महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपण
अनेक थोर नेत्यांचे तसेच
समाजसुधारकांचे विचार ऐकत असतो.
त्या नेत्यांचे आणि समाज
सुधारकांचे चांगले विचार आणि गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांनी केले.
कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय परभणी यांचे वतीने पदवी
व पदव्युत्तर प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत
होते. ते पुढे
म्हणाले की सद्यस्थितीत कृषी
क्षेत्रातील विविध समस्यांचा सामना करण्यासाठी कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर
मोठ्या प्रमाणात करावा लागणार आहे. त्यामुळेच भविष्यात कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या मोठ्या संधी
उपलब्ध होणार आहेत. महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक तसेच
क्रीडा कार्यक्रमात सहभाग घेऊन आपला
व्यक्तिमत्व विकास घडवून आणणे हे
सुद्धा खूप गरजेचे आहे.
याप्रसंगी व्यासपीठावर माजी शिक्षण संचालक डॉ.
उदय खोडके, सौ. मिश्रा मॅडम, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खीजर
बेग, कुलसचिव संतोष वेणीकर, विद्यापीठ अभियंता दीपक कशाळकर, अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.
आर. बी. क्षीरसागर,
कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.
राहुल रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी माजी शिक्षण संचालक डॉ.
उदय खोडके, तसेच शिक्षण संचालक डॉ.
भगवान आसेवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी बी टेक
कृषी अभियांत्रिकी पदवी प्रथम वर्ष
तसेच एम टेक
कृषी अभियांत्रिकी पदवी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवर अतिथींच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि
भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यानिमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय बहारदार नृत्य तसेच
गायन सादर करून
उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ . राहुल रामटेके यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. विद्यार्थी प्रतिनिधी रोहित गवळी आणि
मधुरा बुचाले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुभाष विखे
यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ. स्मिता सोळंकी, डॉ. स्मिता खोडके, डॉ. रावसाहेब भाग्यवंत, डॉ. हरीष आवारी, डॉ. मदन पेंडके डॉ. गोपाळ शिंदे, प्रा. विवेकानंद भोसले, डॉ. सुभाष विखे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.सुमंत जाधव, डॉ. रवींद्र शिंदे, डॉ.मधुकर मोरे, डॉ. संदिपान पायाळ, डॉ. विशाल इंगळे, प्रा.दत्तात्रय पाटील. डॉ. प्रमोदिनी मोरे, डॉ. गजानन वसू, डॉ. आश्विनी गावंडे, प्रा. लक्ष्मीकांत राऊतमारे, मंचक डोंबे आदींनी परिश्रम घेतले.