कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते मशागतीच्या कामाचे भूमिपूजन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परभणी येथील मध्यवर्ती
प्रक्षेत्रात शेंद्रा-सी ब्लॉकमधील १०० हेक्टर, सायळा ब्लॉकमधील ३० हेक्टर, बलसा
ब्लॉकमधील ४० हेक्टर आणि तरोडा ब्लॉकमधील ३० हेक्टर असे एकूण २०० हेक्टर जमिनीला
शेतीखाली आणण्यासाठी भूमिपूजन दिनांक २६ जानेवारी रोजी कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र
मणि यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत दोन वर्षांपूर्वी ८०० हेक्टर जमीन वहितीखाली
आणण्यात आली होती. आता यामध्ये नव्याने २०० हेक्टरची भर पडल्याने एकूण १००० हेक्टर
जमीन शेतीखाली येणार आहे.
कार्यक्रमाला संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, मध्यवर्ती प्रक्षेत्राचे प्रभारी अधिकारी डॉ विलास खर्गखराटे, उद्यान विद्या विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे, तांत्रिक अधिकारी डॉ. प्रवीण कापसे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ट्रॅक्टर चालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
त्यांच्या कठोर परिश्रमामुळे या ब्लॉकमधील पडिक जमिनी शेतीखाली आणण्याचा
महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला आहे, असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले.