वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे मौजे टाकळगव्हाण (ता. जि. परभणी) येथे
आयोजित विशेष शिबिराचा समारोप २७ मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या
शिबिराचे आयोजन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांच्या
मार्गदर्शनाखाली डॉ. सुभाष विखे यांनी केले.
समारोप
समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूलभूत शास्त्र व संगणक विभागाचे प्रमुख
प्रा. विवेकानंद भोसले होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रविंद्र शिंदे, सरपंच श्री. मंचकराव वाघ, चेअरमन श्री. श्रीरंग वाघ,
तसेच ग्रामस्थ व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
प्रा.
भोसले यांनी कृषि अभियांत्रिकी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत सोप्या भाषेत
पोहोचविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. तसेच, राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी समाजासाठी कसे कार्य करावे,
याबाबत डॉ. शिंदे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे
प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष विखे यांनी केले.
त्यांनी शिबिरात पार पडलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी शिरसागर यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. गंगासागर मठपती यांनी मानले.
शिबिरातील
अनुभवांविषयी अभिषेक प्रजापत, कु. अंशिका
राऊत, कु. अरपिता कच्छवे, वरद बिनोरकर,
पलक इंदुरकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच, विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून स्वच्छतेचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.
या
विशेष उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे डॉ. गजानन वसू, श्री. राजाभाऊ वाघ, सौ. सुधा सालगुडे, उषादेवी कोटाळे, सलोनी अतंबर, आयुषी,
हिमांशू गौतम, मोहम्मद फुझेल, सुशांत प्रसाद, करण खोमणे, विनोद
खोत, वैभव वाघ आणि २०२२ बॅचच्या इतर विद्यार्थ्यांनी विशेष
परिश्रम घेतले.
हा
उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, त्यातून समाजसेवेची भावना अधिक दृढ झाली.