वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या दोन विद्यार्थिनींची नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमी (NAAS) तर्फे देण्यात येणाऱ्या श्रीमती कनक अग्रवाल मुलींसाठीची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. यामध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी शेख फातिमा सिमरन मसूद अहमद आणि कृषि महाविद्यालय परभणी येथील विद्यार्थिनी जागृती जगन बागल यांचा समावेश आहे.
याबाबतचे पत्र विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांना राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमीचे सचिव श्री. डब्ल्यू. एस. लाकरा यांनी पाठविले आहे. या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा रु. ३०००/- शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. माननीय कुलगुरू
यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करत, त्यांना उज्वल
भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.