वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या समुदायिक विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा
योजनेतर्फे ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी
समागम शताब्दी वर्षानिमित्त विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम
विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेने, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या
मार्गदर्शनाखाली तसेच कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांच्या निर्देशानुसार सहयोगी
अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
कार्यक्रमांत
शीख धर्माचे नववे गुरु, ‘हिंद की चादर’ श्री
गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनकार्य, धर्मस्वातंत्र्यासाठी
केलेले अतुलनीय बलिदान आणि मानवतेच्या रक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च त्यागाबाबत
जनजागृती करण्यात आली. या उपक्रमांतर्गत दिनांक १९ जानेवारी रोजी ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या गौरवशाली इतिहास व
कार्याविषयी चित्रकला स्पर्धा, दिनांक २० जानेवारी रोजी भाषण
स्पर्धा, तर दिनांक २१ जानेवारी रोजी निबंध स्पर्धा तसेच
महाविद्यालय परिसरात जनजागृती रॅली (प्रभात फेरी) आयोजित करण्यात आली. या
रॅलीमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी तसेच पूर्व-प्रायोगिक प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी
उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग
बहादूर साहिबजी यांच्या महान कार्याचे स्मरण करणाऱ्या घोषणांनी संपूर्ण परिसर
दुमदुमून गेला. उपस्थितांनी त्यांच्या शहादतीला भावपूर्ण अभिवादन केले.
रॅली मध्ये
महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, विभाग प्रमुख डॉ. नीता
गायकवाड, राष्ट्रीय सेवा
योजनेचे कार्यक्रम अधिकारी तथा विभाग प्रमुख डॉ. शंकर पुरी, महाविद्यालयातील
अधिकारी व कर्मचारी, एलपीपी स्कूलच्या सर्व शिक्षिका तसेच
महाविद्यालय व एलपीपी स्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


.jpeg)

.jpeg)
.jpeg)





.jpeg)
