Monday, August 31, 2026

वनामकृविच्या बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्रास संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांची भेट

 चालू संशोधन कार्याचा आढावा घेऊन शास्त्रज्ञांना दिले मार्गदर्शन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी विद्यापीठाच्या बदनापूर (जि. जालना) येथील कृषि संशोधन केंद्रास भेट देऊन केंद्रामध्ये सुरू असलेल्या विविध संशोधन कार्याचा आढावा घेतला तसेच प्रक्षेत्राची पाहणी केली.

यावेळी डॉ. आसेवार यांनी केंद्रावर सुरू असलेल्या विविध पिकांवरील संशोधन प्रयोगांची माहिती घेतली. संशोधन कार्य अधिक परिणामकारक व शेतकरीहिताभिमुख करण्याच्या दृष्टीने त्यांनी संबंधित शास्त्रज्ञांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले.

या भेटीदरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषिविद्या विभागाचे विभागप्रमुख डॉ. विलास खर्गखराटे यांनीही केंद्रावरील संशोधन कार्याची पाहणी करून मार्गदर्शन केले.

यावेळी कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा कृषि संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. दीपक पाटील यांनी केंद्रावर सुरू असलेल्या संशोधन उपक्रमांची माहिती दिली. केंद्रातील विविध संशोधन प्रकल्प, प्रक्षेत्रावरील प्रयोग तसेच आगामी संशोधन नियोजनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. या प्रसंगी कृषि संशोधन केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ व कर्मचारी उपस्थित होते.