Friday, January 3, 2025

गेवराई येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास कुलगुरू माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भेट

 

बीड जिल्ह्यातील गेवराई येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, कृषी विभाग आणि गेवराई येथील कृषी विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने किसान कृषी महोत्सव दिनांक ३ जानेवारी ते ७ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ दिनांक ३ जानेवारी रोजी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या प्रसंगी माननीय कुलगुरूंसोबत विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, विस्तार विद्यावेत्ता डॉ. सूर्यकांत पवार, तसेच कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. हनुमान गरुड उपस्थित होते.

कुलगुरू माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी प्रदर्शनातील विविध दालनांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, कृषी प्रक्रिया व उत्पादकता वाढीच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी प्रदर्शनातील सहभागी दालन धारकांचे कौतुक करत त्यांच्या नवकल्पनांचा आणि योगदानाचा विशेष उल्लेख केला.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, उन्नत शेती पद्धती, कृषी उपकरणे, उत्पादन प्रक्रियेच्या संधी याबद्दल माहिती देऊन त्यांना अधिक सक्षम बनवणे असा आहे. या महोत्सवात विविध क्षेत्रातील नामांकित दालन धारक, शास्त्रज्ञ आणि कृषी तज्ज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात भेट देत असून, कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद लाभत आहे.