Tuesday, January 20, 2026

वनामकृविच्या गोळेगाव कृषि महाविद्यालयात "हिंद-की-चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिबजींना अभिवादन: आरोग्य शिबिर व भाषण स्पर्धा संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषि महाविद्यालय, गोळेगाव येथील "हिंद-की-चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी विविध उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गुरुजींच्या जीवनकार्यावर आधारित भाषण स्पर्धा आणि भव्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले.

"हिंद-की-चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या जीवन व कार्यावर आधारित भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून गुरुजींच्या त्यागाचा आणि शौर्याचा इतिहास मांडला. या स्पर्धेसाठी डॉ. डी. एस. सारंग सर आणि श्री. ठोंबरे सर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

याच दिवशी दिवशी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनात आहार, विहार, संस्कार आणि शिक्षण या चतुःसूत्रीचा वापर करून आपले जीवन उन्नत करण्याचा मोलाचा संदेश दिला. ग्रामीण रुग्णालय औंढा नागनाथ येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी टोम्पे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याच्या विविध चांगल्या सवयी जपण्याचा सल्ला दिला. या पथकात डॉ. वैशाली गिरी, डॉ. प्रियंका देशमुख, डॉ. अश्विनी नवघरे आणि डॉ. संतोष पोले यांनी विद्यार्थी, कर्मचारी व मजुरांची आरोग्य तपासणी केली.

वैद्यकीय पथकातील श्री. गंगाराम कुरुडे, श्री. पवन इंगोले, श्रीमती सविता वानोळे, श्री. समीर पाटील, श्री. सचिन शेळके, श्रीमती सोनिया वाकोडे, श्रीमती गोदावरी पाबळे, श्रीमती मंजुषा राठोड, श्रीमती शारदा गाजरे व वाहन चालक श्री. विजय कदम, श्री. कुठे गणेश, श्री. विशाल मुळे यांनी विशेष सहकार्य केले.

या प्रसंगी वरिष्ठ प्राध्यापक डॉ. शंकर नरवाडे, डॉ. संजय पवार, डॉ. व्ही. एस. मनवर, श्री. प्रविण दंडे, श्री. देवीलाल पवार, श्री. ताटिकोंडलवार, श्री. सलीम शेख, श्री. मांगीलाल आडे, श्री. सतीश ताटके, श्री. खुडे साहेब, श्रीमती बरकुले आणि श्रीमती भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सूत्रसंचालन डॉ. डी. एस. सारंग यांनी केले, तर आयोजन व आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी डॉ. आर. व्ही. भालेराव यांनी मानले.