Saturday, January 25, 2025

उच्च अभ्यासक्रम संरचने मधे विशाल दृष्टिकोनात्मक भाषेच्या मॉडेल्सचे (LLM - Large Language Models) एकत्रीकरण : परड्यू विद्यापीठातीचा दृष्टिक्षेप

 अमेरिकेतील परडयू विद्यापीठाचे मा. प्राध्यापक डॉ.धर्मेद्र सारस्वत यांचे मार्गदर्शन

कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि 

माननीय प्राध्यापक डॉ धर्मेंद्र सारस्वत

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात शिक्षण संचालनालयाच्या वतीने अमेरिकेतील परडयू विद्यापीठाच्या कृषी आणि जैव अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ धर्मेंद्र सारस्वत यांचे उच्च अभ्यासक्रम संरचनेमध्ये विशाल दृष्टिकोनात्मक भाषेच्या मॉडेलची एकत्रीकरण या विषयावर दिनांक २५ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या सिम्पोजीयम हॉलमध्ये मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते तर शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, इच्छा तिथे मार्ग या उक्तीप्रमाणे काम करणारे प्राध्यापक डॉ धर्मेंद्र सारस्वत यांचे व्यक्तिमत्व आहे. ते अमेरिकेतील नामांकित परडयू विद्यापीठात प्राध्यापक म्हणून समर्पितपणे कार्य करत आहेत. त्यांचे विशाल भाषेच्या मॉडेल (LLM - Large Language Models) मध्ये महत्वपूर्ण कार्य आहे. त्यांनी अनेक ॲप्स आणि अभ्यासक्रमाच्या सरचना विकसित केलेल्या आहेत. येणारा काळ एआय, चॅट-जीपीटीचाच आहे. विद्यार्थ्यांना एआय, चॅट-जीपीटी यांचा उपयोग करून यशस्वी होण्यासाठी डॉ धर्मेंद्र सारस्वत यांचे व्याख्यान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. एआय, चॅट-जीपीटीचा वापर करत असताना स्वतःची साक्षरता वाढवून स्वतःला सुरक्षित करण्यासाठीचा हा काळ आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या आणि लाभधारकांच्या गरजेनुसारच तंत्रज्ञान विकसित करावे लागेल यामध्ये एआय, चॅट-जीपीटीचा महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यासाठी एआय, चॅट-जीपीटीचा नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी स्वतःमध्ये सकारात्मक बदल करावे लागतील, असे प्रतिपादन केले

प्राध्यापक माननीय डॉ धर्मेंद्र सारस्वत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डोळस होऊन सर्व बाबींचे अवलोकन करावे. सर्व विषयांचे आणि नवीन तंत्रज्ञानाचे ज्ञान अवगत करावे. विशेषतः २५ व्या वर्षापर्यंत अधिकाधिक ज्ञान प्राप्त करून घ्यावे, यामुळे पुढे मोठा काळ ज्ञानाचा उपयोग करण्यासाठी मिळतो. विद्यार्थ्यांनी संशोधनासाठी पुढाकार घ्यावा. छोट्या छोट्या संशोधनापासून सुरुवात करावी. यासाठी त्यांनी कॉल कॉम या मोबाईल प्रोसेसरची चीप बनवणाऱ्या उद्योगाचा सुरुवात आणि इतिहास सांगून त्यांनी शेवटी संस्थेला ३६००० हजार करोड देऊन गेल्याचे सांगितले. याबरोबरच चॅट- बोटने सुरुवातीला ८० रशियन भाषेचे इंग्लिश मध्ये करण्याचे कार्य केले, परंतु आज पूर्ण जगावरती त्याचे कार्य चालू आहे. भविष्यात डिजिटल आणि अचूक शेती करावी लागणार आहे. यासाठी एआय आणि चाट बोट सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. यामुळे वेळेत माहितीचे संकलन,  प्रथःकरण आणि निष्कर्ष काढण्याचे कौशल्य विकसित होते. याद्वारे अचूक शेतीचा करण्यासाठी अधिकचा लाभ मिळतो. यावेळी त्यांनी शिक्षणामधील जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स महत्व आणि विविध शाखेमध्ये एआय आणि चाट बोट उपयोग करण्यासाठीचे महत्त्वाचे बाबी समजून सांगितले. यासाठी एआयचे कौशल्य काळजीपूर्वक शिकणे आवश्यक आहे. चॅट-जीपीटी मध्ये एकच प्रश्न पाच-सहा वेळेस विचारला तर त्याचे उत्तर शेवटी चुकीचे येते, म्हणून याचा काळजीपूर्वक वापर होणेही आवश्यक आहे.

परडयू विद्यापीठात याबद्दलचे ज्ञान विद्यार्थ्यांना पहिल्या सत्रातच दिले जाते. विद्यार्थ्यांनी शिकत असताना केलेले प्रयोग संशोधन प्रकाशासाठी सर्व स्तरावरून सिद्धता घेऊनच प्रकाशित करण्यासाठी बंधन घातलेले असतात. यासाठी विशेष अशा मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब केला जातो. काय करायला हवे आणि करू नये हे सर्व समजून सांगितले जाते. चॅट-जीपीटी द्वारे संशोधन करण्यासाठी ही बंधन घातले जाते. यापासून होणारे चांगले आणि दुष्परिणांची ही माहिती दिली जाते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने उच्च अभ्यासक्रमाचे सरचनेचे मॉडेल्स बनवण्यासाठी आणि विस्तार कार्यात शेतकऱ्यांना सुलभ भाषेमध्ये समजण्यासाठी महत्वपूर्ण उपयोग होतो. मॉडेल बनवण्यासाठी विशाल भाषांचा मॉडेल मोफतचा वापर होऊ शकतो परंतु अचूक अभ्यासक्रम संरचना करण्यासाठी विकत घेतलेले महत्त्वाचे असते. परडयू विद्यापीठांमध्येॲड दोस्त मॉडेल विकसित केलेले आहे असे नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार डॉ विना भालेराव यांनी मांनले. कार्यक्रमात विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, आचार्य आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.