दीक्षांत
समारंभात माननीय राज्यपाल तथा माननीय
कुलपती श्री सी.
पी. राधाकृष्णनजी यांच्या
शुभहस्ते महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. श्री. राधाकृष्णजी विखे पाटील
यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देवून सन्मानित करतांना कृषि मंत्री मा. ना. श्री माणिकराव
कोकाटे, महिला व बालविकास,
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मा. ना. श्रीमती मेघना साकोरे –
बोर्डीकर राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष माननीय श्री पाशा पटेल, आमदार
व कार्यकारी परिषद सदस्य मा. श्री. राहुल
पाटील, आमदार
मा. श्री रत्नाकर गुट्टे, आमदार मा. श्री राजेश विटेकर,
कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, नामांकित कृषि अभियंता मा.
प्रा. विरेंद्र कुमार तिवारी, शिक्षण
संचालक डॉ भगवान आसेवार, कुलसचिव श्री संतोष वेणीकर आदी
अन्न आणि ऊर्जा सुरक्षा महत्त्वाची आहे. हवामान बदलानुसार शेतीमध्ये विविध समस्या आहेत. या सोडवण्यासाठी उपाययोजना करणे
गरजेचे आहे.
यासाठी शास्त्रज्ञांनी आंतरविद्या शाखेचे ज्ञान अवगत करणे
आवश्यक आहे असे
प्रतिपादन माननीय राज्यपाल तथा माननीय कुलपती श्री. सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. दिनांक २३ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात संपन्न झालेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या २६ व्या दीक्षांत समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर माननीय कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना. श्री माणिकरावजी कोकाटे, महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ)मंत्री मा. ना. श्री. राधाकृष्णजी विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मा. ना. श्रीमती मेघना साकोरे - बोर्डीकर, राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष माननीय श्री पाशा पटेल,
आमदार व कार्यकारी परिषद सदस्य मा. श्री. राहुल पाटील, आमदार मा. श्री रत्नाकर गुट्टे, आमदार मा. श्री राजेश विटेकर, विद्यापीठाचे कुलगुरु मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, खरगपूर येथील भारतच्या पहिल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे नामांकित कृषि
अभियंता तथा माजी संचालक मा. प्रा. (डॉ) विरेंद्र कुमार तिवारी, कार्यकारी परिषद सदस्य मा. श्री. प्रविण देशमुख, मा. डॉ. दिलीप देशमुख, मा. श्री. भागवत देवसरकर, मा. श्रीमती आदिती सरडा, मा. श्री. विठ्ठल सपकाळ, शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, कुलसचिव श्री संतोष वेणीकर,संशोधन संचालक डॉ खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ गिरधारी वाघमारे, नियंत्रक श्री प्रवीण निर्मळ, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर,
अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उप कुलसचिव डॉ गजानन भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी, कुलगुरू मा. डॉ शरद गडाख (पीडीकेव्ही), कुलगुरू मा. डॉ नितीन पाटील (माफसू), माननीय जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे (भाप्रसे), जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती नतीशा माथूर (भाप्रसे), पोलीस अधीक्षक मा. श्री रवींद्रसिंह परदेशी (आयपीएस), महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. धैर्यशील जाधव, विद्वत परिषदेचे सदस्य डॉ. पी. जी. इंगोले आणि डॉ. ए. एल. फ वनामकृविचे माजी कुलगुरू डॉ व्ही के पाटील, डॉ के पी गोरे, डॉ. ए. एस ढवण, विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. व्ही डी पाटील, डॉ डी एन गोखले, डॉ यु एन खोडके आदींची विशेष उपस्थिती होती.
माननीय राज्यपाल श्री सी. पी. राधाकृष्णन पुढे म्हणाले की, भारतात उच्च मूल्य किमतींच्या पिकांची लागवड करणे
आवश्यक आहे. सध्या आपण फळांची निर्यात करत आहोत. पूर्वी अन्नधान्याचा तुटवडा होता परंतु आज
स्वयंपूर्ण असून आपण अनेक कृषि मालांची निर्यात करत आहोत. हे केवळ
शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे आणि विद्यापीठांच्या संशोधनामुळे शक्य
होत आहे. देशाने केलेल्या शेतीतील
क्रांत्याचा त्यांनी उल्लेख केला. देशाची लोकसंख्या वाढत असताना देखील भारत
शेती उत्पादन वाढवून अन्नसुरक्षता करत आहे. कृषी व्यवसाय हा
भारताचा कणा आहे. शेती आणि
शेती व्यवसायात काळानुरूप बदल करणे
आवश्यक आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागेल. शेतकरी केंद्रित संशोधन करणे आवश्यक आहे.
यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाने कुलगुरू डॉ. इन्द्र मणि
यांच्या नेतृत्वाखाली नाविन्यपूर्ण राबवलेले उपक्रम माझा एक
दिवस माझ्या बळीराजा सोबत याची
स्तुती केली तसेच
विद्यापीठाने मागील दोन वर्षात बीजोत्पादनामध्ये तीन
पट वाढ करून
शेतकरी वर्गांना गुणवत्ता युक्त बियाणे उपलब्ध करून दिल्याबद्दल अभिनंदन केले.शेतीमध्ये उत्पादकता वाढवणे आवश्यक आहे यासाठी योग्य मानकांचा आणि
अचूक शेती पद्धतीचा वापर
करावा लागेल. २०४७ पर्यंत अन्नसुरक्षतेतूनच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल आणि आपला देश
कृषि मालाच्या निर्यातदार होईल. विद्यापीठाचे संशोधन यापेक्षाही अधिक
क्षेत्रात निर्यात करण्यास मदत करेल. शेतकऱ्यांच्या कल्याणात विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांचा उत्साह
२०४७ मधील विकसित भारत
होऊन जगाला अन्नधान्य पुरवठा करण्याची क्षमता दर्शवितो. यावेळी माननीय राज्यपालांनी विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबाला प्राधान्य द्यावे, पालकांना समाधानी ठेवून त्यांचा आदर करावा. यश
अपयश येतच असते, यावर मात
करून
स्वतःही आनंदी राहावे. आज आपल्या नव्या जीवनाची सुरुवात होत आहे, मिळालेल्या ज्ञानाचा शेतकऱ्यांच्या आणि समाजांच्या हितासाठी उपयोग करावा असा
सल्ला दिला.
कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना. श्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, विद्यापीठाचे कार्य विस्तीर्ण असून
विविध वाण देऊन
शेतकऱ्यांचे कल्याण केले. बायोमिक्ससारखे उत्पादन वाढवले. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी
यांनी जैव-
संपृप्त वाण विकसित करण्याची सूचित केले होते, यानुसार विद्यापीठाने ज्वार आणि बाजाराच्या वाण
विकसित केले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पादनास चांगला भाव मिळावा म्हणून शासन
उपक्रम राबवत आहे. शालेय शिक्षणात कृषि
अभ्यासक्रम प्रभावी राबवण्यासाठी शासन पुढाकार
घेत आहे.हवामान बदलानुसार तंत्रज्ञान विकसित करून
शेतकऱ्यांना तंत्रज्ञान देण्याची जबाबदारी विद्यापीठावर आहे.
सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शक तत्वे ठरवावेत. पारंपारिक शेतीमधून बदल करून
विद्यापीठ कायदा मध्ये सुधारणा करण्याचा मानस आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासात प्रात्यक्षिकावर भर देऊन
उत्कृष्ट शेतकरी बनवण्याचा प्रयत्न करावा. या समारंभात पदवी प्राप्त स्नातकांनी शेतीसाठी आणि
शेतकऱ्यांसाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करावा असे नमूद
केले
महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ)मंत्री मा. ना. श्री. राधाकृष्णजी विखे पाटील, यांनी विद्यापीठाच्या मानद
डॉक्टर ऑफ सायन्स पदवीचा स्वीकार करून
विद्यापीठाचे आभार मानले आणि
मानद पदवी
राज्यातील शेतकऱ्यांना समर्पित केली. विद्यापीठ महाराष्ट्रातील अग्रगण्य असून
विद्यापीठाने विषमुक्त शेती आणि
सेंद्रिय शेती तसेच
शेतकऱ्यांच्या गरजेनुसार संशोधन करण्यासाठी कार्य करण्याची गरज आहे. देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे ही व्यक्त केलेली अपेक्षा पूर्ण होण्याच्या दृष्टीने विद्यापीठ सकारात्मक पावले टाकत आहे. यासाठी केवळ उत्पन्न वाढीवर लक्ष केंद्रित न करता गुणवत्ता पूर्ण उत्पादन वाढ कशी होईल या दृष्टीने संशोधन कार्याला दिशा द्यावी लागेल असे मत व्यक्त केले. त्यांनी कृषी आणि तत्सम विषयातील शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व कृषी व्यवसायात भरीव काम करून कृषी व्यवसायास प्रतिष्ठा निर्माण करून द्यावी व परत एकदा उत्तम शेती ही कृषी व्यवसायाची संकल्पना पदवीधारात रुजविण्यात यावी, यातून पदवीधारक आत्मनिर्भर होतील असे नमूद केले.
