माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयात
पुणे येथील तेज अॅग्रोटेक इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीच्या वतीने परिसर मुलाखतीचे आयोजन
दिनांक २१ मार्च रोजी करण्यात आले होते. या
कंपनीत मुलाखतीद्वारे कृषि सल्लागार (Agri Advisor) पदासाठी २१
विद्यार्थ्यांची निवड झाली. या भरती प्रक्रियेने नवीन सत्राची दमदार सुरुवात झाली
असून, ही यशस्वी निवड प्रक्रिया माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली आणि शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार,
सहयोगी अधिष्ठाता डॉ सय्यद इस्माईल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या परिसर मुलाखतीमध्ये ३८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी २१
विद्यार्थी अंतिम निवडीसाठी पात्र ठरले असून, आणखी ४ विद्यार्थ्यांना प्रतीक्षा
यादीत ठेवण्यात आले आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना लवकरच
त्यांचे नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचे माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक
डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, संशोधन संचालक डॉ.खिजर बेग,
कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, नियंत्रक श्री, प्रवीण निर्मळ, विद्यापीठ अभियंता श्री.
दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ सय्यद इस्माईल यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
या यशामागे संपूर्ण कृषि महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलच्या टीमने घेतलेली
परिश्रमपूर्ण मेहनत असून, विशेषतः मुलाखतीच्या दिवशी अथक परिश्रम करणाऱ्या सदस्यांचे योगदान
उल्लेखनीय ठरले, तसेच विद्यार्थ्यांनी
आपल्या गुणवत्तेच्या जोरावर ही सुवर्णसंधी मिळवली, असे महाविद्यालयाच्या प्लेसमेंटचे
अध्यक्ष डॉ रणजित चव्हाण यांनी सांगितले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये शितल चिंचाने, पूर्वा शिंदे, निकिता
कचावे, प्रणिता बेलखेडे, प्रिती नाईक, मनीषा मकमाले, पायल पाटणकर, अक्षदा केंद्रे,
कल्पना दोके, प्रज्ञा घोडके, पूजा पिठले, सुहर्षा वसमतकर, अंबिका मुखारे, रुतुजा नकाते,
स्नेहल शिराळे, साक्षी नाईकवडे, आनंद मुंधे, नवल कोंडे, प्रेम कांबळे, हृषिकेश काळे, प्रथमेश दुबे यांचा
सामावेश असून प्रतीक्षा यादीमध्ये जयश्री शिंगणे, कांचन बिरादार, आरती सूर्यवंशी
आणि प्रथमेश बुचाले हे विद्यार्थी आहेत.
तेज ग्रुपच्या वतीने निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थाद्वारे करण्यात आले.