Sunday, January 26, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात रबी पीक संग्रहालय व करडई संशोधन केंद्रास माननीय कुलगुरूंची भेट

 

कृषिविद्या विभाग

करडई संशोधन केंद्र

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषिविद्या विभागात उभारण्यात आलेल्या रबी पिक शिवार फेरी प्रक्षेत्रामध्ये असलेल्या हरभरा, ज्वार, करडई, सूर्यफूल या पिकांच्या विविध वाणांच्या संग्रहालयास आणि प्रात्यक्षिकास तसेच करडई संशोधन केंद्रात करडईच्या विविध वाणांच्या प्रात्यक्षिकास आणि चाचणी प्रयोगास दिनांक २६ जानेवारी रोजी कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि यांनी भेट दिली.

या भेटीदरम्यान, कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि यांनी पीक संग्रहालयातील विविध वाणांची पाहणी केली आणि प्रगत संशोधनासाठी शास्त्रज्ञांसोबत सखोल चर्चा केली. तसेच, प्रचलित प्रयोगात आवश्यक सुधारणा सुचवून संशोधन कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचा सल्ला दिला.

या प्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार,विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर,विभाग प्रमुख डॉ गजेंद्र लोंढे, डॉ हिराकांत काळपांडे, डॉ विलास खर्गखराटे, डॉ. विश्वनाथ खंदारे,प्रभारी अधिकारी डॉ लक्ष्मण जावळे, डॉ. आर आर धुतमल, डॉ संतोष शिंदे  तांत्रिक अधिकारी डॉ. प्रवीण कापसे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी कृषिविद्या विभागातील संशोधन कार्याचे कौतुक करताना सांगितले की, या पिकांच्या विविध वाणांमुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम तंत्रज्ञान आणि पद्धती उपलब्ध होतील. करडई संशोधन केंद्रातील प्रयत्न मराठवाड्यातील करडई पिकाच्या उत्पादनात मोठी भर घालतील,असेही त्यांनी यावेळी नमूद केले. विद्यापीठाच्या या प्रयत्नांमुळे मराठवाड्यातील शेती क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होऊन शेतकऱ्यांसाठी नवीन संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.