राष्ट्रीय कृषि विज्ञान परिषद पुरस्कृत विभागीय विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेचे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात दिनांक ३० डिसेंबर २०२४ रोजी आयोजिन करण्यात आले होते. विकसित भारतातील कृषितील नाविन्यपूर्ण विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयावर ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालयामधिल वनस्पती शरीर क्रिया शास्त्र विभागात पदव्यत्तर अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी कुमारी गोदावरी जोशी हिने प्रथम क्रमांक पटकावला. ही विद्यार्थिनीं पंतनगर (उत्तराखंड) येथील गोविंदवल्लभ पंत कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठ येथे दिनांक २० ते २२ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणाऱ्या सतराव्या कृषि विज्ञान काँग्रेस मधील राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत मध्य विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. यासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कुमारी गोदावरीस मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले. संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे व मार्गदर्शक डॉ. गोदावरी पवार यांनी अभिनंदन करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या