आरोग्य विभागाच्या आपत्कालीन पथकाकडून विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण
वाढत्या रस्ते
अपघातांमुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षा
सप्ताहा’निमित्त वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या गोळेगाव
येथील कृषि महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी योजन
करण्यात आले. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली
हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना (NSS)
विभागामार्फत राबविण्यात आला.
यावेळी आरोग्य
विभागाच्या आपत्कालीन पथकाने विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेबाबत तसेच अपघातप्रसंगी
घ्यावयाच्या तातडीच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात श्री.
गणेश बाहेती, सहायक व्यवस्थापक डॉ.
कपिल पुड, डॉ. सचिन भोसले, श्री. केशव
वाट, श्री. गजानन गायकवाड आदी आरोग्य विभागाचे सदस्य उपस्थित
होते.
मार्गदर्शन
करताना डॉ. कपिल पुड यांनी अपघातानंतरच्या पहिल्या एका तासाला ‘गोल्डन अवर’ असे
संबोधले जाते, याचे महत्त्व स्पष्ट
केले. या कालावधीत जखमी व्यक्तीस योग्य वैद्यकीय मदत मिळाल्यास त्याचे प्राण
वाचण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात
केवळ व्याख्यान न देता प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना सी.पी.आर.
(CPR), प्रथमोपचार
पद्धती, सुरक्षा साधनांचा योग्य वापर तसेच आपत्कालीन
परिस्थितीत कसे वागावे याचे प्रशिक्षण देण्यात आले.
या कार्यक्रमास
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ राहुल भालेराव, डॉ
दशरथ सारंग डॉ. प्रवीण राठोड, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित
होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी वाहतुकीचे नियम पाळण्याची व रस्ते
सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्याची शपथ घेतली.
.jpeg)

.jpeg)
