भविष्यातील कृषि उद्योजक घडविण्यासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची प्रेरणा
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या चाकूर येथील पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन
संस्था (PGIABM) मधील द्वितीय
वर्षातील एकूण २८ विद्यार्थी आज दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी हैदराबाद येथील भारतीय
कृषि अनुसंधान परिषदेच्या (ICAR) राष्ट्रीय कृषि विस्तार
व्यवस्थापन संस्था (NAARM) येथे आयोजित पाच दिवसीय
व्यवस्थापन विकास प्रशिक्षण कार्यक्रमात (Management Development Programme
– MDP) सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत.
हा प्रशिक्षण
कार्यक्रम “डिझाईन थिंकिंग फॉर अॅग्री-एंटरप्रेन्युअरशिप
डेव्हलपमेंट” या विषयावर १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला
आहे.
सदर प्रशिक्षण
कार्यक्रम माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेने, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या
मार्गदर्शनाखाली तसेच सहयोगी अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे यांच्या नेतृत्वाखाली
राबविण्यात येत आहे.
यानिमित्त
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांमध्ये व्यवस्थापन कौशल्य, नवोन्मेषी विचारसरणी
तसेच उद्योजकतेची क्षमता विकसित करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी
या प्रशिक्षणाचा पुरेपूर लाभ घ्यावा व विशेष प्राविण्य प्राप्त करावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
शिक्षण संचालक
डॉ. भगवान आसेवार यांनीही विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी
सहयोगी अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे यांनी सांगितले की, या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना कृषि
क्षेत्रातील नाविन्यपूर्ण व्यवसाय संधी ओळखण्यास मदत होणार असून नोकरी शोधणारे
नव्हे तर नोकरी निर्माण करणारे उद्योजक बनण्याची प्रेरणा मिळणार आहे. भविष्यात
सक्षम कृषि उद्योजक घडविण्याच्या दृष्टीने हा प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत उपयुक्त
ठरणार आहे.

