वनामकृविच्या लातूर येथील विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात "जिनोम सेव्हीअर पुरस्कार वितरण व शेतकरी प्रशिक्षण" कार्यक्रम संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या
लातूर येथील विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील
राष्ट्रीय कृषि विकास योजना पुरस्कृत "शाश्वत कृषि विकासासाठी मॉडेल जीनोम क्लब" या प्रकल्पांतर्गत देशी/गावरान वाणांचे व जैवविविधतेचे संवर्धन ई. करिता उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी आणि बचत गटांना दिनांक २ जानेवारी, २०२५ रोजी वर्ष २०२३-२४ व २०२४-२५ करिता ‘जिनोम सेव्हीअर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र
मणि हे होते. यावेळी शिक्षण
संचालक डॉ. भगवान आसेवार व संशोधन
संचालक डॉ. खिजर बेग यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात
कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी कृषि जैवविविधता जागरूकता व संगोपन या उल्लेखनीय कार्य करत असलेल्या कार्याबद्दल गौरवद्गार काढले. तसेच या क्षेत्रात कार्य करित असलेल्या शेतकरी, बचत गट यांची प्रशंसा करून प्रोत्साहित केले. नामशेष व दुर्मिळ होत चाललेल्या देशी व पारंपारिक वाणांचे संकलन, विश्लेषण, संगोपन व व्यापारीकरण करणे या चतु:सुत्री पद्धतीचा अवलंब करून जैवविविधता ऱ्हास थांबवून दीर्घकालीन शाश्वत कृषि विकासासाठी या पद्धतीचा अवलंब करावा असे मोलाचे मार्गदर्शन केले. जैवविविधतेचा योग्य वापर करून बियाणे संवर्धक, कृषि विद्यापीठातील शास्रज्ञ व विद्यार्थी यांच्या अथक प्रयत्नांनी १४० कोटी लोकसंख्या असलेल्या खंडप्राय या भारत देशास अन्नधान्याच्या बाबतीत सक्षम करून जगाला अन्नधान्य पुरवठा करण्याची क्षमता दाखवली आहे.असे नमूद केले
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी सहभागी पुरस्कारार्थी, प्रशिक्षक, शेतकरी प्रशिक्षणार्थी व विद्यार्थी यांस मार्गदर्शनपर भाषणात सांगितले कि जैवविविधतेचा योग्य वापर करून बदलत्या हवामानास तग धरणाऱ्या वाणांची निर्मिती करून पर्यावरणाचा समतोल साधू शकतो. संशोधन
संचालक डॉ. खिजर बेग म्हणाले कि पिक विविधतेचे जतन करून त्यांचे गुणधर्म ओळखून त्याचे रुपांतर प्रचलित वाणामध्ये करून नवीन वाणांची निर्मिती होवू शकते.
महाविद्यालायचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. प्रकल्पाची उद्दिष्टे व भविष्यातील देशी वाणांच्या बियाणे पेढीबाबत माहिती दिली.याप्रसंगी श्रीमती शैलजा नरवडे, श्रीमती भारती स्वामी, धनाजी धोतारकर, श्रीमती श्रुती ओझा, शिवशंकर चापुले व अनिल गवळी यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. देशी/गावरान वाणांचे, जैवविविधतेचे संवर्धन ई. बाबतच्या घडीप्रत्रीकेंचे विमोचन करण्यात आले. जैवविविधता जागरूकता, संवर्धन ई. बाबत प्रकल्पांतर्गत विविध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प समन्वयक डॉ.राहुल चव्हाण, सहसमन्वयक डॉ. योगेश भगत व डॉ. विद्या हिंगे यांनी केले. याप्रसंगी, कृषि अधिकारी श्री. दिलीप राऊत, कृषि विज्ञान केंद्र समन्वयक डॉ. सचिन दिग्रसे, प्रगतशील शेतकरी श्री. प्रभाकर नागरगोजे, श्री. अशोक चिंते, इंजी. सुधीर सोळंके, कृषि महाविद्यालय, कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, गळीतधान्य संशोधन केंद्र येथील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थिनी-विद्यार्थी मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.