वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि तसेच पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या माननीय महासंचालिका श्रीमती वर्षा लड्डा–उंटवाल (भाप्रसे) यांनी दिनांक ३ जानेवारी २०२६
रोजी भेट दिली.
या भेटीदरम्यान त्यांनी तूर व मूग पिकांतील जंगली प्रजातींच्या गार्डनला भेट देऊन, त्या प्रजातींच्या आधारे नवीन वाण विकासासाठी
सुरू असलेल्या संशोधनाची सविस्तर माहिती घेतली.
या प्रसंगी संशोधन
संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ.
भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी
अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, कृषी परिषदेचे संशोधन संचालक डॉ. किशोर शिंदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
होती.
कृषी संशोधन
केंद्र, बदनापूर येथे विकसित
करण्यात आलेल्या तूर पिकातील ‘गोदावरी’ वाणाचे प्रात्यक्षिक मान्यवरांनी पाहिले.
या वाणाची उच्च उत्पादनक्षमता तसेच मर व वांझ रोगांप्रती प्रतिकारक क्षमता पाहून
त्यांनी समाधान व्यक्त केले. यासोबतच हरभरा पिकातील नव्याने विकसित ‘परभणी चना–१६’
या वाणाचे प्रात्यक्षिकही पाहण्यात आले. हा वाण यांत्रिक पद्धतीने काढणीसाठी
अत्यंत उपयुक्त असल्याचे यावेळी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. दीपक पाटील यांनी
मान्यवरांना सांगितले.
क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर–२ यांच्या वतीने आयोजित मेळाव्यात
उभारण्यात आलेल्या कृषी संशोधन केंद्राच्या प्रदर्शन दालनासही मान्यवरांनी भेट
दिली. यावेळी त्यांनी मूग, उडीद, तूर व
हरभरा पिकांतील रोगप्रतिकारक विविध वाण, त्यांची
उत्पादनक्षमता तसेच संशोधन केंद्राने विकसित केलेल्या शिफारसींची माहिती घेत
समाधान व्यक्त केले.
भेटीदरम्यान कृषी
संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. दीपक पाटील यांच्यासह डॉ. विष्णू गीते, डॉ.
प्रशांत पगार, डॉ. प्रशांत सोनटक्के आणि डॉ. नितीन पतंगे
यांनी विविध प्रयोगांची व प्रात्यक्षिकांची माहिती दिली. यावेळी संशोधन केंद्राचे
इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
.jpeg)

.jpeg)

.jpeg)
