क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वनामकृविचा महिला शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या खामगाव (ता. गेवराई) येथील कृषि विज्ञान केंद्रात दिनांक ०३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय, कृषि विज्ञान केंद्र, कृषी विभाग, आत्मा, महिला आर्थिक विकास महामंडळ , उमेद, इफको व बीडचे धान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय भव्य महिला शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. प्रा. (डॉ) इन्द्र मणि होते. प्रमुख अतिथी म्हणून विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे हे होते. मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख, बीडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री सुभाष साळवे, बीडचे कृषि विकास अधिकारी श्री सयप्पा गरंडे, कार्यक्रम समन्वयक डॉ दिप्ती पाटगावकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नीता गायकवाड, माविम (बीड) चे जिल्हा समन्वय अधिकारी श्री सुखदेव चिंचोलीकर, उमेदचे श्री मुरहरी सावंत, यशस्वी उद्योजिका महिला सौ. सिताबाई मोहिते, ईफको चे जिल्हा प्रतिनिधी श्री सय्यद, श्री डॉ. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांनी भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई
फुले यांना ओळखले जाते, त्यांनी आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत
त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असे नमूद
केले. ते पुढे म्हणाले की, महिला सक्षमीकरणासाठी त्यांची आर्थीक उन्नती होणे आवश्यक
आहे. यासाठी महिलांकडे निर्णय प्रधानता, आर्थिक बळ
या बाबी महत्वाच्या आहेत. मेळाव्यात जवळपास ७०० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विशेष करून
या मेळाव्याच्या प्रमुख मार्गदर्शिका या महिलाच आहेत. त्यांच्या कार्याचे अभिनंदन
करून कौतुक वाटत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. सध्या महिला खऱ्या अर्थाने
सबलीकरण होताना दिसत आहेत. या महिलांना त्यांनी प्रक्रिया उद्योग उभारणीपासून
विक्री व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे यांनी विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि
विज्ञान केंद्रा मार्फत शेतकऱ्यांसाठी चालणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
प्रमुख मार्गदर्शिका रामनगर
(जालना) येथील जिजामाता कृषि भूषण पुरस्कार प्राप्त यशस्वी महिला उद्योजिका सौ. सिताबाई
मोहिते यांनी त्यांच्या अनुभवाच्या कथनातून महिलांना प्रेरीत केले. तसेच त्या म्हणाल्या
की, महिला या जन्मतः सक्षम असतात फक्त त्यांची त्यांना जाणीव करून
घेण्याकरिता विद्यापीठाची तसेच विविध यंत्रणेच्या सहकार्याची गरज असते.
उद्योगामध्ये भरारी घेण्यासाठी सातत्य, चिकाटी, मालाची गुणवत्ता टिकवणे महत्त्वाचे असते. त्यांनी महिलांना बाजारपेठेत आपला माल
विकण्यासंदर्भात विविध प्रकारचे उदाहरणे देऊन प्रेरित केले.
तांत्रिक सत्रात महिलांचे काबाड कष्ट
कमी करण्यासंदर्भात प्रात्यक्षिकासह विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञानाविषयी , अभाससंप्र
(कृषीरत महिला)
च्या केंद्र समन्वयक तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नीता
गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री
सुखदेव चिंचोलीकर यांनी महिला बचत गटाच्या आर्थीक उन्नतीसाठी ५९
लाखाच्या चेक द्वारे मान्यवरांच्या हस्ते महिला बचत
गटांना देण्यात आले. डॉ.
शिवाजी पवार यांनी नॅनो
युरिया चे महत्व सांगून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी कृषी प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात
आले होते.
कार्यक्रमामध्ये शेतीपूरक व्यवसायांमध्ये उत्तुंग भरारी घेतलेल्या शेतकरी महिलांचा मान्यवरांच्या हस्ते शॉल, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन
गौरव करण्यात आला. प्रातिनिधिक स्वरूपात गायीच्या शेणापासून विविध वस्तू तयार
करणाऱ्या सौ उमाताई औटी
यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन विषय विशेषज्ञ डॉ हनुमान गरुड यांनी तर आभार कार्यक्रम समन्वयक डॉ दिप्ती पाटगावकर यांनी मानले. डॉ. डी. के. पाटील, डॉ एस. बी. पवार, डॉ वसंत सूर्यवंशी, डॉ गजानन गडदे, डॉ. संतोष चिक्षे, ऍग्रोवनचे श्री. संतोष मुंढे, पवार यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी महिला तसेच शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ किशोर जगताप, डॉ श्रीकृष्ण झगडे, डॉ तुकेश सुरपाम, दत्तप्रसाद वीर, विजय चांदणे, सुधाकर काटे, उमेश वारे यांनी परिश्रम घेतले.