माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या चाकूर येथील शासकीय
पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन या संस्थेतील अंतिम वर्षाच्या
विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले होते. कलश सिड्स
प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने दिनांक ७ मार्च (शुक्रवार) रोजी हा उपक्रम पार पडला. या
प्लेसमेंट ड्राइव्ह अंतर्गत इंटरनॅशनल बिझनेस- मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी
मुलाखती घेण्यात आल्या.
या प्लेसमेंट ड्राइव्हसाठी एकूण १७ विद्यार्थ्यांनी सहभाग
नोंदवला होता. यापैकी
लोचन केने या विद्यार्थ्याची इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून तर
कु. कोमल विश्वब्रम्ह आणि कु. आर्शिया शेख यांची प्लांट ऑपरेशन मॅनेजमेंट मधे निवड
करण्यात आली. त्यांना वार्षिक रु ३.५० लाख अधिक इतर भत्ते
असे पॅकेज देण्यात येणार आहे. तसेच श्रीकांत मुळे, शिवम पवार
आणि कौशिक जोशी या तीन विद्यार्थ्यांना देखील पुढील निवड प्रक्रिया साठी पाठवण्यात
आले आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि ,
शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवर, यांनी अभिनंदन
करून यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
या मुलाखतींचे परीक्षण कलश सिड्स प्रा. लि. चे एचआर हेड श्री.
मोहनिश शंकरपल्ली आणि जी. एम. श्री. राहुल गुर्जर यांनी केले होते.
विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्य आणि ज्ञानाच्या आधारे संधी उपलब्ध करून देण्याचा
उद्देश या प्लेसमेंट ड्राइव्हच्या माध्यमातून साध्य करण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजन पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन
संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संतोष
कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच सहायक प्राध्यापक तथा प्लेसमेंट
प्रमुख डॉ. ज्योती एल. झिरमिरे, आणि, सहायक
प्राध्यापक श्री. अभिषेक राठोड यांनी या
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
विद्यार्थ्यांना करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी
अशा प्रकारचे प्लेसमेंट ड्राइव्ह उपयुक्त ठरत आहेत. संस्थेच्या या उपक्रमाचे
सर्वत्र कौतुक होत आहे.