दीक्षांत
अभिभाषणात खरगपूर येथील भारताच्या पहिल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे नामांकित कृषि
अभियंता तथा माजी संचालक मा. प्रा. विरेंद्र कुमार तिवारी यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, ज्ञान, कौशल्ये आणि मानवी मूल्ये देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या पालक आणि प्राध्यापक वर्गाचे हार्दिक अभिनंदन केले. पालकांसाठी हा समाधानाचा दिवस आहे; ज्यांनी आपल्या कष्टाने मिळवलेल्या पैशाची गुंतवणूक तुमच्या शिक्षणासाठी केली. पालकांनी तुम्हाला उत्तम शिक्षण मिळावे आणि उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला योग्य संधी मिळाव्यात यासाठी आपला वैयक्तिक आनंद आणि सुख यांचा त्याग केला असेल. पदव्यांपेक्षा तुम्ही येथे आत्मसात केलेले ज्ञान आणि मूल्ये तुम्हाला भविष्यात कोणत्याही प्रवासात मार्गदर्शन करतील. उच्च शिक्षण, संशोधन आणि कृषी व संबंधित विज्ञान क्षेत्रातील जनजागृती शिक्षण कार्यक्रमांमध्ये उत्कृष्टता साध्य करण्यासाठी या विद्यापीठाने घेतलेल्या नवीन उपक्रमांचा आनंद वाटतो. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि आणि सर्व अधिकाऱ्यांनी यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करायला हवे. पदवीधारकांना आणि पुरस्कार विजेत्यांना या विद्यापीठातील महान शिक्षकांची परंपरा जपून ठेवण्याचा सल्ला दिला. तुमच्या आजूबाजूचे लाखो शेतकरी तुमच्याकडून त्यांच्या संघर्षात साथीदार होण्याची अपेक्षा करतात – स्वतःच्या जगण्यासाठी आणि १४२ कोटी भारतीयांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी. समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि हवामान बदल, गरिबी, रोग, बेरोजगारी आणि उपासमार यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपण नावीन्य, संशोधन आणि विकासाच्या माध्यमातून योगदान देऊ शकतो.पुढे ते म्हणाले की विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या विकासासाठी उत्कृष्ट संशोधन केले
असून अनेक वाण दिलेले आहेत. विद्यापीठाने
यावर्षी नवीन शैक्षणिक धोरणाचा अवलंब केलेला असून
विद्यापीठ संशोधनामध्ये नवाचारास प्राधान्य देत
आहे. शेतकरी केंद्रित विस्तार कार्य आणि कर्मचारी केंद्रित प्रशासन चालवते यामुळे विद्यापीठ नक्कीच उंचीवर जाईल
असा विश्वास व्यक्त केला.
भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी
यांच्या विकसित भारत संकल्पना नाविन्यास चालना मिळून पूर्णत्वास जाईल. नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य वृद्धी होवून उद्योगास चालना मिळेल, उद्योजक निर्माण होऊन रोजगार निर्मिती होईल.
शेती क्षेत्रात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एक
संघानेच कार्य करत आहेत
यामुळे शेती संशोधनाला लाभ
होईल असे नमूद
केले.
विद्यापीठाचे
कुलगुरु मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मान्यवरांचे स्वागत करून विद्यापीठाच्या प्रगती अहवालाचे वाचन केले. विद्यापीठ ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेतून शेतकरी केंद्रीत विस्तार कार्य,विद्याथी केंद्रीत शिक्षण,नवाचार केंद्रीत संशोधन आणि कर्मचारी केंद्रीत प्रशासन हा दृष्टीकोनाणे कार्य करत असल्याचे नमूद केले.
दीक्षांत समारंभात भारत सरकारचे
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. ना. श्री. नितीनजी गडकरी यांनी शाश्वत शेती पद्धतींच्या प्रचारासाठी आणि कृषी आधारित उद्योगांच्या प्रोत्साहनासाठी केलेले कार्य, कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी त्यांची बांधिलकी, जैवइंधनाच्या वापराला चालना, यातून साधलेली शेतकऱ्यांची प्रगती तसेच पाणी संवर्धन, जैवइंधन विकास, सेंद्रिय व नैसर्गिक शेती, कृषी विविधीकरण याबरोबरच ग्रामीण विकासासाठी त्यांच्या अद्वितीय योगदानाची दखल घेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने
मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देवून सन्मानित केले.
