मतदानाबाबत
जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत मतदान जनजागृती सप्ताह मोठ्या उत्साहात
साजरा करण्यात आला. या सप्ताहाच्या निमित्ताने विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन
विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेने व शिक्षण संचालक
डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांनी पुढाकार
घेऊन केले.
दिनांक
१२ जानेवारी २०२६ रोजी ‘वोट फॉर परभणी’ अभियानाअंतर्गत महाविद्यालयाच्या परिसरासह परभणी
शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत कृषि
महाविद्यालयाच्या ११८ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. ही रॅली शनिवार
बाजार मैदानापासून शिवाजी महाराज पुतळा ते पुढे राजगोपालचार्य उद्यानापर्यंत
काढण्यात आली.
तसेच
मतदान जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी निबंध
स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,
चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. तसेच विद्यार्थिनींनी
विशेषतः परभणी महानगरपालिका हद्दीतील विविध प्रभागांमध्ये पथनाट्यांचे सादरीकरण करून
नागरिकांमध्ये मतदानाचे महत्त्व पटवून दिले. या पथनाट्यांना मतदारांनी उत्स्फूर्त
प्रतिसाद दिला.
या
सर्व उपक्रमांचे उत्कृष्ट नियोजन व अंमलबजावणी केल्याबद्दल कार्यक्रम अधिकारी डॉ.
धीरज पाथ्रीकर व डॉ. फारिया खान यांनी केले.



