कुलगुरु मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून वनामकृविचा नावीन्यपूर्ण उपक्रम
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विस्तार कार्यासाठी नियमित कार्यक्रमांसोबतच दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत आणि आठवड्यातून दोन वेळेस ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषि संवाद यासारखे उपक्रम राबवत आहे. या कार्यक्रमाला अधिक प्रभावी करण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून आणि शेतकरी देवो भव: या भावनेतून प्रगतशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा मुलाखती द्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमाची मालिका महिन्यातून दोन वेळेस (मंगळवारी सायंकाळी ७.०० वाजता) सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि शेकरु फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे. या मालिकेचा पहिला भाग दिनांक २८ जानेवारी रोजी माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमात परभणी जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी श्री पंडितराव थोरात यांची यशोगाथा शेतकऱ्यांसमोर त्यांच्या मुलाखती द्वारे सादर केली. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग उपस्थित होते.
यावेळी कुलगुरु मा. प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि यांनी म्हणाले की,
विद्यापीठाच्या २६ व्या
दीक्षांत समारंभात महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे माननीय कुलपती श्री
सी. पी. राधाकृष्णनजी यांनी विद्यापीठाच्या माझा एक
दिवस माझ्या बळीराजासोबत या विस्तार कार्याची आणि
विद्यापीठाने मागील दोन वर्षात प्रक्षेत्र विकसित करून
बीजोत्पादन तिप्पट केल्यामुळे स्तुती करून अभिनंदन केल्यामुळे एक
नवचैतन्य निर्माण झाले. यामुळे शेतकऱ्यांप्रती अधिकाधिक समर्पित भावनेने कार्य करण्याची ऊर्जा मिळाली आणि
शेतकरी देवो भव:
या भावनेतून शेतकऱ्यांचे यशोगाथा मुलाखतीद्वारे शेतकऱ्यांसमोर आणण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. याचा
पहिला भाग संपन्न होत
आहे याचा मनस्वी आनंद होत असून
भविष्यात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या यशोगाथा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून शाश्वत शेतीसाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले
जाईल, असे प्रतिपादन केले.
प्रास्ताविकात
संशोधन संचालक डॉ. खिजर
बेग यांनी शेतकऱ्यांना देशी आणि
विदेशी भाजीपाला पिकांचे गुणवत्तायुक्त बियाणे आणि रोपे
उपलब्ध करून देण्यात येतील असे
सांगितले.
सेंद्रीय शेती प्रकल्प केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद
गोरे यांनी प्रगतशील शेतकरी श्री पंडितराव थोरात यांची मुलाखत घेतली. यावेळी श्री
पंडित थोरात यांच्या शेतीतील मिळविलेल्या यशाविषयी अनेक प्रश्न विचारले. या
प्रश्नांना उत्तर देताना थोरात यांनी नमूद केले
की, प्रामुख्याने राजगिरा, जळगाव भरीत वांगे, काशीफळ भोपळा यासह
भाजीपाला उत्पादनावर अधिक भर
देतो. विशेषतः संपूर्ण वर्षाचे आणि वेळेचे नियोजन करून
समाजातील व्यक्तींच्या गरजेनुसार शेती करतो. शेती करण्यासाठी वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या संपर्कात राहून पूर्णतः सल्ला अवलंबतो. शेतमाल विक्रीसाठी मालाची प्रतवारी, मूल्यवर्धन आणि
प्रक्रिया, पॅकेजिंग या विद्यापीठाने ठरवून दिलेल्या त्रिसूत्रीचा प्रभावी अवलंब करतो. मालाची गुणवत्ता आणि
विश्वासार्हतेस प्राधान्य देतो. विक्री व्यवस्थापनासाठी सामाजिक माध्यमांचा विशेषतः व्हाट्सअप चा
प्रभावी अवलंब करून व्यक्तींच्या गरजेनुसार ग्रुप बनवून त्यांना एक
दिवस आधी विक्रीसाठी उपलब्ध उत्पादनाची माहिती फोटोसह ग्रुप वर
पाठवतो. यामुळे शेती उत्पादनाची विक्री तात्काळ किंवा ऑनलाईनच बुक
होऊन जाते.
यावेळी त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरु मा. प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि यांनी शेतकऱ्यांसाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल आणि
शेतकऱ्यांप्रती असलेल्या प्रेमाच्या भावनेबद्दल आदर व्यक्त करून
आभार मानले. यावेळी त्यांनी संशोधन संचालक डॉ. खिजर
बेग आणि विद्यापीठातील सर्व
शास्त्रज्ञांची वेळोवेळी मिळत असलेल्या सहकार्याबद्दल आणि
नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाबद्दल आभार मानले.
प्रगतशील शेतकरी श्री पंडितराव थोरात यांची मुलाखत ऐकण्यासाठी खालील लिंकला क्लिक करावे