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री मा. ना. श्री. राधाकृष्णजी विखे पाटील यांचे कार्य महाराष्ट्राच्या सामाजिक-आर्थिक विकासावर लक्षणीय प्रभाव पाडणारे आहे, यामुळे ते नव्या पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत बनले आहेत.शेती, पशुपालन, ग्रामीण विकास आणि सार्वजनिक सेवेत त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने
मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देवून सन्मानित केले.
दीक्षांत समारंभात सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील विविध विद्याशाखेतील विविध पदवी, पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवी पूर्ण करणाऱ्या एकुण ३४६२ स्नातकांना पदवी अनुग्रहीत करण्यात आले. यात आचार्य पदवीचे २९ पात्र स्नातक, पदव्युत्तर पदवीचे ३०७ स्नातक व पदवी अभ्यासक्रमाचे ३१२६ स्नातकांचा समावेश होता.
दीक्षांत समारंभात सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने व दात्यांनी निश्चित केलेल्यां सूवर्ण पदके, रौप्य पदके व रोख पारितोषिके पात्र स्नातकांना प्रदान करून मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. एकूण ६० पदके आणि प्रमाणपत्रे वितरण करण्यात आली. यामध्ये १४ विद्यापीठ सुवर्ण पदके, दात्यांकडून देण्यात येणारे १० सुवर्ण पदके, १ रौप्य पदक आणि ११ रोख पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार असुन २४ पदव्युत्तर पदवी गुणवत्ता प्रमाणपत्रांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ वीणा भालेराव व डॉ डि जी मोरे यांनी केले. दीक्षांत समारंभास शहरातील प्रतिष्ठीत व्यक्ती, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी, प्रगतशील शेतकरी, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व स्नातक मोठया संख्येने उपस्थित होते.
२६ व्या दीक्षांत समारंभातील पदके व बक्षिसे
दीक्षांत समारंभात २०२३-२४ मध्ये आचार्य अभ्यासक्रमात विद्यापीठ सुवर्ण पदक प्रीती कोंडीबा वायकुळे (कृषि) कीटक शास्त्र, पदव्युत्तर अभ्यासक्रमात विद्यापीठ सुवर्ण पदक गुंड मयुरी संतोष (अनुवंशिकी व वनस्पती पैदासशास्त्र)(३ सुवर्णपदके),भोसले प्रीती बाबासाहेब (अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान), माने आकाश मुंजाभाऊ (कृषी अभियांत्रिकी), सुर्यवंशी आरती गुलाबराव (सामुदायिक विज्ञान), कैरी प्रीतिका पात्रो (उद्यानविद्या), अन्सारी गौसोद्दीन मोहम्मद नुरुद्दीन (कृषी) आण्विक जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान, सुर्वे शुभम राजकुमार (एबीएम), भट श्वेता गणपती (कृषी)वनस्पती रोगशास्त्र, पीता सिरीशा (कृषी) कृषीशास्त्र (२–सुवर्णपदके), थोरात शिवानी हनुमंत (कृषी)कीटकशास्त्र, बोबडे जयेश राजेंद्र (कृषी) मृदा विज्ञान (रौप्य पदक) आदीं स्नातक तर पदवी अभ्यासक्रमात सुवर्ण पदके सिमी शुक्ला (कृषी), श्रावणी लोमटे (अन्न तंत्रज्ञान) (३ सुवर्णपदके), निलवर्ण श्वेता वसंतराव (कृषी अभियांत्रिकी), तापडिया ऋतुजा विजयकुमार(सामुदायिक विज्ञान), आनरसे तेजश्री पंढरीनाथ (उद्यानविद्या), गोपीका ए (जैवतंत्रज्ञान),गरड श्रुती अनिल (कृषी व्यवसाय व्यवस्थापन), बडावथ साई चंदन (कृषी) आदी स्नातक गौरविण्यात आले. याबरोबरच रोख पुरस्कारानी सत्वधर प्रिया प्रभाकर, बोबडे जयेश राजेंद्र, कटाईत साक्षी अजय, खरवडे मोहिनी भीमराव, पीता सिरीशा, निलवर्ण श्वेता वसंतराव, तापडिया ऋतुजा विजयकुमार आदी स्नातक गौरविण्यात आले.
माननीय कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना. श्री माणिकरावजी कोकाटे
जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ)मंत्री मा. ना. श्री. राधाकृष्णजी विखे पाटील
कुलगुरु मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
दीक्षांत अभिभाषण करताना खरगपूर येथील भारताच्या पहिल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे नामांकित कृषि अभियंता तथा माजी संचालक मा. प्रा. विरेंद्र कुमार तिवारी