खर्च कमी करून कृषि उत्पादन वाढविण्यासाठी यांत्रिकीकरणाचे महत्त्व ... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाच्या पशु संवर्धनातील यांत्रिकीकरण विभाग व आर.आर.ए. नेटवर्क, हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने "कृषि यांत्रिकीकरण व मूल्यवर्धन" या दोन दिवसीय राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमास २० मार्च रोजी प्रारंभ झाला. या प्रशिक्षणास झारखंड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र व तेलंगणा या चार राज्यांतील १५ शेतकरी आणि तज्ज्ञ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. याप्रसंगी विद्यापीठ अभियंता
श्री दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, आर.आर.ए.
नेटवर्क, हैदराबाद येथील तांत्रिक सल्लागार डॉ. महाराणी दिन,
सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, संशोधन
अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, रेशीम योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ.
चंद्रकांत लटपटे आणि कृषि यंत्र व शक्ती विभागाचे विभाग प्रमुख डॉ. गोपाळ शिंदे आदी
मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि यांनी कृषि उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी यांत्रिकीकरणाचे
महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी बैलचलित कापूस टोकण यंत्र, हळद व अद्रक काढणी
अवजार, सौर ऊर्जाचलित फवारणी यंत्र, बहुविध
अवजार, खत कोळपे, रोटरी मोडच्या साहाय्याने
कृषि प्रक्रिया उद्योग, आजारी जनावर उचलण्याचे यंत्र आणि स्वयंचलित
जनावरे धुण्याचे यंत्र अशा अत्याधुनिक अवजारांचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना
पाहण्यास व अनुभवण्यास मिळावे यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन केल्याचे सांगितले. तसेच या अवजारांचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक पाहून याचा
स्वतः वापर करावा व त्याचा प्रचार व
प्रसार भारतातील विविध राज्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या राज्यामध्ये
करावा असे प्रतिपादन केले.
आर.आर.ए. नेटवर्क, हैदराबाद येथील तांत्रिक सल्लागार डॉ.
महाराणी दिन यांनी प्रशिक्षणात शिकविल्या जाणाऱ्या कृषि अवजारांची कार्यक्षमता व
उपयोगिता अधोरेखित केली. देशभरातील शेतकऱ्यांनी हे अवजार स्वतः वापरून त्याचा
प्रचार करावा, यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल,
असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके
यांनीही मार्गदर्शन केले,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दयानंद टेकाळे यांनी
केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. संदेश देशमुख यांनी केले.
प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी वरिष्ठ संशोधन सहाय्यक अजय वाघमारे, दीपक यंदे, प्रदीप मोकाशे, रुपेश
काकडे, मंगेश खाडे, श्रीमती पवार तसेच कृषि
अभियांत्रिकी महाविद्यालयातील एम. टेक. व पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांनी परिश्रम
घेतले.
या प्रशिक्षण कार्यक्रमात पशुपालन, शेती यांत्रिकीकरण आणि उत्पादनातील मूल्यवर्धन
या महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. विद्यापीठातील विविध
संशोधन योजनांचे प्रतिनिधी, प्राध्यापक आणि शास्त्रज्ञांनी
देखील या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.