वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठात महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय
अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस वंदन करून दोन मिनिटे मौन पाळण्यात आले व त्यांना
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच त्यांच्या उल्लेखनीय कार्याचे वाचन आविष्कार–२०२६
संशोधन स्पर्धेतील विजेत्या संशोधक विद्यार्थ्यांना दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी
पारितोषिक वितरण कार्यक्रमापूर्वी सभागृहात करण्यात आले.
यावेळी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन संस्थेचे
माजी संचालक पद्मश्री माननीय डॉ. ए. के. सिंह, प्रगतशील
शेतकरी पद्मश्री माननीय डॉ. श्रीरंग (दादा) लाड, लोणेरे
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. कारभारी
काळे, माननीय राज्यपाल नियुक्त देखरेख समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील
पाटील, सदस्य डॉ. प्रिया गेडाम, डॉ.
दयाराम पवार, डॉ. विलास अवारी व डॉ. विनायक धुलप तसेच वित्त
समितीचे सदस्य डॉ. संजय खोब्रागडे, डॉ. चारुशीला गायके व डॉ.
जयंत चौधरी, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार,
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण
संचालक डॉ. राकेश अहिरे, नियंत्रक श्री. अनंत कदम, विद्यापीठ अभियंता इंजि. दीपक कशाळकर, आयोजन सचिव
डॉ. राजेश कदम, तसेच विद्यापीठातील विविध महाविद्यालयांचे
सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर,
डॉ. बाबासाहेब ठोंबरे व डॉ. विश्वनाथ खंदारे यांची प्रमुख उपस्थिती
होती.
महाराष्ट्र
राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या दुःखद निधनामुळे
संपूर्ण विद्यापीठात शोककळा पसरल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर
औपचारिक उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करून केवळ संशोधक विद्यार्थ्यांच्या औपचारिक
संशोधन स्पर्धा घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी पद्मश्री माननीय डॉ. ए.
के. सिंह, पद्मश्री माननीय डॉ.
श्रीरंग (दादा) लाड, माननीय कुलगुरू डॉ. कारभारी काळे,
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, डॉ. सुनील
पाटील व डॉ. राजेश कदम यांनीही आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली.
श्रद्धांजली
कार्यक्रमाच्या वेळी संशोधन स्पर्धेत सहभागी महाराष्ट्रातील कृषि व अकृषि अशा एकूण
२६ विद्यापीठांतील ८६७ संशोधक विद्यार्थी,
त्यांचे संघ व्यवस्थापक, विद्यार्थी कल्याण
संचालक, परीक्षक अशा एकूण १३० प्रतिनिधींसह विविध
विद्यापीठांचे अधिकारी व कर्मचारी मिळून एकूण १५०० हून अधिक उपस्थित होते. यामध्ये
पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), नाशिक, सातारा, अमरावती,
अकोला, जळगाव, नांदेड,
राहुरी, सोलापूर, गडचिरोली
आदी भागांतील विद्यापीठांचा सहभाग होता.

