वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालायातील उद्यानविद्या विभागास कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक ४ जानेवारी रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार हे होते.
या भेटीदरम्यान उद्यानविद्या
विभागांमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या पदव्युत्तर आभासक्रमाच्या वर्गखोलीचे मा. कुलगुरूंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विभागातील
पदव्युत्तर व आचार्य आभासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी संशोधनासाठी स्ट्रॉबेरी, ड्रॅगनफ्रुट, शेवंती, ग्लॅडिओलस,कांदा, कोबी, मोसंबी या पिकांवर नव्याने राबविलेल्या प्रयोगाची
त्यांनी पाहणी केली. याबरोबरच उद्यानविद्या महाविद्यालयामधील चौथ्या वर्षांच्या
विद्यार्थ्यांसाठी अनुभवात्मक कार्यानुभव शिक्षण मोडूल अंतर्गत विभागाच्या
पॉलिहाऊस मध्ये विविध नवीन प्रकारच्या
भाजीपाला वाणाची लागवड केलेली असून त्यात मेथी, कोथिंबीर, पालक, कोबी, दोडका,भोपळा या पिकांचा समावेश आहे. या
मोडूलाही त्यांनी भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून संशोधनासाठी उपयुक्त
मार्गदर्शन केले. उद्यानविद्या विभागाच्या विद्यार्थ्यांच्या संशोधन कार्याबद्दल कुलगुरू
मा प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी समाधान व्यक्त
केले आणि विभाग प्रमुख डॉ. व्ही एस. खंदारे व सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांना प्रोत्साहन दिले व
भविष्यामध्ये उद्यानविद्या विभागाने असेच कार्य करत रहावे यासाठी त्यांनी शुभेच्छा
दिल्या.
कुलगुरू मा प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार
यांनी विभागाला भेट दिल्याबद्दल विभाग प्रमुख डॉ. व्ही एस. खंदारे यांनी त्यांचे
आभार मानले. यावेळी विभागातील डॉ. बी. एम. कलालबंडी, डॉ.ए.एम.भोसले, डॉ.ए.एस.लोहोकरे, डॉ. पहुणे, डॉ. खंडागळे,
डॉ.घोरमाडे, डॉ. कारंडे, डॉ. गावडे, डॉ. पालेपाड, डॉ. सय्यद शबनम, श्री. जावळे तसेच उद्यान विद्या
महाविद्यालयांमधील पदवीचे तसेच उद्यानविद्या विभागातील पदव्युत्तर व आचार्य आभासक्रमाचे
विद्यार्थी उपस्थित होते.