करण्यात येणाऱ्या स्नातकांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. ज्या पदवीधरांची नावे विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिसुचनेत सुचिबध्द असतील त्यांनाच दीक्षांत दिंडीत सहभागी होण्याची परवानगी दिली जाईल. दीक्षांत समारंभाच्या यादीत नाव असणाऱ्या स्नातकांनीच कार्यक्रमास उपस्थित राहावे. या दीक्षांत समारंभाकारिता पात्र असणाऱ्या विद्यर्थ्यांव्यतिरिक्त विद्यापीठातील इतर विद्यार्थी, अधिकारी कर्मचारी तसेच इतर मान्यवरांनी इतर मान्यवरांना हा समारंभ विद्यापीठाच्या युटूब https://www.youtube.com/@vnmkv यावर पहाता येईल, असे कुलसचिव श्री. संतोष वेणीकर यांनी सांगितले.

दीक्षांत समारंभास उपस्थित असलेल्या स्नातकांना समारंभानंतर पदवी प्रमाणपत्रे देण्यात येतील उर्वरीत स्नातकांना त्या दिवशी त्यांच्या संबंधीत महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात येतील.

पत्रकार परिषदेत संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवारसंचालक विस्तार शिक्षण डॉ. गिरधारी वाघमारे,  संचालक संशोधन डॉ. खिजर बेगकुलसचिव श्री संतोष वेणीकरनियंत्रक श्री प्रवीण निर्मळ, उपकुलसचिव डॉ. गजानन भालेरावतांत्रिक अधिकारी डॉ. प्रवीण कापसेसहाय्यक कुलसचिव श्री. सुरेश हिवराळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ शंकर पुरी यांनी केले. या पत्रकार परिषदेत विविध माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२६ व्या दीक्षांत समारंभातील स्नातक २०२३-२४

अक्र

अभ्यासक्रम

२६ व्या दीक्षांत समारंभातील स्नातक २०२३-२४

 

आचार्य पदवी

 

१ 

पी. एचडी. (कृषि)

२८

२ 

पी. एच. डी. (गृहविज्ञान)

--

३ 

पी. एचडी. (अन्नतंत्रज्ञान)

४ 

पी. एचडी. (कृषि अभियांत्रिकी)

--

एकुण आचार्य पदवीचे स्नातक

२९

पदव्युत्तर अभ्यासक्रम

 

१ 

एम. एस्सी. (कृषि)

२०४

२ 

एम. एस्सी. (उद्यानविद्या)

३२

३ 

एम. एस्सी. (कृषि जैवतंत्रज्ञान )

४ 

एमएस्सी. (गृहविज्ञान)

५ 

एम. टेक. (अन्नतंत्रज्ञान)

१३

६ 

एम. एस्सी. (कृषि अभियांत्रिकी)

७ 

एम.बी.. (कृषि व्यवसाय व्यवस्थापन)

३४

एकुण पदव्युत्तर स्नातक

३०७

पदवी अभ्यासक्रम

 

१ 

बीएस्सी. (ऑनर्स) कृषि

२२५२

२ 

बीएस्सी. (ऑनर्स) उद्यानविद्या

३५

३ 

बीएस्सी. (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान

२१

४ 

बी. टेक. (कृषि जैवतंत्रज्ञान)

२४०

५ 

बी. टेक. (अन्नतंत्रज्ञान)

३९४

६ 

बी. टेक. (कृषि अभियांत्रिकी)

१३६

७ 

बीएस्सी. (ऑनर्स) एबीएम

४८

 

एकुण पदवी स्नातक

३१२६

 

एकुण आचार्य, पदव्युत्तर पदवी आणि पदवीचे स्नातक 

३४६२